भारताच्या लसीकरण कार्यक्रमाविषयी (Corona Vaccination In India) सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून आकडेवारी जाहीर करण्यात आली. या आकडेवारीनुसार, भारताने (India) अमेरिकेलाही (America) मागे टाकत मौलाचा टप्पा गाठल्याचे सांगितले जाते. यावर उद्योगपती आणि महिंद्रा समूहाचे संचालक आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली आहे. भारतातील लोकसंख्या अमेरिकापेक्षा जास्त आहे. त्यानुसार, भारतात केवळ 19 टक्के तर, अमेरिकेत 54 टक्के नागरिकांचे लसीकरण झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.
आनंद महिंद्रा हे त्यांच्या ट्वीट्समुळे कायम चर्चेत असतात. वेगवेगळ्या सामाजिक, आर्थिक, क्रीडाविषयक असो वा मनोरंजन क्षेत्राशी संबंधित विषय असो, आनंद महिंद्रा यांनी केलेले ट्वीट कायमच व्हायरल होताना पाहायला मिळतात. हे देखील वाचा- COVID19 Vaccination In India: कोरोना प्रतिबंधक लसीकरणात भारत अमेरिकेच्या पुढे; देशात आतापर्यंत 32.36 कोटींपेक्षा अधिक नागरिकांना दिली लस
आनंद महिंद्रा यांचे ट्वीट-
Despite this achievement we’ve vaccinated only 19% of our population vs. 54% in the U.S Our population forces us to run faster in everything just to keep pace with the world. Perhaps this will compel us to become the most innovative country in the world? https://t.co/kLVfTIvTMB
— anand mahindra (@anandmahindra) June 28, 2021
आनंद महिंद्र यांनी केलेल्या ट्वीटमध्ये असे म्हटले आहे की, भारताने या कामगिरीनंतर लोखसंख्येच्या फक्त 19 टक्के नागरिकांना लस देण्यात आली आहे. तर, दुसरीकडे अमेरिकेने त्यांच्या लोकसंख्येनुसार 54 टक्के नागरिकांचे लसीकरण केले आहे. जगासोबत स्पर्धेत राहण्यासाठी आपली लोकसंख्या आपल्याला कायम वेगाने धावण्यासाठी प्रवृत्त करते. कदाचित यामुळेच आपण जगातील सर्वात इनोव्हेटिव्ह देश होण्याचे मानकरी ठरू, असेही त्यांनी म्हटले आहे.