Maharashtra Cabinet Portfolio Allocation: महायुती सरकारचे मंत्रिमंडळ, बड्यांना डच्चू, काहींचे बोन्साय; तिघांनी घेतली काळजी, घ्या जाणून
तर काहींचे पंख छाटले आहेत, अशी चर्चा आहे. त्यामुळे महायुती सरकार स्थिर वाटत असले तरी अंतर्गत गटबाजी आणि मानापमान नाट्य जोरदार सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे.
नागपूर येथे सुरु असलेल्या राज्य विधिमंडळ अधिवेशनाचे सूप वाजले. लगोलग राज्य सरकारच्या मंत्रिमडळाच्या खातेवाटपास (Maharashtra Cabinet Portfolio Allocation) मुहूर्त मिळाला. मंत्रिपदाची शपथ घेतल्यावर मंत्रिपदाची झूल अंगावर चढलेले हे मंत्री नुसतेच बिनखात्याचे होऊन फिरत होते. त्यांना खातेवाटप झाल्याने एकादाचा दिलासा मिळाला. पण या मंत्रीपद आणि खातेवाटप यांवरुन अनेकांना धक्का बसला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी स्पर्धेत असलेल्या अनेकांना डच्चू दिला आहे. तर काहींचे पंख छाटले आहेत, अशी चर्चा आहे. त्यामुळे महायुती सरकार स्थिर वाटत असले तरी अंतर्गत गटबाजी आणि मानापमान नाट्य जोरदार सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे.
भाजप राष्ट्रवादीतील दिग्गजांना धक्का
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत मंत्रिमंडळ शपथविधीवेळी इतरही अनेक मंत्र्यांनी शपथ घेतली. मात्र, मंत्रिपदासाठी प्रबळ दावेदार असलेले आणि पद मिळणार हे निश्चीत समजल्या जाणाऱ्या छनग भुजबळ, दिलीप वळसे पाटील यांना अजित पवार यांनी धक्का दिला. या दोघांचाही मंत्रिमंडळात समावेश झाला नाही. तीच गत भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांची. त्यांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळू शकले नाही. शिवसेनेच्या बाबतीतही अब्दुल सत्तार, दीपक केसरकर यांसारख्या मंडळींना संधी मिळू शकली नाही. (हेही वाचा, Maharashtra Cabinet Portfolio Allocation: अखेर राज्यातील खातेवाटप जाहीर, गृहखातं फडणवीस यांच्याकडेच तर अर्थ अजित पवारांकडे)
नव्या चेहऱ्यांना संधी
दरम्यान, जुन्या चेहऱ्यांना बाजूला सारुन तुलनेत नव्या चेहऱ्यांना अधिक संधी दिली आहे. पहिल्यांदाच मंत्री झालेले चेहरे आणि खाती.
- शिवेंद्रराजे भोसले: सार्वजनिक बांधकाम
- जयकुमार गोरे: ग्रामविकास
- माणिकराव कोकाटे: कृषी
- बाबासाहेब पाटील: सहकार
- मकरंद पाटील: मदत पुनर्वसन
दिग्गजांचा पत्ता कट
दरम्यान, महायुतीतील इतर महत्त्वाच्या मंत्र्यांना संधी तर मिळू शकली. मात्र, खातेवाटपात त्यांना मिळालेली खातीही तुलनेत दुय्यम समजली जाणारी आहेत. परिणामी दुय्यम खाती देऊ या मंत्र्यांची ताकद मर्यादित करण्याचा तर प्रयत्न नाही ना? असा सवाल उपस्थित केला जात आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू आणि संकटमोचक समजले जाणारे गिरीश महाजन यांना जलसंपदा विदर्भ, तापी आणि कोकण महामंडळे हे विभाग व आपत्ती व्यवस्थापन ही खाती मिळाली आहेत. त्यामुळे तुलनेत ही खाती बरीचसी दुय्यम मानली जातात. दुऱ्या बाजूला राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आगोरच्या मंत्रिमंडळात गृहनिर्माण, महसूल, कृषी, यांसारखी महत्त्वाची खाती सांभाळली होती. मात्र, या वेळी त्यांच्याकडे केवळ जलसंधारण खाते आहे. ते देखील गिरीश महाजन आणि विखे यांच्यात विभागून. परिणामी त्यांचेही पंख छाटल्याची चर्चा आहे. पंकजा मुंडे यांच्याकडे पर्यावरण व पशूसंवर्धन हे खाते आले आहे. (हेही वाचा - Maharashtra Budget 2025 Session: मोठी बातमी! राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्प अधिवेशन 3 मार्चपासून मुंबईत सुरू होणार)
दरम्यान, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही अत्यंत महत्त्वाचे स्थान असलेले छनंजय मुंडे बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देषमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे बॅकफूटला गेले आहेत. केवळ, मुंडेच नव्हे तर राज्य सरकारलाही बॅकफूटला जावे लागले आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात मुंडे यांचे थेट नाव आले नसले तरी, सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी त्यांच्याकडेच अंगुलीनिर्देश केला आहे. परिणामी त्यांनाही अन्न व नागरी पुरवठा हे खाते देण्यात आले आहे. आगोदरच्या सरकारमध्ये कृषी, रस्ते विकास हे मंत्रालय सांभाळलेल्या शिवसेना मंत्री दादा भुसे यांना या वेळी शालेय शिक्षण हे खाते आले आहे.