Ranveer Brar Suffers Severe Spine Injury: The Buckingham Murders फेम अभिनेता रणवीर ब्रारला मणक्याला गंभीर दुखापत
ही बातमी ऐकल्यानंतर रणवीरचे चाहते त्याच्या प्रकृतीसंदर्भात अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. पिंकविलाने दिलेल्या वृत्तानुसार, रणवीरचा अपघात झाला असून त्याच्या मणक्याला फ्रॅक्चर झाल्याचे सांगितले जात आहे.
Ranveer Brar Suffers Severe Spine Injury: नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'द बकिंगहॅम मर्डर्स' (The Buckingham Murders) या चित्रपटातील अभिनेता रणवीर ब्रार (Ranveer Brar )बद्दल मोठी बातमी समोर येत आहे. अभिनेताला पाठीच्या कण्याला दुखापत (Spine Injury) झाली आहे. ही बातमी ऐकल्यानंतर रणवीरचे चाहते त्याच्या प्रकृतीसंदर्भात अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. पिंकविलाने दिलेल्या वृत्तानुसार, रणवीरचा अपघात झाला असून त्याच्या मणक्याला फ्रॅक्चर झाल्याचे सांगितले जात आहे.
रणवीर ब्रारच्या पाठीच्या कण्याला दुखापत -
सेलिब्रिटी शेफबाबतच्या या बातमीमुळे चाहते अभिनेत्याची काळजी करत आहेत. पाठीच्या कण्याला दुखापत झाल्यानंतर रणवीरला डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला असून तो आता बरा होत आहे. पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, रणवीर ब्रारच्या मणक्यातील C6 आणि C7 वेर्टेब्राला फ्रॅक्चर झाले आहे. या दुखापतीनंतर त्याला तीन आठवड्यांच्या विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे, त्यानंतर रणवीर आता रिकव्हरी मोडवर आहे. (हेही वाचा - Kashmera Shah Accident: अभिनेत्री कश्मीरा शाहचा भीषण अपघात; सोशल मीडियावर रक्ताने माखलेल्या कपड्यांचा फोटो शेअर करत दिली माहिती)
रणवीर सोशल मीडियावर सक्रिय -
रणवीर सोशल मीडियावर सक्रिय असून सतत पोस्ट शेअर करत असतो. तो स्वत: हे पोस्ट करत आहे की, त्याची टीम त्याचे खाते हाताळत आहे हे सांगणे कठीण आहे. परंतु चाहत्यांना आशा आहे की जर रणवीर सोशल मीडियावर सक्रिय असेल, तर तो लवकरच त्याच्या प्रकृतीसंदर्भातील अपडेट चाहत्यांसोबत शेअर करेल. रणवीरने काही तासांपूर्वी त्याच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट देखील शेअर केली आहे, ज्याचे कॅप्शन लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. (हेही वाचा -Nishigandha Wad Health Update: शुटिंगदरम्यान ज्येष्ठ अभिनेत्री निशिगंधा वाड यांच्या पायाला दुखापत; रुग्णालयात उपचार सुरू)
रणवीरने त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्याने त्याचे तीन फोटो शेअर केले आहेत. पोस्ट शेअर करताना त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, दृश्य जितके सुंदर आहे तितकेच खड्डेही धोकादायक आहेत. दरम्यान, यूजर्संनी रणवीरच्या या पोस्टवर कमेंट केल्या आहेत. एका यूजरने या पोस्टवर कमेंट करताना लिहिले की, तुमचे म्हणणे बरोबर आहे. दुसऱ्या युजरने लिहिले की, आता तुमची प्रकृती कशी आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)