Accident | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

पालनपूर,जून ५: गुजरात पालनपूरमध्ये एका कारखण्याच्या आवारात बेदरकारपणे चालवलेल्या कारने धडकदिल्याने बुधवारी म्हणजे आज दोन मुलांचा मृत्यू झाला. ती लहान मुले मैदानात खाली खेळत असताना ही घटना घडल्याच समोर आले .घटना घडताच चालकाने गाडी सोडून तात्काळ घटनास्थळावरून पळ काढला. हेही वाचा: पुण्यात पोर्शे कार अपघात प्रकरण ताज असतानाच, अज्ञात कारची आणखी एकाला धडक 

ही घटना पालनपूर,खोडला येथील कारखान्याच्या प्रांगणात घडली.मृत्यू पावलेल्या चिमुकले सुरेश व चिराग दोघ फक्त ६ वर्षांचे होते. दोघे ही खेलत असताना ही घटना झाल्याचे समोर आले आहे. एकाचा जागच्या जागी प्राण गेला व दुसऱ्याचा उपचार दरम्यान मृत्यू झाला.ह्या घटनेत दुसऱ्या गंभीर जखमी झालेल्या मुलीला त्वरित उपचारसाठी हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आल.पोलिससानी चालकावर गुन्हा दाखल करून कारवही ला सुर्वात केली आहे.या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून, पोलिसांनी आता तपास सुरू केला आहे'