महाराष्ट्र

Rahul Gandhi in Parbhani: राहुल गांधींनी घेतली सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची भेट, पहा व्हिडिओ

Bhakti Aghav

राहुल गांधी यांनी सोमवारी परभणी येथे सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. सोमनाथ सुर्यवंशी यांचा हिंसक निदर्शनांनंतर अटक झाल्यानंतर न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला होता. यावेळी राहुल गांधी यांच्यासोबत प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले आणि काँग्रेसचे इतर नेते उपस्थित होते.

Pune Accident Video: फुटपथवर झोपलेल्या 9 मजुरांना डंपरने चिरडले, 3 जणांचा मृत्यू, 6 जखमी (पहा व्हिडिओ)

Shreya Varke

महाराष्ट्रातील पुण्यात अतिवेगाचा कहर पाहायला मिळत आहे. वाघोली परिसरात काल रात्री डंपरने फूटपाथवर झोपलेल्या ९ मजुरांना चिरडले. या भीषण अपघातात ३ मजुरांचा जागीच मृत्यू झाला, तर ६ जण गंभीर जखमी झाले. मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली . या घटनेत बळी पडलेले सर्व मजूर अमरावती जिल्ह्यातील रहिवासी होते.

Maharashtra Lottery Result: सागरलक्ष्मी, महा.गजलक्ष्मी सोम, गणेशलक्ष्मी भाग्यलक्ष्मी, महा. सह्याद्री धनलक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल

Jyoti Kadam

जर तुम्ही लॉटरी खेरदी करत असाल तर, या संकेतस्थळावर तुम्ही ती चेक करू शकता. महाराष्‍ट्र शासन तीन राष्‍ट्रीय सुटीचे दिवस वगळून साप्ताहिक सर्व दिवशी सोडती आयोजित करते.

Mumbai Shocker: आईला किरकोळ दुखापत केल्याचा राग मनात धरून दोन भावांनी ओला कॅब चालकाचा भोसकून खून केला.

Jyoti Kadam

ओला कॅब चालकाच्या हत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी नुकतीच दोघांना अटक केली आहे. स्कूटरला धडक दिल्याने आई जखमी झाल्याच्या रागात दोघांनी त्याची हत्या केली. शिवाजी नगरमधून ही घटना उघडकीस आली.

Advertisement

Puja Khedkar Case: पूजा खेडकरच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर आज दिल्ली उच्च न्यायालय देणार निकाल

Bhakti Aghav

पूजा खेडकरवर नागरी सेवा परीक्षेत फसवणूक केल्याचा आणि बेकायदेशीरपणे ओबीसी आणि अपंगत्व कोट्याच्या लाभांचा दावा केल्याचा आरोप आहे. न्यायमूर्ती चंदर धारी सिंह यांच्या खंडपीठाने 27 नोव्हेंबर 2024 रोजी आपला निर्णय राखून ठेवला होता. दरम्यान, न्यायालयाने अंतिम निर्णय होईपर्यंत खेडकर यांना दिलेले अंतरिम संरक्षण वाढवले ​​आहे.

Santacruz Viral Video: टॅक्सी चालकाला मारहाण करून पळून जाण्याचा प्रयत्न, पीडित तरुण चालत्या वाहनाच्या छतावर बसला, सांताक्रूझचा व्हिडिओ व्हायरल

Amol More

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक तरुण वेगवान टॅक्सीच्या छतावर बसून टॅक्सी चालकाला गाडी थांबवण्यास सांगत आहे. हा व्हिडिओ सांताक्रूझच्या उड्डाणपुलाचा आहे. काही लोकांनी त्यांच्या मोबाईलवर या व्यक्तीचा व्हिडिओ बनवला.

Devendra Fadnavis Meets Anna Hazare: देवेंद्र फडणवीस यांनी घेतली अण्णा हजारे यांची भेट, See Photos

Bhakti Aghav

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचा अहमदनगरचा हा पहिला दौरा होता. फडणवीस यांच्या स्वागतासाठी अण्णा हजारे हेलिपॅडवर आले. अण्णांनी फडणवीस यांना राळेगणसिद्धी भेटीचे निमंत्रण दिले आहे.

Sharad Pawar Discusses With Devendra Fadnavis: बीड आणि परभणीच्या घटनांबाबत शरद पवारांची देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत फोनवर चर्चा; तत्वरीत कारवाईची केली मागणी

Bhakti Aghav

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कोठडीतील मृत्यूची तातडीने दखल घेण्यासाठी राष्ट्रवादीचे (सपा) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली.

Advertisement

Raj Thackeray And Uddhav Thackeray Together: दादरमध्ये नातेवाईकाच्या लग्नात एकत्र दिसले राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे; एकमेकांशी केल्या कानगोष्टी, पहा व्हिडिओ

Bhakti Aghav

राज ठाकरेंच्या बहिणीच्या मुलाचा विवाह सोहळा मुंबईतील दादरच्या राजे शिवाजी विद्यालयात पार पडला. पुतण्याला आशीर्वाद देण्यासाठी दोन्ही काका एकत्र आले. या सोहळ्याला उद्धव ठाकरे यांनी कुटुंबासह उपस्थित राहून वधू-वरांना आशीर्वाद दिले.

Maharashtra Cabinet Portfolio Allocation: महायुती सरकारचे मंत्रिमंडळ, बड्यांना डच्चू, काहींचे बोन्साय; तिघांनी घेतली काळजी, घ्या जाणून

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी स्पर्धेत असलेल्या अनेकांना डच्चू दिला आहे. तर काहींचे पंख छाटले आहेत, अशी चर्चा आहे. त्यामुळे महायुती सरकार स्थिर वाटत असले तरी अंतर्गत गटबाजी आणि मानापमान नाट्य जोरदार सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे.

Maharashtra Lottery Result: मोहिनी, महा.गजलक्ष्मी रवि, गणेशलक्ष्मी वैभव लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल

Jyoti Kadam

महाराष्ट्र लॉटरीची स्थापना होऊन 55 वर्ष झाली. ही राज्य सरकार संचालित लॉटरी विश्वासार्ह आहे. 12 एप्रिल 1969 रोजी राज्य सरकार संचालित महाराष्ट्र लॉटरीची स्थापना करण्यात आली.

Maharashtra Weather Update: महाराष्टाचे हवामान बदलते, तापमानात चढउतार, कधी थंडी, कुठे पाऊस; घ्या जाणून

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

राज्यात थंडी कायम असली तरी त्याचे प्रमाण हळूहळू कमी होऊन तापमान वाढण्यास सुरुवात झाली आहे. त्यातच मुंबई आणि कोकण यांचा अपवाद वगळता उर्वरीत महाराष्ट्राचे तापमान (Maharashtra Weather Update) सरासरीपेक्षा 1 ते 4 डिग्री से. ग्रेडने अधिक पाहायला मिळत आहे. परिणामी राज्यात थंडी जाणवत आहे.

Advertisement

Maharashtra Cabinet Portfolio Allocation: अखेर राज्यातील खातेवाटप जाहीर, गृहखातं फडणवीस यांच्याकडेच तर अर्थ अजित पवारांकडे

Amol More

हिवाळी अधिवेशन विनाखात्याचे मंत्री म्हणून मंत्र्‍यांनी काम केलं. अखेर आज खातेवाटप झाल्याने सर्व मंत्र्यांना आता अधिकृत मंत्रीपदे मिळाली आहेत.

Kalyan Marathi Family Assault Case: कल्याणमध्ये मराठी कुटुंबावर हल्ला केल्याप्रकरणी आरोपी अखिलेश शुक्लासह सहा जणांना 6 दिवसांची पोलीस कोठडी

Bhakti Aghav

मराठी कुटुंबावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी मुख्य आरोपी अखिलेश शुक्ला (Akhilesh Shukla) सह सहा जणांना शनिवारी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात (Kalyan District Sessions Court) हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपीला सहा दिवसांची पोलीस कोठडी (Police Custody) सुनावली आहे.

Maharashtra Budget 2025 Session: मोठी बातमी! राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्प अधिवेशन 3 मार्चपासून मुंबईत सुरू होणार

Bhakti Aghav

महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन आज संपले आहे. आता राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 मार्चपासून मुंबईत सुरू होणार आहे. श

Pune Stray Dog Attacks: पुण्यात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांत वाढ; 2024 मध्ये 23 हजारहून अधिक प्रकरणांची नोंद

Bhakti Aghav

शहरातील अनेक भागात भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रात्रीच्या वेळी ही कुत्री अनेकदा टोळक्याने फिरतात आणि वाहनांमागे धावून नागरिकांना त्रास देतात. कुत्र्यांनी पादचाऱ्यांवर तसेच लहान मुलांवर हल्ला केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.

Advertisement

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना, रक्कम वाढणार? तब्बल 1,400 कोटी रुपयांच्या पूरक मागणीस विधानसभेत मंजूरी

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि मुख्यमंत्री बळीराजा योजना यासारख्या प्रमुख योजनांसाठी लक्षणीय तरतुदीसह महाराष्ट्र विधानसभेने 33,788 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्यांना मंजुरी दिली.

Majhi Ladki Bahin Yojana: महाराष्ट्रात लाडकी बहिण योजनेचा 6 वा हप्ता कधी जाहीर होणार, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Shreya Varke

महाराष्ट्रातील लाखो महिला लाडकी बहिण योजनेच्या सहाव्या हप्त्यासाठी पैसे कधी येतील याची वाट पाहत आहेत. मात्र त्यांची प्रतीक्षा संपली आहे. महाराष्ट्रातील फडणवीस सरकारने डिसेंबर महिन्याचा हप्ता लवकरच जाहीर केला आहे. मात्र, सरकारने अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेच्या अधिवेशनात बोलताना सांगितले की, अधिवेशन संपताच सर्व लाडक्या बहिणींना डिसेंबरचे पैसे मिळतील.

Santosh Deshmukh Murder: संतोष देशमुख यांच्या कुटुंबास शरद पवार यांची भेट, उचलली मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

राष्ट्रवादी काँग्रेस (SP) पक्षाचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची आज मस्साजोग येथे भेट घेतली. कुटुंबाशी संवाद साधला आणि त्यांचे सांत्वन केले. त्यानंतर त्यांनी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेत संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी घेतली.

Sanjay Raut On BMC Elections 2025: महापालिका निवडणुकीत ठाकरे गट शिवसेना एकट्याने निवडणूक लढवणार; संजय राऊत यांनी दिले संकेत

Bhakti Aghav

पत्रकारांशी बोलताना राऊत म्हणाले की, पक्षाचे कार्यकर्ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकट्याने जाण्याचा आग्रह धरत आहेत. कारण, महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी लोकसभा किंवा राज्य विधानसभा निवडणुकीपेक्षा जास्त इच्छुक आहेत.

Advertisement
Advertisement