'भाजपमध्ये सामील झालात किंवा भारतात काय चालले, याची तुम्हाला माहिती नाही' पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरुन जितेंद्र आव्हाड यांचा अमिताभ बच्चन, अक्षय कुमार यांना टोला
Jitendra Awhad (Photo Credit: Twitter)

काँग्रेस नेते डॉ. मनमोहन सिंह पंतप्रधान असताना पेट्रोल, डिझेल वाढत्या दरावर बोट ठेवणाऱ्या बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांना गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी धारेवर धरले आहे. दरम्यान यापूर्वी 24 मे 2012 रोजी अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांनी इंधनाच्या दरवाढीवरून ट्विटरच्या माध्यामातून आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. परंतु, त्यावेळी आवाज उठवणारे आता गप्प का? असा सवाल विचारत जितेंद्र आव्हाड यांची अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्यावर निशाणा साधला आहे. याशिवाय, आपण भाजपमध्ये सामील झालात किंवा भारतात काय चालले आहे याची तुम्हाला माहिती नाही, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

आठ-दहा वर्षीपूर्वीची गोष्ट आहे, तेव्हा महमोहन सिंह यांची सरकार असताना डिझेल आणि पेट्रोलच्या दरात वाढ झाली होती. त्यावेळी अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांनी ट्विटरच्या माध्यामातून इंधन दरवाढीच्या विरोधात आवाज उठवला होता. आता केंद्रात मोदी सरकार असून भारतात पहिल्यांदाच पेट्रोल, डिझेलच्या दरात एवढी मोठी वाढ झाली आहे. मनमोहन सिंह यांचे सरकार असताना जागतिक स्थरावर इंधनाचे दर वाढले होते. मात्र, आता जागतिक स्थरावर इंधनाचे दर कमी आहेत, तरीदेखील भारतात इंधानाचे दर गगनाला भिडले आहेत, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत. तसेच त्यावेळी गाड्या जाळायच्या की सायकल चालवायची असा प्रश्न उपस्थित करणारे अभिताभ बच्चन आणि अक्षय कुमार आता गप्प का आहेत. मला वाटते आपण भाजपमध्ये सामील झाला आहात किंवा भारतात काय चालले आहे, याची तुम्हाला योग्य माहिती नाही, असाही टोला जितेंद्र आव्हाड यांनी लगावला आहे. हे देखील वाचा- 'आता मुंबईकरांनी गाड्या जाळायच्या की चालवायच्या?' इंधन दर वाढीवरुन जितेंद्र आव्हाड यांचा अमिताभ बच्चन यांच्यावर निशाणा

जितेंद्र आव्हाड यांचे ट्विट-

पेट्रोल आण डिझेलच्या वाढत्या किंमती पाहता जितेंद्र आव्हाड संतापले आहेत. दरम्यान आज मुंबईत पेट्रोलचे दर 86.89 रुपये प्रति लीटर तर डिझेलचे दर 78.49 रुपये प्रति लीटर इतके आहेत.