Maharashtra Lottery Result: सागरलक्ष्मी, महा.गजलक्ष्मी सोम, गणेशलक्ष्मी भाग्यलक्ष्मी, महा. सह्याद्री धनलक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल

महाराष्‍ट्र शासन तीन राष्‍ट्रीय सुटीचे दिवस वगळून साप्ताहिक सर्व दिवशी सोडती आयोजित करते.

Photo Credit- X

Maharashtra Lottery Results: सागरलक्ष्मी (Sagarlakshmi), महा. गजलक्ष्मी सोम (Maha.Gajalakshmi Mon), गणेशलक्ष्मी भाग्यलक्ष्मी (Ganeshlakshmi Bhagyalakshmi), महा. सह्याद्री धनलक्ष्मी (Maha. Sahyadri Dhanalakshmi) लॉटरींची सोडत आज सोमवारी दिनांक 23 डिसेंबर 2024 रोजी जाहीर होणार आहे. राज्य शासनाकडून प्रत्येक आठवड्याला लॉटरींची सोडत आयोजित करण्यात येते. लॉटरी निकाल हा lottery.maharashtra.gov.in या वेबसाईटवर दररोज दुपारी 4 वाजून 15 मिनीटांनी जाहीर केला जातो.

आज जाहीर होणाऱ्या लॉटरींमध्ये सागरलक्ष्मी चे पहिले बक्षिस 7 लाखांचे आहे. महा. गजलक्ष्मी सोम ची 5 बक्षिसे 10 हजारांची आहेत. तर उर्वरीत गणेशलक्ष्मी भाग्यलक्ष्मी आणि महा. सह्य्याद्री धनलक्ष्मी लॉटरींची बक्षिसे ही अनुक्रमे 10 हजारांची आहेत.(हेही वाचा:Maharashtra State Lottery: महाराष्ट्र राज्य लॉटरी प्रकार आणि सोडतीचे वार; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून)

सागरलक्ष्मी लॉटरीच्या एकूण बक्षीसांची संख्या 5,250 आहे. महा. गजलक्ष्मी सोम लॉटरीच्या एकूण बक्षीसांची संख्या 2,275 आहे. गणेशलक्ष्मी भाग्यलक्ष्मी लॉटरीच्या एकूण बक्षीसांची संख्या 861 आहे. महा. सह्याद्री धनलक्ष्मी लॉटरीच्या एकूण बक्षीसांची संख्या 441 आहे. प्रत्‍येक आठवडयात एकूण 27 सोडती, तसेच 4 मासिक सोडती व वर्षाला 6 भव्यतम सोडत असतील, ज्यांचा तपशील शेजारच्‍या कोष्‍टकात दाखविला आहे. यामध्ये प्रत्येक महिन्याला 30 व्यक्ती लखपती होतील.

जर तुम्ही विजेते आहात तर तुम्हाला Maharashtra State Lottery claim form वर आवश्यक माहिती भरून द्यावी लागेल.यामध्ये पत्ता, मोबाइल नंबर,पॅन कार्ड, आधार कार्ड, ही माहिती भरणं आवश्यक असते.सोबत 2 साक्षीदारांची माहिती देणं आवश्यक आहे. आत्तापर्यंत 5 वर्षात 619 पेक्षा जास्त व्यक्ती लखपती झाले आहेत. तर करोडपतींचा आकडाही मोठा आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif