ठळक बातम्या

उद्धव ठाकरे यांचा महाराष्ट्रातील जनतेशी डिजिटल मीडियाद्वारे थेट संवाद

टीम लेटेस्टली

शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेशी डिजिटल मीडिया द्वारे आज (18 नोव्हेंबर) थेट संवाद साधला. या संवादात त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. काय म्हणाले उद्धव ठाकरे? इथे पाहा लाईव्ह.

UP Shocker: यूपीच्या बदायूंमध्ये नवजात मुलाचा सौदा, पैशाच्या लोभापायी वडिलांनी विकले 4 लाखांना!

Shreya Varke

उत्तर प्रदेशातील बदायूं येथील कोतवाली भागात एका वडिलांवर पैशाच्या लालसेपोटी नवजात अर्भक ४ लाख रुपयांना विकल्याचा आरोप करण्यात आला आहे. बरेली येथील एका निपुत्रिक जोडप्याने नवजात शिशु विकत घेतले होते. पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत नवजात अर्भक खरेदी करणाऱ्या दाम्पत्याकडून परत आणून त्याच्या आईच्या ताब्यात दिले. मात्र, नवजात बालकाच्या आईने पोलिसांत कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही.

WhatsApp Fake Wedding Scam: विवाह निमंत्रण घोटाळ्यापासून सावधान; APK फायली वापरून सायबर गुन्हेगार पकडतायत सावज

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

सायबर गुन्हेगार मालवेअर-भरलेल्या एपीके फायलींसह वापरकर्त्यांना लक्ष्य करण्यासाठी बनावट व्हॉट्सअॅप लग्नाच्या आमंत्रणांचा वापर करीत आहेत. या घोटाळ्यापासून स्वतःचे संरक्षण कसे करावे ते जाणून घ्या.

Women Drown In Resort Pool: हृदयद्रावक! मंगळुरूमध्ये एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात 3 महिलांचा रिसॉर्ट पूलमध्ये बुडून मृत्यू; पहा व्हिडिओ

Bhakti Aghav

निशिता एमडी (21), पार्वती एस (20) आणि कीर्तना एन (21) अशी मृत महिलांची नावे आहेत. तिन्ही महिला म्हैसूर येथील रहिवासी होत्या. या तिघीही 16 नोव्हेंबर रोजी बीचजवळील रिसॉर्ट वाज्को येथे राहण्यासाठी आल्या होत्या.

Advertisement

Kailash Gehlot Joins BJP: कैलाश गेहलोत यांचा भाजपमध्ये प्रवेश, कोणाच्या दबावाखाली निर्णय घेतल्याचे स्पष्टीकरण

टीम लेटेस्टली

आम आदमी पार्टी आणि दिल्ली सरकारच्या मंत्रीपदाचा राजीनामा देत कैलाश गेहलोत यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. कालच गेहलोत यांनी राजीनामा दिला आणि आज त्यांनी भापमध्ये प्रवेश केला.

Delhi Air Pollution: दिल्ली प्रदूषण आणि धुक्यामुळे विमानसेवेचा खोळंबा, 160 उड्डाणे उशीरा, 7 रद्द, विमान कंपन्यांकडून प्रवाशांना ॲडव्हायझरी जारी

टीम लेटेस्टली

दिल्लीची हवा सर्वात धोकादायक पातळीवर आहे. आजचा हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) 481 वर पोहोचला आहे. दिल्लीत धुक्यामुळे दृश्यमानता कमी असल्याने पाच उड्डाणे दुसरीकडे वळवण्यात आली आहेत. यात जयपूरला चार, डेहराडूनला एक अशी आकडेवारी आहे.

MBBS Student Dies After Ragging: गुजरातमध्ये वरिष्ठांच्या रॅगिंगमुळे एमबीबीएसच्या विद्यार्थ्याचा मृत्यू; 3 तास उभे राहिल्यानंतर पडला बेशुद्ध

Bhakti Aghav

महाविद्यालयाचे डीन डॉ. हार्दिक शाह यांनी सांगितले की, शनिवारी रात्री धारपूर, पाटण येथील जीएमईआरएस मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या वसतिगृहात वरिष्ठांनी रॅगिंगच्या वेळी तीन तास उभे केल्याने पीडित अनिल मेथानिया बेशुद्ध पडला. त्याला रुग्णालयात नेण्यात आले. सर्वतोपरी प्रयत्न करूनही त्याला वाचवता आले नाही.

Dry Days in Maharashtra Assembly Elections: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीदरम्यान ड्राय डे, मतदानासाठी सुट्टी; जाणून घ्या कोणत्या दिवशी मिळणार नाही मद्य

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

मुंबई आणि उर्वरीत महाराष्ट्रात येत्या 20 नोव्हेंबर 2024 रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात काही दिवस 'ड्राय डे' म्हणून घोषीत करण्यात आले आहेत. ज्यामुळे संबंधित तारखेस मद्यविक्री करता येणार नाही. दरम्यान, मतदारांना मतदान करता यावे यासाठी बीएमसीने मतदानाचा दिवस सुट्टी म्हणून घोषित केला आहे.

Advertisement

Jalgaon Firing: धक्कादायक! अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार; जळगाव शहरातील घटना; विधानसभा निवडणूक प्रचाराचा आज शेवटचा दिवस

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

विधानसभा निवडणूक 2024 चा प्रचार आज संपत असतानाच जळगाव येथून धक्कादायक घटना पुढे येत आहे. जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर अज्ञातांनी गोळीबार केला आहे. ज्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Emergency Release Date: अखेर इमर्जन्सीच्या प्रदर्शनाची तारीख ठरली! 'या' दिवशी दाखल होणार थिएटरमध्ये

टीम लेटेस्टली

कंगना राणौतचा बहुप्रतिक्षित ‘इमर्जन्सी’ चित्रपटाची रिलीज डेट अखेर समोर आली आहे. कंगनाने त्याबाबतची घोषणा केली. अभिनेत्रीने सांगितले की, चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाकडून ग्रीन सिग्नल मिळाला आहे आणि आता तो पुढील वर्षी 17 जानेवारी 2025 ला प्रदर्शित होणार आहे.

Nawab Malik's Twitter Account Hack: नवाब मलिक यांचे ट्विटर अकाऊंट हॅक; फॉलोअर्संना केलं 'हे' खास आवाहन

Bhakti Aghav

माजी मंत्री नवाब मलिक यांटे एक्स अकाऊंट हॅक झाले आहे. नवाब मलिक यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरील एका पोस्टमध्ये यासंदर्भात माहिती दिली आहे.

Rahul Gandhi Mocks PM Modi-Adani With Poster: 'एक है तो सेफ है' मोहिमेवरुन जोरदार हल्ला; राहुल गांधी यांनी झळकावले नरेंद्र मोदी आणि गौतम अदानी यांचे पोस्टर

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

राहुल गांधी यांनी धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गौतम अदानी यांच्यावर जोरदार टीका केली. या प्रकल्पात त्यांनी पक्षपात केल्याचा आरोप केला आणि महाराष्ट्रातील नोकऱ्या गमावल्याबद्दल चिंता व्यक्त केली.

Advertisement

England vs Ireland, UEFA Nations League 2024-25: इंग्लंडचा आयर्लंडवर 5-0 ने विजय; गुणतालिकेत गाठले पहिले स्थान

टीम लेटेस्टली

इंग्लंड विरुद्ध आयर्लंड UEFA नेशन्स लीग 2024-25 सामन्याच्या पहिल्या सहामाहीतही गोष्टी खूपच अडचणीच्या होत्या. एकाही संघाला एकही गोल करता आला नाही. उत्तरार्धात सामना पूर्णपणे बदलला. हॅरी केनने 53व्या मिनिटाला स्पॉट किकचे गोलमध्ये रूपांतर करून सामन्याला जीवदान दिले.

Maharashtra Election 2024: निवडणूक कर्तव्यांदरम्यान सोमवार आणि मंगळवारी शाळा राहणार सुरू

Shreya Varke

राज्यात सध्या निवडणुकीची हवा पाहायला मिळत आहे. दरम्यान, मतदानाच्या दिवशी शैक्षणिक संस्था सुरु राहणार की बंद याबाबत संभ्रम निर्माण झाले होते. दरम्यान, निवडणुकी दरम्यान सर्व शैक्षणिक संस्था सोमवार आणि मंगळवारी नियमित सुरू राहतील. निवडणूक ड्युटीसाठी नियुक्त शिक्षक असलेल्या शाळांनी वर्ग सुनिश्चित करण्यासाठी शेजारच्या शाळांमधून पर्यायी शिक्षकांची व्यवस्था करणे आवश्यक आहे.

Australia vs Pakistan, 3rd T20I Mini Battle: 'हे' खेळाडू ऑस्ट्रेलिया-पाकिस्तान 3ऱ्या टी 20 सामन्यात एकमेकांना त्रासदायक ठरू शकतात

टीम लेटेस्टली

ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज नॅथन एलिस आणि पाकिस्तानचा स्टार फलंदाज मोहम्मद रिझवान यांच्यातील सामना पाहण्यासारखा असेल. पॉवरप्लेदरम्यान वेगवान धावा करण्यात पटाईत असलेला रिझवान एलिसच्या तफावत आणि संथ चेंडूंवर कितपत प्रभावी ठरेल हे पहावे लागेल.

Chlorine Gas Leak in Iran: इस्फहानमध्ये क्लोरीन गॅस सिलिंडर वाहून नेणारा ट्रेलर ट्रक उलटल्याने 60 जणांना विषबाधा

Shreya Varke

इराणच्या मध्यवर्ती प्रांत इस्फहानमध्ये क्लोरीन वायूच्या गळतीमुळे साठ लोकांना विषबाधा झाली, अशी माहिती अधिकृत वृत्तसंस्था IRNA ने दिली. रविवारी स्थानिक वेळेनुसार 13:40 वाजता प्रांतीय राजधानी इस्फहानच्या दक्षिणेस 80 किमी अंतरावर असलेल्या शाहरेझा काउंटीमधील इंटरसिटी रस्त्यावर क्लोरीन गॅस सिलिंडर वाहून नेणारा ट्रेलर ट्रक उलटला, असे वृत्त शिन्हुआ वृत्तसंस्थेने दिले.

Advertisement

Australia vs Pakistan 3rd T20 2024 Live Streaming In India:  ऑस्ट्रेलिया-पाकिस्तान यांच्यात होणार चुरशीची लढत; येथे जाणून घ्या भारतात थेट सामना कधी, कुठे आणि कसा पहाल?

टीम लेटेस्टली

दुसऱ्या टी 20 सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार जोश इंग्लिसने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियन संघाला निर्धारित 20 षटकात 9 गडी गमावून केवळ 147 धावा करता आल्या.

West Indies vs Bangladesh Test Series 2024 Live Streaming: वेस्ट इंडिज आणि बांगलादेश यांच्यात 22 नोव्हेंबरपासून खेळवली जाणार कसोटी मालिका; थेट सामना कधी, कुठे आणि कसा पहाल

टीम लेटेस्टली

वेस्ट इंडिज आणि बांगलादेश यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. 22 नोव्हेंबरपासून कसोटी मालिका सुरू होणार आहे. उभय संघांमधील पहिला कसोटी सामना अँटिग्वा येथील नॉर्थ साउंड येथील सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियमवर खेळवला जाईल.

Israeli strikes on Lebanon: इस्त्रायलचा लेबनॉनवर हल्ला; टायर प्रदेशात 11 ठार, 48 जखमी, हिजबुल्लाशी तणाव वाढला

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

लेबनॉनच्या टायर प्रदेशात झालेल्या इस्रायली हवाई हल्ल्यात 11 जण ठार आणि 48 जखमी. आयडीएफच्या कारवाईत हिजबुल्लाचे माध्यम प्रमुख मोहम्मद अफीफ यांच्या मृत्यूनंतर हे हल्ले झाले आहेत.

Tamil Nadu: आंध्र प्रदेशातील 3 पर्यटकांना मसिनागुडीजवळ हरणांच्या कळपाला त्रासदिल्याबद्दल 15,000 हजारांचा दंड; व्हिडिओ व्हायरल

टीम लेटेस्टली

अब्दुल्ला खान, अब्दुल अजीज आणि इब्राहिम शेख अशी या तिघांची नावे असून ते सर्व आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. तीन पर्यटक वन्य प्राण्यांना त्रास देत असल्याचा व्हिडिओही ऑनलाइन समोर आला आहे.

Advertisement
Advertisement