Operation Sindhu: ऑपरेशन सिंधू अंतर्गत 517 भारतीय इराणहून मायदेशी परतले; मोदी सरकारचे मानले आभार

इराण आणि इस्रायलमधील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. परिस्थिती बिघडत चालली पाहून भारत सरकारने ऑपरेशन सिंधू अंतर्गत इराणमधून विद्यार्थ्यांसह अनेक भारतीयांना बाहेर काढण्यास सुरुवात केली आहे.

Operation Sindhu: ऑपरेशन सिंधू अंतर्गत 517 भारतीय इराणहून मायदेशी परतले; मोदी सरकारचे मानले आभार
PC-X

Operation Sindhu: इस्रायल आणि इराणमधील संघर्ष (Israel-Iran Conflict) सर्वात गंभीर पातळीवर पोहोचला आहे. दोन्ही देश एकमेकांच्या शहरांवर क्षेपणास्त्रांनी हल्ला करत आहेत. दरम्यान, ऑपरेशन सिंधू अंतर्गत भारताने इराणमधून आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यास सुरुवात केली आहे आणि आतापर्यंत 517 भारतीय इराणमधून परतले आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवर लिहिले आहे की इस्रायल आणि इराणमधील लष्करी संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, शुक्रवारी रात्री आणि शनिवारी पहाटे अनेक विद्यार्थी आणि इतर भारतीयांना दिल्लीत आणण्यात आले आहे. भारताने इराणमधून आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी बुधवारी ऑपरेशन सिंधू सुरू करण्याची घोषणा केली आहे.

इराणी सरकारचे आभार मानले

दरम्यान, परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी एक्स अकाउंटवर लिहिले आहे की ऑपरेशन सिंधू फ्लाइटने अनेक भारतीय नागरिकांना परत आणले आहे. ते म्हणाले की भारताने एका चार्टर फ्लाइटद्वारे इराणमधून २९० भारतीय नागरिकांना बाहेर काढले आहे. यामध्ये विद्यार्थी आणि धार्मिक यात्रेकरूंचा समावेश होता. हे विमान २० जून रोजी सकाळी ११:३० वाजता नवी दिल्लीला पोहोचले आणि अरुण चॅटर्जी यांनी भारतीय नागरिकांचे स्वागत केले.

इराणमधून बाहेर काढण्यात आलेल्या ११० भारतीय नागरिकांची पहिली तुकडी गुरुवारी भारतात पोहोचली. देशात परतल्यानंतर अनेकांनी त्यांच्या व्यथा व्यक्त केल्या. दरम्यान, कठीण प्रवासानंतर दिल्ली विमानतळावर पोहोचल्यावर परराष्ट्र राज्यमंत्री कीर्ती वर्धन सिंह यांनी त्यांचे स्वागत केले. माहितीनुसार इराणमध्ये शिकणारे बहुतेक विद्यार्थी जम्मू-काश्मीरचे आहेत आणि आता ते सर्व भारतात आणण्यात आले आहेत. जम्मू-काश्मीर विद्यार्थी संघटनेने त्यांच्या एक्स हँडलवरील पोस्टमध्ये पंतप्रधान मोदींचे आभार मानले.

(The above story first appeared on LatestLY on Jun 21, 2025 03:08 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).