Pakistan Beggar Feast: काय सांगता? पाकिस्तानी भिकाऱ्याने तब्बल 20 हजार लोकांना दिली मेजवानी; खर्च केले 1.25 कोटी, व्हिडीओ व्हायरल (Watch Video)
त्यांच्यासाठी अनेक पदार्थांची मेजवानी आयोजित केली गेली.
Pakistan Beggar Feast: पाकिस्तानची (Pakistan) आर्थिक परिस्थिती गेल्या अनेक वर्षांपासून खराब आहे. देशातील गरिबीच्या अनेक बातम्या समोर आल्या आहेत. एकीकडे लोकांना खायला मिळत नाही, तर दुसरीकडे पैशांच्या उधळपट्टीचे एक असे प्रकरण समोर आले आहे, ज्याची सर्वत्र चर्चा होत आहे. पाकिस्तानातील एका भिकारी कुटुंबाने आपल्या आजीच्या मृत्युच्या 40 व्या दिवशी तब्बल 20 हजार भिकाऱ्यांसाठी मेजवानी आयोजित केली होती. यासाठी 1.25 कोटी पाकिस्तानी रुपये खर्च केले गेले. या कार्यक्रमाचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. ही खास मेजवानी सध्या चर्चेचा विषय बनली आहे.
पाकिस्तानातील गुंजारावाला (Gujranwala) येथील एका भिकारी कुटुंबाने आजीच्या मृत्युनंतर आयोजित केलेल्या भव्य सोहळ्यात पंजाबमधील अनेक शहरांतील हजारो लोक सहभागी झाले होते. त्यांच्यासाठी अनेक पदार्थांची मेजवानी आयोजित केली गेली. पारंपारिक नाश्त्याच्या मेन्यूने समारंभाची सुरुवात झाली. संध्याकाळी, मेजवानीत एक विशेष डिश देण्यात आली, ज्यासाठी 250 बकऱ्या कापल्या गेल्या. त्यात मटण, नान, गोड भात, सफरचंद आणि गाजरचे अनेक खास पदार्थ आणि अनेक पेये यांचा समावेश होता. (हेही वाचा: Maharashtra Economy Bigger Than Pakistans: काय सांगता? महाराष्ट्राची अर्थव्यवस्था पाकिस्तानपेक्षा मोठी; एकट्या मुंबईमध्ये राहतात 94 अब्जाधीश)
पाकिस्तानी भिकाऱ्याने तब्बल 20 हजार लोकांना दिली मेजवानी-
गुजरांवाला कँट परिसरातील राहवली रेल्वे स्थानकाजवळ या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये हजारो पाहुण्यांना खास शामियान्यात बसवून जेवण देण्यात आले. कुटुंबाने अभ्यागतांना मेजवानीच्या स्थानावर नेण्यासाठी 2,000 हून अधिक वाहनांची सोय केली होती. जेवण झाल्यावर पाहुण्यांनी या कुटुंबाचे खूप कौतुक केले. या सोहळ्यावर झालेल्या अंदाधुंद खर्चामुळे या भिकारी कुटुंबाच्या जीवनशैलीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, एवढा पैसा आला कुठून? असा प्रश्न निर्माण होत आहे.