Mumbai Shocker: आईला किरकोळ दुखापत केल्याचा राग मनात धरून दोन भावांनी ओला कॅब चालकाचा भोसकून खून केला.

स्कूटरला धडक दिल्याने आई जखमी झाल्याच्या रागात दोघांनी त्याची हत्या केली. शिवाजी नगरमधून ही घटना उघडकीस आली.

Photo Credit- Pixabay

Mumbai Shocker: ओला कॅब चालकाच्या(Ola Cab Driver) हत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police)नुकतीच दोन भावांना अटक केली आहे. शनिवारी, 21 डिसेंबर रोजी ही घटना घडली. आदिल तालीम खान (38) असे मृत कॅब चालकाचे नाव आहे. हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, मोहम्मद रफिक शरीफ अब्बास अली शेख (35) आणि अब्दुल करीम शेख उर्फ ​​दादू (30) अशी आरोपींची नावे आहेत. मृत (Murder)व आरोपी शिवाजी नगर (Shivaji Nagar) येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. (Santacruz Viral Video: टॅक्सी चालकाला मारहाण करून पळून जाण्याचा प्रयत्न, पीडित तरुण चालत्या वाहनाच्या छतावर बसला, सांताक्रूझचा व्हिडिओ व्हायरल)

शनिवारी, खान हे त्यांच्या घराच्या मागे असलेल्या पार्किंगमधून कार काढत असताना त्यांच्या कारची आरोपींच्या स्कूटरला धडक बसली. त्यावेळी खान यांच्या कारला धडक दिल्याने स्कूटर पलटी होऊन आरोपीच्या आईच्या हाताला किरकोळ दुखापत झाली. घटनेच्या वेळी दुकानात उपस्थित असलेल्या मोहम्मद रफिक शेख याने खान यांच्याशी वाद घातला. त्यानंतर वादाचे रुपांतर हाणामारीत झाले.(Pune Stray Dog Attacks: पुण्यात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांत वाढ; 2024 मध्ये 23 हजारहून अधिक प्रकरणांची नोंद)

प्रत्यक्षदर्शींनी दोघांना शांत करत भांडण मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, घटनेच्या दोन तासांनंतर खान आणखी दोघांसह परत आला आणि रफिक शेखवर हल्ला केला. त्यानंतर दोन्ही भावांनी त्याच दिवशी रात्री अकराच्या सुमारास खानच्या घरात घुसून त्यांच्या डोक्यावर, छातीवर, पोटावर आणि मांडीवर वार केले. हल्ल्यादरम्यान, खानचे शेजारी त्याच्या मदतीला धावले आणि त्याला जवळच्या रुग्णालयात नेले, जिथे त्याला मृत घोषित करण्यात आले.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif