Arrest | Representational Image (Photo Credits: Pixabay)

साऊंड सिस्टीमच्या (Sound System) आवाजाने वैतागून कोंढवा (Kondhwa) खुर्द परिसरातील एका ज्येष्ठ नागरिकाने थेट लग्नसमारंभात जाऊन वायर, मशिन, स्पीकर तोडून 10 लाखांचे नुकसान केले. सकाळने दिलेल्या वृत्तानुसार, बुधवारी पुण्यातील कोंढवा खुर्द परिसरात ही घटना घडली. पोलिसांनी सांगितले की, 8 मार्च रोजी कोंढवा परिसरातील कोरिएंटल रिसॉर्ट अँड क्लबच्या बॉलरूममध्ये विवाह सोहळा सुरू होता, ही घटना घडली. साऊंड सिस्टमची तोडफोड करणाऱ्या व्यक्तीचे नाव सत्यबीर बंगा असे असून त्याचे घर या रिसॉर्टपासून हाकेच्या अंतरावर आहे. हेही वाचा Period Blood Sold In Maharashtra: अंधश्रद्धेतून सुनेचे मासिक पाळीतील रक्त 50 हजारांना विकले, सासरच्यांविरोधात तक्रार दाखल

आवाजामुळे चिडून, बंगा यांनी परवानगीशिवाय थेट रिसॉर्टमध्ये प्रवेश केला आणि साउंड सिस्टम तोडली, पोलिसांनी पुढे सांगितले. तसेच एलईडी ऑपरेटरचा लॅपटॉप फोडून इतर सर्व साहित्याचे नुकसान केले. त्याच्यावर कोंडवा पोलीस ठाण्यात भारतीय दंड कलम 427, 452 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.