Mumbai Shocker: गॅस कर्मचारी भासवून सोन्याच्या दागिन्यांची लूट; घाटकोपरमधील घटना, दोघांवर गुन्हा दाखल

शनिवारी 16 नोव्हेंबर रोजी घटना उघडकीस आली.

Gold | File Image

Mumbai Shocker: घाटकोपरमध्ये (Ghatkopar) महानगर गॅस कर्मचारी असल्याचे सांगत 2 जणांनी एका वृद्ध महिलेचे सोन्याचे दागिने चोरून (Theft) नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एका 52 वर्षीय महिलेचे सोन्याचे दागिने चोरल्याप्रकरणी(Robbery) मुंबई पोलिसांनी दोन अज्ञात व्यक्तींवर शनिवारी १६ नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल केला आहे. हिंदुस्तान टाईम्सने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, घाटकोपर पश्चिम येथे राहणारी गृहिणी हेमलता गांधी या दुपारी साडेचारच्या सुमारास घरी एकट्या होत्या. तेव्हा ही घटना घडली. सध्या मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. (कल्याण रेल्वे स्टेशन वर पोलिसांचा गाडीतून पडून मृत्यू)

एका अज्ञात व्यक्तीने दारावरची बेल वाजवली. महानगर गॅस कंपनीचे कर्मचारी असल्याचे सांगून त्यांनी गॅस गळती तपासण्याची गरज असल्याचे सांगितले. गांधींनी त्या माणसाला त्यांच्या घरात प्रवेश दिला. तो गॅस कनेक्शन तपासण्यासाठी स्वयंपाकघरात गेला. काही मिनिटांनी दरवाजा उघडा असल्याने दुसरा माणूस घरात घुसला आणि आतून दरवाजा बंद केला. त्यानंतर आरोपींनी गांधी यांना जमिनीवर बसवले. त्यांना बांधले, आरडाओरडा केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. घटनास्थळावरून पळून जाण्यापूर्वी त्यांनी तिच्या सोन्याच्या बांगड्या, मंगळसूत्र आणि 3 लाख रुपये किमतीची सोन्याची चेन जबरदस्तीने काढून घेतली. (Jalgaon Firing: धक्कादायक! अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार; जळगाव शहरातील घटना; विधानसभा निवडणूक प्रचाराचा आज शेवटचा दिवस)

आरोपींचे वाय 25-30 वयोगटातील असल्याचे त्यांनी सांगितले. त्याशिवाय, ते हिंदीत संभाषण करत होते. त्यांनी गांधींना मारहाण केली. या मारहाणीत त्यांच्या उजव्या डोळ्याला आणि चेहऱ्याला दुखापत झाली. सध्या मुंबई पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. घटनेनंतर गांधी यांनी त्यांच्या पतीला माहिती दिली आणि त्यांनी घाटकोपर पोलिसांना गुन्ह्याची माहिती दिली. त्यांच्या तक्रारीच्या आधारे, अज्ञात संशयितांवर भारतीय न्याय संहिता (बीएनएस) च्या कलम 309(6) (दरोडेखोर टोळी) आणि 3(5) (संयुक्त गुन्हेगार) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपासत करत आहेत. गुन्हेगारांना ओळखण्यासाठी मागील गुन्हेगारी रेकॉर्ड तपासत आहेत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif