PGCIL Recruitment 2024: पीजीसीआयएल भरती; डिप्लोमा आणि ज्युनियर ऑफिसर ट्रेनी पदांसाठी अर्ज करण्यासाठी काहीच तास बाकी; घ्या जाणून

पीजीसीआयएल भरती 2024 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख! डिप्लोमा प्रशिक्षणार्थी, कनिष्ठ अधिकारी प्रशिक्षणार्थी आणि सहाय्यक प्रशिक्षणार्थी पदांसाठी आपले अर्ज 19 नोव्हेंबर 2024 पर्यंत powergrid.in वर सबमिट करु शकतात.

Recruitment | (File Image)

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PGCIL Recruitment 2024) डिप्लोमा प्रशिक्षणार्थी (इलेक्ट्रिकल/सिव्हिल) कनिष्ठ अधिकारी प्रशिक्षणार्थी (HR/F&A) आणि सहाय्यक प्रशिक्षणार्थी (F&A) यासह अनेक प्रशिक्षणार्थी पदांसाठी अर्ज मागवत आहे. अर्ज स्वीकारण्याची शेवटची मुदत आणि प्रक्रिया उद्या, 19 नोव्हेंबर 2024 आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट powergrid.in वर जाऊन तातडीने अर्ज करू शकतात. अन्यथा, त्यांना चांगल्या संधीला मुकावे लागू शकते. सुरुवातीला 12 नोव्हेंबर 2024 साठी निश्चित केलेली मुदत अर्जदारांना अतिरिक्त वेळ देण्यासाठी वाढवण्यात आली होती. जी आता समाप्त होणार आहे.

तात्पुरत्या लेखी परीक्षेचे वेळापत्रक

अधिकृत अधिसूचनेनुसार, या पदांसाठी लेखी परीक्षा जानेवारी किंवा फेब्रुवारी 2025 मध्ये होण्याची शक्यता आहे, ज्याच्या अचूक तारखा अधिकृत वेबसाइटवर जाहीर केल्या जातील. हे वृत्त लिहीपर्यंत तरी सरकारी नोकरीच्या या वेळेपत्रकाबाबत कोणत्याही प्रकारचा तपशील आला नाही. अधिकृत अधिसूचनेनुसार, या पदांसाठी लेखी परीक्षा जानेवारी किंवा फेब्रुवारी 2025 मध्ये होणे अपेक्षित आहे, अचूक तारखा PGCIL वेबसाइटवर जाहीर केल्या जातील. (हेही वाचा, ER Rercuitment 2024: रेल्वेत नोकरची मोठी संधी! ईस्टर्न झोनमध्ये ग्रुप सी आणि डीमध्ये 60 पदांसाठी नोकर भरती; 'या' तारखेपर्यंत करा अर्ज)

PGCIL भरती 2024 साठी पात्रता निकष

डिप्लोमा ट्रेनी (इलेक्ट्रिकल)

पात्रता: पूर्ण-वेळ, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रिकल (पॉवर), इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स, पॉवर सिस्टम्स अभियांत्रिकी किंवा पॉवर इंजिनिअरिंग (इलेक्ट्रिकल) मध्ये तीन वर्षांचा डिप्लोमा.

गुणांची आवश्यकता:

सामान्य/OBC (NCL)/EWS: किमान 70%.

SC/ST/PwBD: उत्तीर्ण गुण.

डिप्लोमा ट्रेनी (सिव्हिल)

पात्रता: मान्यताप्राप्त तांत्रिक मंडळ किंवा संस्थेकडून सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पूर्ण-वेळ, तीन वर्षांचा डिप्लोमा.

गुणांची आवश्यकता:

सामान्य/OBC (NCL)/EWS: किमान 70%.

SC/ST/PwBD: उत्तीर्ण गुण.

कनिष्ठ अधिकारी प्रशिक्षणार्थी (एचआर)

पात्रता: मान्यताप्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून बीबीए, बीबीएम, बीबीएस किंवा समतुल्य तीन वर्षांची पूर्ण-वेळ पदवी.

गुणांची आवश्यकता:

सामान्य/ओबीसी (NCL)/EWS: किमान 60%.

कनिष्ठ अधिकारी प्रशिक्षणार्थी (F&A)

पात्रता: इंटर सीए किंवा इंटर सीएमए.

टीप: पदव्युत्तर पदवी, CA, CMA किंवा समकक्ष यासारख्या उच्च पात्रता पात्र नाहीत.

सहाय्यक प्रशिक्षणार्थी (F&A)

पात्रता: मान्यताप्राप्त विद्यापीठातून B.Com पदवी.

गुणांची आवश्यकता:

सामान्य/ओबीसी (NCL)/EWS: किमान 60%.

SC/ST/PwBD: उत्तीर्ण गुण.

अर्ज कसा करावा

मुख्य तारखा

अर्ज करण्याची अंतिम मुदत: नोव्हेंबर 19, 2024.

तात्पुरत्या परीक्षेच्या तारखा: जानेवारी/फेब्रुवारी 2025.

इच्छुक उमेदवारांना अंतिम मुदतीपूर्वी अर्ज करण्याचा आणि या प्रतिष्ठित सरकारी संस्थेत स्थान मिळवण्यासाठी भरती परीक्षांची तयारी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

दरम्यान, उमेदवारांनी परीक्षेच्या वेळापत्रकाच्या अद्ययावत माहितीसाठी आणि इतर तपशिलांसह माहितीच्या अचूकतेसाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. अपात्रता टाळण्यासाठी सर्व कागदपत्रे निर्दिष्ट पात्रता निकषांची पूर्तता करतात याची खात्री करावी, असेही आम्ही सूचवतो.