Arrested | (File Image)

उत्तर प्रदेशची (Uttar Prades) राजधानी लखनऊ (Lucknow) येथे लैंगिक उत्तेजना (Sex Stimulants) वाढवणारी बनावट औषधे विकल्या प्रकरणी टास्क फोर्सच्या (STF) पथकाने चार जणांना अटक केली आहे. धर्मा सिंग, ध्यान सिंग आणि वीर सिंग मुरादाबाद आणि लाल सिंग उर्फ गुलाब सिंग, संभल अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. अटक करण्यात आलेल्या चौघांकडून पोलिसांनी चार मोबाईल फोन, एक कॅशबुक, दोन बनावट प्रमाणपत्रे, आयुर्वेदिक गोळ्यांनी भरलेल्या 22 लहान बाटल्या आणि 2,640 रुपये रोख जप्त केले आहेत.

अतिरिक्त एसपी, एसटीएफ, विशाल विक्रम यांनी या प्रकरणात प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, बनावट लैंगिक उत्तेजक द्रव्ये विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यासाठी जबाबदारी एसटीएफच्या एका पथकाला दिली होती. या जबाबदारीअंतर्गत तपास करत असताना पथकाला गुन्ह्यात सहभागी असलेल्या टोळीची माहिती मिळाली.

ट्विट

पुढे त्यांनी सांगितले की, आम्ही सापळा रचून आरोपींना पकडले. त्यांनी त्यांच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. आरोपींनी एका सायबर कॅफेच्या मालकाकडून औषध विक्रिसाठी बनावट प्रमाणपत्र मिळवल्याचे उघड झाले आहे. हे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी त्यांनी सायबर कॅफे चालकाला 750 रुपये दिले होते. पैशांच्या बदल्यात सायबर कॅफे चालकाने लोकांना बनावट हर्बल औषधे विकल्याची कबुली दिली, असे त्यांनी सिंग यांनी सांगितले.