Bhiwandi Rape: संतापजनक! बौद्धिक क्षमता कमी असलेल्या एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार; आरोपी अटकेत
Representational Image (Photo Credits: Pixabay)

बौद्धिक क्षमता कमी असलेल्या एका 9 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार (Rape) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना ठाणे (Thane) जिल्ह्यातील भिवंडी (Bhiwandi) परिसरात घडली आहे. या घटनेनंतर आजूबाजुच्या परिसरात असंतोष निर्माण झाला आहे. याप्रकरणी नारपोली पोलिसांनी 38 वर्षीय आरोपीला अटक केली असून तिच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी आणि पीडित मुलगी एकाच इमारतीत राहतात. आरोपीच्या घरात कोणी नसताना त्याने पीडित मुलीला घरी बोलावून तिच्यावर बलात्कार केला, असे पीडिताच्या आईने तक्रारीत म्हटले आहे.

इम्रान इब्राहिम शेख, असे आरोपीचे नाव आहे. पीडत मुलगी आणि आरोपी एकाच इमारतीमध्ये राहत असून तो वरच्या मजल्यावर राहतो. पीडित मुलगी लहान असताना तिला आकडी आली होती. ज्यामुळे तिची बौद्धिक क्षमता कमी झाली आहे, अशीही माहिती मिळत आहे. याचाच गैरफायदा घेत आरोपीने त्याच्या घरात कोणी नसताना पीडिताला घरी बोलवून घेतले. त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. दरम्यान, आरोपीच्या अत्याचारामुळे वेदना असाह्य झाल्याने पीडित चिमुरडी घराशेजारीच रडत बसली होती. त्यावेळी शेजारी राहणाऱ्या एका महिलेने तिच्याकडे विचारपूस केली. त्यावेळी पीडिताने आपल्यासोबत घडलेली सर्व हकीकत त्या महिलेला सांगितली. त्यानंतर या महिलेने पीडिताच्या आईला फोन करून तिच्यावर झालेल्या अत्याचाराची माहिती दिली. याबाबत माहिती होताच पीडिताच्या आईने नारपोली पोलीस ठाणे गाठले. तसेच आपल्या मुलीसोबत घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. दरम्यान, पीडिताच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी अटक केली. हे देखील वाचा- मुंबई: 23 वर्षीय तरूणीची मुंबई पोलिस दलातील PSI विरूद्ध बलात्काराची तक्रार; FIR दाखल

 याप्रकरणी इम्रान शेख याच्याविरोधात नारपोली पोलीस ठाण्यात पॉक्सोसह बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, नारपोली पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने त्याला ११ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तसेच नारपोली पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली आहे.