‘Taarak Mehta Ka Ooltah Chashmah’  मधली सोनू लवकरच अडकणार विवाहबंधनात; तारीख माहित आहे का?

आजही मनोरंजनासाठी ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिका घरोघरी आवर्जुन पाहिली जाते. या मालिकेतील सोनू भिडे लवकरच लग्न करणार आहे.

Photo Credit- X

‘Taarak Mehta Ka Ooltah Chashmah’ : गेल्या अनेक वर्षांपासून ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन करत आहे. आजही मनोरंजनासाठी ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिका(Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) घरोघरी आवर्जुन पाहिली जाते. या मालिकेतील सोनू भिडे लवकरच लग्न करणार आहे. ‘ई-टाइम्स’च्या वृत्तानुसार, अभिनेत्री झील मेहता (Jheel Mehta  Wedding) स्वतःच्या लग्नासाठी खूप उत्सुक आहे. तसंच आता लग्नाची तारीख देखील ठरली आहे. २८ डिसेंबरला झील बॉयफ्रेंड आणि कंटेंट क्रिएटर आदित्य दुबेसोबत लग्नणार आहे. झीलने जानेवारी २०२४मध्ये आदित्य दुबेबरोबर साखरपुडा केला होता. (हेही वाचा: The Sabarmati Report : 'बनावट कथा केवळ...'; पंतप्रधान मोदींची 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटावर प्रतिक्रिया)

अलीकडेच घराचा सुंदर व्हिडीओ तिने शेअर केला होता. ज्यामध्ये लग्नाची तयारी पाहायला मिळाली होती. झील आणि आदित्य लग्नासाठी सध्या डान्स प्रॅक्टिस करत आहेत. लग्नाबाबत झील मेहता म्हणाली की, लग्न पारंपरिक पद्धतीने होणार आहे. ज्यामध्ये समकालीन वस्तूंचा वापर केला जाणार आहे. लग्न हे माझ्यासाठी सर्वात मोठं साहस आहे. त्यानंतर झीलला विचारलं की, ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ची टीम लग्नाला येणार आहे का? तर अभिनेत्री म्हणाली, “माझं लग्न फक्त जवळचे मित्रमंडळी आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत होणार आहे. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ची टीम रिसेप्शनला येणार आहे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Jheel Mehta (@jheelmehta_)

झीलच मेहताच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, अभिनय क्षेत्र सोडून ती मेकअप आर्टिस्ट झाली होती. त्यानंतर आता ती सेफ स्टूडंट हाउसिंग नावाचा स्वतःचा व्यवसाय करत आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना राहण्याची व भोजनाची सोय केली जाते.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif