महाराष्ट्र
Maharashtra Assembly Election Results 2024: विधानसभा निवडणुकीत मुंबई शहरात कोण जिंकले? कोण आघाडीवर? घ्या जाणून
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेमहाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल (Maharashtra Assembly Election Results 2024) महाविकासआघाडीसाठी (Maha Vikas Aghadi) प्रचंड धक्कादायक तर महायुतीसाठी आश्चर्यकारक सकारात्मक लागला आहे. खास करुन मुंबई शहरामध्ये शिवसेना (UBT), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांना मोठा धक्का बसला.
Kannad Vidhan Sabha Election 2024 Result: पतीवर पत्नी ठरली भारी! कन्नड मतदारसंघातून शिंदे गट शिवसेना उमेदवार संजना जाधव यांच्याकडून हर्षवर्धन जाधव यांचा दारुण पराभव
Bhakti Aghavसंभाजीनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या या निवडणुकीमध्ये संजना जाधव या पहिल्या दिवसापासूनच प्रचाराच्या माध्यमातून आपली बाजू मांडत होत्या. अनेक वर्षापासून त्यांनी गावागावात जाऊन कामाचा झपाटा लावला होता. त्यांच्या कुटुंबातील कलहामुळे त्यांना वेळोवेळी संघर्ष करावा लागला.
Maharashtra Assembly Election Results 2024: राज्याच्या विधासभेत 'विरोधी पक्षनेता' नसणार? महाराष्ट्रावर नामुष्की
Amol Moreविधानसभेत विरोधी पक्षनेता निवडायचा असेल, तर कोणत्याही एका पक्षाला 29 जागा निवडून येणे आवश्यक असते. परंतू सध्याचे आकडे पाहता महाविकास आघाडीमधील कोणत्याही पक्षाला हा आकडा गाठणे कठीण जाणार असल्याचे चित्र आहे.
Sangamner Assembly Constituency: संगमनेर मध्ये बाळासाहेब थोरात पराभूत; कॉंग्रेस साठी मोठा धक्का
Dipali Nevarekarबाळासाहेब थोरात यांचे भाचे सत्यजित तांबे देखील राजकारणामध्ये आहेत. ते नाशिक पदवीधर मतदारसंघाचे विधिमंडळामध्ये प्रतिनिधित्व करतात.
Maharashtra Assembly Election 2024: सांगोल्यात शहाजीबापू पाटलांना धक्का? बाबासाहेब देशमुख आघाडीवर
Jyoti Kadamसांगोला विधानसभा मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. या मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे शहाजीबापू पाटील यांच्या विरोधात ठाकरे गटाचे दीपक साळुंखे तसेच शेकापचे बाबासाहेब देशमुख मैदानात आहेत.
Ambegaon Assembly Election 2024 Result: शरद पवारांना धक्का! आंबेगाव मतदार संघातून दिलीप वळसे पाटील 1100 मतांनी विजयी
Bhakti Aghavराष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांचा 1100 मतांनी विजयी झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर शरद पवारांचा दिलीप वळसे पाटील यांच्यावर मोठा रोष होता.
Maharashtra Assembly Election Results 2024: कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघांमधून भाजप उमेदवार अतुल भातखळकर विजयी
Amol Moreमुंबईत महत्वाच्या लढतीपैकी एक मानल्या जाणाऱ्या कांदिवलीच्या जागेवर अतुल भातखळकर यांनी मोठा विजय प्राप्त केला आहे.
Maharashtra Assembly Election 2024: राज्यात महायुती सरकार स्थापन करण्याच्या तयारीत; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घराबाहेर ढोल-ताशाच्या गजरात जल्लोष (Watch Video)
Jyoti Kadamमहायुतीने मोठी आघाडी घेतली असून महायुती ही तब्बल 217 जागांवर आघाडीवर आहे. त्याचा जल्लोष उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घराबाहेर सुरू आहे. ढोल-ताशाच्या गजरात समर्थक आनंद व्यक्त करत आहेत.
Shevgaon-Pathardi Vidhan Sabha Election 2024 Result: भाजप आमदार मोनिका राजळे यांना धक्का! शेवगाव पाथर्डी मतदारसंघातून अपक्ष उमेदवार चंद्रशेखर घुले 4720 मतांनी आघाडीवर
Bhakti Aghavशेवगाव-पाथर्डी मतदार संघामध्ये यावेळी चौरंगी लढत होत असताना बंडखोर हर्षदा काकडे, अपक्ष उमेदवार चंद्रशेखर घुले त्याचप्रमाणे भाजपा कडून मोनिका राजळे व राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून प्रतापराव ढाकणे असे उमेदवार निवडणूक रिंगणात होते
Maharashtra Assembly Election 2024: वरळीत शिवसेना उबाठा गटाला धक्का! आदित्य ठाकरे 597 मतांनी पिछाडीवर; मिलिंद देवरा 18,204 मतांनी आघाडीवर
Jyoti Kadamमतमोजणीत शिवसेना उबाठा गटाला मोठा धक्का बसला आहे. गेल्या वेळचे विजयी आमदार आदित्य ठाकरे 597 मतांनी पिछाडीवर आहेत. मिलिंद देवरा 18,204 मतांनी आघाडीवर आहेत.
Maharashtra Assembly Election Results 2024: परळीत धनंजय मुंडे यांचा 50 हजारहून अधिक मतांनी विजय
Amol Moreपरळीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे धनंजय मुंडे यांनी मोठा विजय प्राप्त केला आहे. त्यांनी 50 हजारा पेक्षा जास्त मताची आघाडी घेत विजय प्राप्त केला आहे.
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: 'ज्यांच्या जास्त जागा त्यांचा मुख्यमंत्री असं काही ठरलेलं नाही'; एकनाथ शिंदे यांच्याकडून मुख्यमंत्रीपदाच्या चर्चांदरम्यान मोठा दावा (Watch Video)
Dipali Nevarekarमहायुतीच्या विजयामध्ये 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी' योजना ही गेमचेंजर ठरल्याचं चित्र समोर आलं आहे. त्यामुळे या विजयामुळे पुन्हा सामान्यांचा चेहरा म्हणून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदी बसवावं अशी भावना शिवसैनिकांच्या मनात आहे.
Maharashtra Assembly Election Results 2024: विधानसभा निवडणूक निकाल, गिरीश महाजन, कालिदास कोळंबकर, आदिती तटकरे यांच्यासह कोण कोण जिंकले? घ्या जाणून
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेमहाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी (Maharashtra Assembly Election Results 2024) आज (23 नोव्हेंबर) पार पडत आहे. सुरुवातीचे कल हाती आल्यानंतर आता हळूहळू निकाल जाहीर होऊ लागले आहेत. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार भारतीय जतना पक्षाने जोरदार मुसंडी मारली आहे.
Maharashtra Assembly Election Results 2024: बॅलेट पेपरवर पुन्हा निवडणूक घेण्याची संजय राऊत यांची मागणी, सोशल मिडीयावर व्यक्त केली नाराजगी
Amol Moreया निकालांवर खासदार संजय राऊत यांनी आक्षेप घेतला आहे. महाराष्ट्राचा निकाल हा जनमताचा कौल नाही.नाही! नाही! त्रिवार नाही! असा निकाल लागूच शकत नाही असे ट्विट त्यांनी केले आहे. तसेच निवडणूक पुन्हा बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी देखीस केली आहे.
Paithan Vidhan Sabha Election 2024 Result: पैठण विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गट उमेदवार विलास भुमरे 14 हजार मतांनी आघाडीवर
Bhakti Aghavरोजगार हमी मंत्री संदिपान भुमरे यांच्या माध्यमातून त्यांचे चिरंजीव विलास भुमरे यांनी मतदारसंघांमध्ये अनेक ठिकाणी रस्ते, शेतकऱ्यांचे दैनंदिन प्रश्न सोडवण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली होती. कामाच्या माध्यमातून शेवटच्या घटकापर्यंत पोहोचल्यामुळे विलास भुमरे यांच्याशी युवा तरुण जोडला गेला.
Nagpur South West Assembly Constituency 2024: नागपूर दक्षिण-पश्चिममधून देवेंद्र फडणवीस विजयी
Dipali Nevarekarदेवेंद्र फडणवीस यांच्याविरूद्ध मविआ च्या प्रफुल गुडघे यांचे आव्हान होते.
Maharashtra Assembly Election Results 2024: माहिम मतदार संघातून महेश सावंत 5200 मताने आघाडीवर, अमित ठाकरे तिसऱ्या क्रमाकांवर
Amol Moreराज्यातील 288 विदधानसभा मतदारसंघातील निकालाची आकडेवारी समोर येत असून भाजपने सुरुवाती पासूनच मोठी आघाडी घेतली आहे.
Karjat Jamkhed Vidhan Sabha Election 2024 Result: चौथ्या फेरीअखेर कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात रोहित पवार पिछाडीवर; राम शिंदे आघाडीवर
Bhakti Aghavकर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात रोहित पवार व भाजपचे माजी मंत्री राम शिंदे यांच्यामध्ये जोरदार लढत आहे. 2019 च्या निवडणुकीत रोहित पवार या मतदारसंघांमध्ये निवडून आले होते. मात्र, यावेळी रोहित पवार यांच्यासाठी कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातील निकाल धक्कादायक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Maharashtra Assembly Election Results 2024: राज्याच्या पहिला निकाल महायुतीच्या बाजूने, राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे विजयी
Amol Moreभाजपने सुरुवाती पासूनच मोठी आघाडी घेतली आहे. राज्यात सध्याच्या कलानुसार महायुतीही 220 जागांवर आघाडीवर असून महाविकास आघाडी सध्या 57 जागांवर पुढे आहे.
Maharashtra Assembly Election 2024: बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार 15,382 मतांनी आघाडीवर; समर्थकांकडून फटाके फोडत जल्लोष (Watch Video)
Jyoti Kadamबारामती विधानसभेत काका पुतण्यामध्ये लढत होत आहे. पहिल्या फेरीपासून अजित पवार आघाडीवर होते. आता त्यांनी पुतण्या युगेंद्र पवार याला मागे टाकत 15,382 मतांची आघाडी घेतली आहे.