Kashmera Shah Accident: अभिनेत्री कश्मीरा शाहचा भीषण अपघात; सोशल मीडियावर रक्ताने माखलेल्या कपड्यांचा फोटो शेअर करत दिली माहिती

अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोत रक्ताने भिजलेले कपडे दिसत आहेत. कश्मिराने इंस्टाग्रामवर पोस्ट करत कॅप्शनमध्ये सांगितले की, हा अपघात किती भीषण होता.

Kashmera Shah Accident (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Kashmera Shah Accident: कृष्णा अभिषेकची पत्नी आणि अभिनेत्री कश्मिरा शाह (Kashmera Shah) एक भीषण अपघात (Accident) झाला. कश्मिरा यांनी अपघाताचा फोटो शेअर करत सोशल मीडियावर माहिती दिली आहे. अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोत रक्ताने भिजलेले कपडे दिसत आहेत. कश्मिराने इंस्टाग्रामवर पोस्ट करत कॅप्शनमध्ये सांगितले की, हा अपघात किती भीषण होता.

कश्मिरा शाहने पोस्ट करत लिहिले आहे की, 'मला वाचवल्याबद्दल देवाचे आभार. हा एक अतिशय धोकादायक अपघात होता. काहीतरी मोठे घडणार होते. आशा आहे की, कोणतेही डाग नसतील. प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण जगा. परत येण्याची वाट पाहू शकत नाही. आज मला माझ्या कुटुंबाची खूप आठवण येत आहे.' (हेही वाचा -Nishigandha Wad Health Update: शुटिंगदरम्यान ज्येष्ठ अभिनेत्री निशिगंधा वाड यांच्या पायाला दुखापत; रुग्णालयात उपचार सुरू)

अभिनेत्री कश्मीरा शाहचा भीषण अपघात - 

 

View this post on Instagram

 

A post shared by Kashmera Shah (@kashmera1)

अपघातावर कृष्णा अभिषेकने दिली प्रतिक्रिया -

कश्मिराच्या या पोस्टवर चाहते आणि सेलिब्रिटी सतत कमेंट करत आहेत. अभिनेत्रीचा पती कृष्णा अभिषेकनेही कमेंट करत लिहिले आहे की, देवाचे आभार मानतो की तु सुरक्षित आहेस. याशिवाय अभिनेत्री दीपशिखा नागपालने लिहिले की, लवकर परत या. तनाज इराणीने म्हटलं आहे की, ओएमजी हे खूप धोकादायक आहे. मला आशा आहे की तू ठीक आहेस. राजेश खट्टर यांनी कमेंटमध्ये लिहिले आहे की, काय झाले कश्मिरा? आशा आहे की सर्व ठीक आहे.

अभिनेत्रीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर कश्मिरा लाफ्टर शेफ शोमध्ये दिसली होती. या शोमध्ये तिचा पती कृष्णा अभिषेक देखील होता. शोमध्ये कश्मिराने खूप धम्माल केली आणि चाहत्यांचे मनोरंजन केले. या शोमध्ये निया शर्मा, करण कुंद्रा, अर्जुन बिलानी, रीम शेख असे स्टार्स होते.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif