Maharashtra Cabinet Portfolio Allocation: अखेर राज्यातील खातेवाटप जाहीर, गृहखातं फडणवीस यांच्याकडेच तर अर्थ अजित पवारांकडे

हिवाळी अधिवेशन विनाखात्याचे मंत्री म्हणून मंत्र्‍यांनी काम केलं. अखेर आज खातेवाटप झाल्याने सर्व मंत्र्यांना आता अधिकृत मंत्रीपदे मिळाली आहेत.

Devendra Fadnavis, Ajit Pawar, Eknath Shinde | | (Photo credit: archived, edited, representative image)

Maharashtra Cabinet Portfolio Allocation:  देवेंद्र फडणवीस सरकारच्या (Devendra Fandnavis Cabinet) मंत्र्यांच्या शपथविधीच्या 8 दिवसानंतर अखेर खातेवाटप (Maharashtra portfolio distribution) जाहीर झालं आहे. गृहमंत्रालय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत:कडे ठेवलं आहे. याशिवाय गृह, ऊर्जा, न्याय व विधी, सामान्य प्रशासन, माहिती आणि जनसंपर्क व खातेवाटप न झालेल सर्वच खाते फडणवीस यांनी स्वत:कडेच ठेवले आहे. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे नगरविकास तर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे अर्थखातं असणार आहे.  (हेही वाचा -  Maharashtra Budget 2025 Session: मोठी बातमी! राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्प अधिवेशन 3 मार्चपासून मुंबईत सुरू होणार)

कोणाला मिळालं कोणतं खातं?

देवेंद्र फडणवीस : गृहखातं

एकनाथ शिंदे : नगरविकास आणि गृहनिर्माण

अजित पवार : अर्थ आणि राज्य उत्पादन शुल्क

चंद्रशेखर बावनकुळे : महसूल

राधाकृष्ण विखे पाटील : जलसंधारण

हसन मुश्रीफ : वैद्यकीय शिक्षण

चंद्रकांत पाटील : उच्च तंत्र शिक्षण

गिरीश महाजन : जलसंपदा

गुलाबराव पाटील : पाणीपुरवठा

धनंजय मुंडे : अन्न व नागरी पुरवठा

दादाजी भुसे : शालेय शिक्षण

गणेश नाईक : वनखातं

संजय राठोड : माती व पाणी परीक्षण खात

मंगलप्रभात लोढा : कौशल्य विकास

उदय सामंत : उद्योग व मराठी भाषा

जयकुमार रावल : विपणन

पंकजा मुंडे : पशुसंवर्धन आणि पर्यावरण

अतुल सावे : ओबीसी विकास, दुग्धविकास

अशोक उईके : आदिवासी विकास

शंभूराज देसाई : पर्यटन व खाण स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय

आशिष शेलार : माहिती व तंत्रज्ञान

दत्तात्रय भरणे : क्रीडा व अल्पसंख्याक विकास

अदिती तटकरे : महिला व बालविकास

शिवेंद्रराजे भोसले : सार्वजनिक बांधकाम

माणिकराव कोकाटे : कृषी

नरहरी झिरवाळ : अन्न व औषध प्रशासन

जयकुमार गोरे : ग्रामविकास आणि पंचायत राज

संजय शिरसाट : सामाजिक न्याय

भरत गोगावले : रोजगार हमी व फलोत्पादन

नितेश राणे : मत्स्य आणि बंदरे

प्रताप सरनाईक : वाहतूक

बाबासाहेब पाटील : सहकार

मकरंद पाटील : मदत व पुनर्वसन

प्रकाश आबिटकर : सार्वजनिक आरोग्य कुटुंब कल्याण

राज्यमंत्री

माधुरी मिसाळ : सामाजिक न्याय,अल्पसंख्याक विकास वैद्यकीय शिक्षण

आशिष जयस्वाल : अर्थ आणि नियोजन आणि विधी व न्याय

इंद्रनील नाईक : उच्च आणि तंत्र शिक्षण आणि आदिवासी विकास

मेघना बोर्डीकर : सार्वजनिक आरोग्य, कुटुंब कल्याण

योगेश कदम : गृह राज्य शहर

पंकज भोयर : गृह निर्माण

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement