Water | Representational Image | (Photo Credits: stux/Pixabay)

जलवाहिनीच्या तातडीच्या दुरुस्ती कामासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका (Brihanmumbai Municipal Corporation) क्षेत्रातील दादर (Dadar), प्रभादेवी (Prabhadevi), माहीम (Mahim) आदी भागात (Water Supply) 2 व 3 डिसेंबर रोजी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. यामुळे या सदर विभागातील नागरिकांना 1 डिसेंबर रोजी पाण्याचा पुरेसा साठा करण्याचे तसेच पाणी जपून व काळजीपूर्वक वापरण्याचे मुंबई महानगरपालिकेने या भागातील सर्व नागरिकांना केले आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या ‘जी दक्षिण’ आणि ‘जी उत्तर’ विभागातील गावडे चौक, सेनापती बापट मार्ग येथे अस्तित्वात असलेल्या ब्रिटिशकालीन 1 हजार 450 मिली मीटर व्यासाच्या तानसा (पूर्व) मुख्य जल वाहिनीवरील गळती दुरुस्त करण्याचे काम दिनांक 2 व 3 डिसेंबरला हाती घेण्यात येणार आहे. सदर काम दिनांक 2 डिसेंबरला सकाळी 8 वाजेपासून सुरु होऊन ते दिनांक 3 डिसेंबरला दुपारी 2 वाजेपर्यंत पूर्ण करण्यात येईल. हे देखील वाचा- Mumbai Local ट्रेन मध्ये महिला प्रवासांसोबत लहान मुलांना परवानगी नाही; रेल्वेस्थानकांत RPF जवान ठेवणार लक्ष

मुंबई महानगरपालिकेचे ट्विट-

सदर कालावधीत ‘जी दक्षिण’ आणि ‘जी उत्तर’ विभागातील काही परिसरांमध्ये पाणीपुरवठा होणार नाही. तर, काही परिसरांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. संबंधित परिसरातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी आदल्या दिवशी पुरेसा पाणीसाठा करुन ठेवावा, तसेच पाण्याचा काटकसरीने वापर करुन सदर जलवाहिनी गळती दुरुस्ती कालावधीमध्ये नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन मुंबई महानगरपालिकेने केले आहे.