महाराष्ट्रातील परभणी (Parbhani) येथे एका मुस्लिम कुटुंबाने आपल्या 60 एकर उभ्या पिकाचा त्याग केला आहे. परभणीचे भाजप खासदार संजय जाधव (Sanjay Jadhav) ही गोष्ट सांगत आहेत. 13 जानेवारीपासून होणाऱ्या या कथेला प्रचंड गर्दी होण्याची अपेक्षा असल्याने खासदार रस्त्यालगत मोठे मैदान शोधत होते. याची माहिती मिळताच मुस्लीम कुटुंब स्वत: पुढे आले आणि त्यांनी 40 एकर उभे पीक कापून कथा मंडपासाठी जागा दिली. त्याबद्दल खासदारांनी मुस्लिम कुटुंबाचे आभार व्यक्त करत कौतुक केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भाजप खासदार संजय जाधव यांना त्यांचा लोकसभा मतदारसंघ परभणीत शिवपुराण कथा (Shivpuran Katha) घ्यायची होती.
या पाच दिवसीय शिवपुराण कथेचे आयोजन लक्ष्मी नगरी परिसरात करण्याचे ठरले. पण अडचण अशी होती की त्यासाठी चांगली जागा सापडत नव्हती. 13 जानेवारी ते 17 जानेवारी दरम्यान कथा होणार असल्याने आणि ही तारीख जवळ येत होती. त्यामुळे आयोजक चिंतेत होते. मुस्लीम कुटुंबाला ही बाब कळताच सय्यद शोएब यांनी स्वत: पुढे येऊन त्यांच्या 60 एकर जमिनीवरील पीक कापून घेऊन पंडालसाठी जागा दिली. हेही वाचा Fake Indian Currency Notes Case: 33 वर्षीय चित्रकाराला 200 रुपयांच्या बनावट नोटा प्रकरणी मुंबई मध्ये अटक
प्रसिद्ध कथाकार पंडित प्रदीप नारायण मिश्रा कथा सांगण्यासाठी आले आहेत. त्यांच्या नावानेच भाविकांची मोठी गर्दी अपेक्षित होती. त्यामुळे एवढ्या लोकांची बसण्याची व्यवस्था कशी होणार, असा प्रश्नही आयोजकांना सतावत होता. त्यासाठी आयोजकांना अशी जागा शोधत होती जी खूप लांब आणि रुंद असेल तसेच रस्त्याच्या अगदी जवळ असेल. मात्र मुस्लिम कुटुंबाने आपल्या पिकाचा बळी देऊन आयोजकांची चिंता दूर केली.
समाजसेवक सय्यद अब्दुल कादिर यांनी सांगितले की, येथे हिंदू असो की मुस्लिम, सर्व लोक बंधुभावाने राहतात. डिसेंबर महिन्यातच मुस्लिम समाजाने आयोजित केलेल्या धार्मिक कार्यक्रमात हिंदू बांधवांनी मोठ्या प्रमाणात हातभार लावला. आणि आता हिंदू बांधवांचा कार्यक्रम होत आहे. यात मुस्लिम मागे कसे राहतील? दुसरीकडे, भाजप खासदार संजय जाधव यांनी कृतज्ञता व्यक्त करत मुस्लिम कुटुंबाच्या योगदानाचे कौतुक केले. यातून संपूर्ण देशात हिंदू-मुस्लिम ऐक्याचा मोठा संदेश जाईल, असे ते म्हणाले.