ठळक बातम्या

Zimbabwe vs Afghanistan, 2nd T20I Match 2024 Live Toss Update: अफगाणिस्तानचा कर्णधार राशिद खानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा घेतला निर्णय

Amol More

दुसऱ्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात अफगाणिस्तानचा कर्णधार राशिद खानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

Principal Secretary to CM Devendra Fadnavis: वरिष्ठ आयएएस अधिकारी Ashwini Bhide यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रधान सचिवपदी बढती

Prashant Joshi

सध्या मुंबई रेल कॉर्पोरेशनच्या एमडी असलेल्या अश्विनी भिडे या ब्रिजेश सिंह यांच्या जागी येणार आहेत. या नवीन जबाबदारीसोबत, योग्य बदली मिळेपर्यंत त्या मुंबई मेट्रोमध्ये नोकरी सुरू ठेवतील.

Nagpur Winter Session: देवेंद्र फडणवीस नागपूरातील 'रामगिरीत' तर एकनाथ शिंदे 'देवगिरी' बंगल्यात राहणार; अजित पवारांना देण्यात आलं 'विजयगड' निवासस्थान

Bhakti Aghav

देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री म्हणून नंबर दोनवर राहतील. या पार्श्वभूमीवर त्यांना नागपूरचा देवगिरी बंगला (Devgiri Bungalow) देण्यात येत आहे. तर राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पूर्वीप्रमाणेच विजयगड बंगला देण्यात आला आहे.

IND vs AUS 3rd Test 2024 Preview: गाबामध्ये इतिहास रचण्याचा टीम इंडियाचा निर्धार, बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या तिसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाकडून कडवी टक्कर, जाणून घ्या हेड टू हेड रेकॉर्ड, मिनी बॅटल, स्ट्रीमिंग यासह सर्व तपशील

Amol More

दुसऱ्या कसोटीत भारतीय फलंदाजी पूर्णपणे विस्कळीत झाली. पर्थमध्ये संघाने उत्कृष्ट फलंदाजी दाखवली असताना ॲडलेडमध्ये मात्र उलट चित्र पाहायला मिळाले. कर्णधारपदातील त्रुटी आणि गोलंदाजीतील अननुभवीपणामुळे संघाचे मोठे नुकसान झाले.

Advertisement

Thane Triple Talaq Case: एकटीच फिरायला गेली पत्नी; चिडलेल्या पतीने दिला ट्रिपल तलाक, ठाण्यातील धक्कादायक घटना, गुन्हा दाखल

Prashant Joshi

मुंब्रा भागातील रहिवासी असलेल्या आरोपीने मंगळवारी आपल्या 25 वर्षीय पत्नीच्या वडिलांना फोन केला आणि सांगितले की तो 'तिहेरी तलाक'द्वारे त्यांचे लग्न रद्द करत आहे, कारण त्याची पत्नी एकटी फिरायला जात होती.

Vinod Kambli Health: 'पुनर्वसन केंद्रात जायला तयार', विनोद कांबळी यांनी उलघडला प्रवास; सचिन तेंडूलकर, अजय जडेजा यांच्याबद्दलही सागितल्या आठवणी

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी त्याच्या आरोग्याची भीती, कौटुंबिक आधार आणि सचिन तेंडुलकर यांच्याशी असलेल्या त्याच्या नात्याबद्दल पुन्हा एकदा भाष्य केले आहे. काय म्हणाला क्रिकेटपटू घ्या जाणून.

Nana Patole's Letter To Mallikarjun Kharge: मला पदमुक्त करा..! नाना पटोले यांचे मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र

Bhakti Aghav

काँग्रेसचा या निवडणुकीमध्ये दारुण पराभव झाला असल्याने अंतर्गत गटबाजी त्याचप्रमाणे लोकांपर्यंत नाना पटोले यांच्याबाबत असलेल्या स्पष्ट स्वभावाच्या काही गोष्टी मान्य नसल्याने काँग्रेसच्या अनेक नेते व कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर होता. म्हणूनच काँग्रेसमधील एक गट नाना पटोले यांना पदमुक्त करण्याबाबत आग्रही असताना दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वतःहूनच विधानसभेतील पराभवानंतर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

Vinod Kambli On Sachin Tendulkar: सचिन तेंडुलकरवर विनोद कांबळीचे मोठे वक्तव्य, सांगितले की मदत केली की नाही?

Amol More

कांबळी आणि सचिन लहानपणापासूनचे मित्र आहेत. या दोघांनी रमाकांत आचरेकर यांच्याकडून प्रशिक्षण घेतले आणि त्यांच्या सुरुवातीच्या क्रिकेट कारकिर्दीत चमकदार कामगिरी केली. कांबळीने नुकतेच स्पष्ट केले की 2009 मध्ये सचिनबद्दल त्याने केलेल्या टिप्पण्या त्याच्या मानसिक समस्यांमुळे होत्या.

Advertisement

MUM Beat BRD, SMAT 2024 Semi Final 1 Scorecard: मुंबईचा बडोद्यावर 6 विकेट्सने विजय; सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या अंतिम फेरीत प्रवेश, अंजिक्य रहाणेच्या शानदार 98 धावा

Amol More

अजिंक्य रहाणेने 56 चेंडूत 10 चौकार आणि 4 षटकारांसह 98 धावांची नाबाद खेळी खेळली. रहाणेसह श्रेयस अय्यरने 30 चेंडूत 46 धावा करत संघाला मजबूत स्थितीत आणले.

Priyanka Gandhi on Constitution and Reservation: प्रियंका गांधी यांचे पहिलेच भाषण दणदणीत, संविधान आणि आरक्षणावर मुद्द्यांवरुन भाजपवर हल्लाबोल

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

वायनाडमधून नवनिर्वाचित खासदार प्रियंका गांधी यांनी संसदेत आपले पहिले भाषण केले, भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारवर टीका करताना संविधान आणि आरक्षणावर लक्ष केंद्रित केले.

Goa Shocker: 32 किमी मॅरेथॉनमध्ये पदक जिंकून घरी आल्यानंतर 39 वर्षीय दंत शल्यचिकित्सकचा मृत्यू

Bhakti Aghav

डॉ. कुडाळकर यांच्या पश्चात पत्नी आणि आठ वर्षांचा मुलगा आहे. त्यांच्या इंस्टाग्राम प्रोफाइलनुसार, ते स्वतःचे एक उत्साही हाफ मॅरेथॉन धावपटू, सायकलस्वार आणि क्लब बॅडमिंटनपटू म्हणून वर्णन करतात. गेल्या काही वर्षांत त्यांनी अनेक हाफ मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला असून त्यासोबतच त्यांनी सायकलिंग आणि बॅडमिंटन स्पर्धांमध्येही सहभाग घेतला होता.

IND vs AUS 3rd Test 2024: पॅट कमिन्सने ब्रिस्बेन कसोटीसाठी ऑस्ट्रेलियन प्लेइंग XI केली जाहीर, हेझलवूड संघात परतला

Amol More

ॲडलेडमधून वगळण्यापूर्वी हेझलवूडने पर्थ कसोटी सामन्यातही चांगली गोलंदाजी केली होती. दुसऱ्या कसोटीत त्याच्या जागी स्कॉट बोलंडला घेण्यात आले होते.

Advertisement

SC On Judge: 'न्यायाधीशांनी Facebook वापरू नये, साधूंसारखं जगावं आणि घोड्यांसारखं काम करावं'; सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी

Bhakti Aghav

न्यायाधीशांनी संन्यासीसारखे जगावे आणि घोड्यासारखे काम करावे, असंही सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांनी म्हटलं आहे. न्यायमूर्ती बीव्ही नागरथना आणि न्यायमूर्ती एन कोतीश्वर सिंह यांच्या खंडपीठाने ही मौखिक टिप्पणी केली. सर्वोच्च न्यायालयाचे हे खंडपीठ मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने दोन महिला न्यायिक अधिकाऱ्यांना बडतर्फ केल्याच्या प्रकरणाची सुनावणी करत होते.

Allu Arjun Arrested: तेलगू अभिनेता अल्लू अर्जुन यास अटक, जाणून घ्या कारण

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

तेलगू अभिनेता अल्लू अर्जुन (Allu Arjun) याला हैदराबादमधील पुष्पा 2 (Pushpa 2) प्रीमियरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीप्रकरणी अटक करण्यात आली आहे, ज्यामध्ये एकाचा मृत्यू झाला आणि अनेक जखमी झाले.

Baba Vanga 2025 Prediction: 'पूर्वेतील युद्ध पश्चिमेचा नाश करेल', बाबा वांगा यांची 2025 वर्षासाठी भविष्यवाणी

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

बाबा वांगा यांनी 2025 साठी (Baba Vanga 2025 Prediction) अनेक भाकीते केली आहे. ज्यामध्ये युद्धाचे इशारे, एलियन संपर्क, टेलिपॅथी प्रगती आणि मानवतेला पुन्हा आकार देऊ शकणाऱ्या वैज्ञानिक प्रगतीचा समावेश आहे.

Raj Thackeray on D. Gukesh: "बुद्धिबळाचा हा खेळ भारतात, महाराष्ट्रात वृद्धिंगत होऊ दे..." डी गुकेशसाठी राज ठाकरेंची खास पोस्ट

Amol More

गुकेश बुद्धिबळाच्या इतिहासातील सर्वात तरुण विश्वविजेता ठरला आहे. गुरुवारी, 12 डिसेंबर रोजी चॅम्पियनशिपच्या 14व्या आणि शेवटच्या फेरीत दोघांमध्ये चुरशीची स्पर्धेत त्यांने विजेतेपद पटकावले.

Advertisement

RBI Receives Bomb Threat: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया उडवण्याची धमकी, रशियन भाषेत आला ई-मेल

Bhakti Aghav

आरबीआयच्या अधिकृत वेबसाइटवर प्राप्त झालेल्या रशियन भाषेतील (Russian Language) ईमेलमध्ये मुंबईतील आरबीआयला उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. आरबीआयमध्ये नियोजित स्फोटाचा इशारा देण्यात आला आहे.

ZIM vs AFG 2nd T20I 2024 Preview: अफगाणिस्तान दुसऱ्या टी-20मध्ये पुनरागमन करणार की झिम्बाब्वे मालिका जिंकणार; सामन्याचे हेड टू हेड रेकॉर्ड, मिनी बॅटलसह स्ट्रीमिंगची माहिती घ्या जाणून

Amol More

T20 सामन्यांमध्ये झिम्बाब्वे विरुद्ध अफगाणिस्तान हेड टू हेड रेकॉर्ड (ZIM vs AFG हेड टू हेड रेकॉर्ड): अफगाणिस्तान आणि झिम्बाब्वे यांच्यात आतापर्यंत एकूण 16 सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये अफगाणिस्तानने 14 सामने जिंकून आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.

Share Trading Frauds: शेअर बाजार घोटाळा, मुंबईतील दोन सुशिक्षित महिलांची दोन कोटी रुपयांची फसवणूक

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Cybercrime in Mumbai: बनावट अॅप्सद्वारे शेअर ट्रेडिंग घोटाळ्यात मुंबईच्या दोन महिलांचे 2 कोटी रुपयांहून अधिक नुकसान. मुंबई सायबर पोलिसांकडून अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल. जाणून घ्या काय घडले नेमके

ICC Test Batting Rankings: हॅरी ब्रूक कसोटीत जागतिक क्रमवारीत नंबर-1 फलंदाज बनला, आयसीसीच्या ऑलटाईम क्रमवारीत अनेक दिग्गजांना टाकले मागे; सचिनची केली बरोबरी

Amol More

आयसीसीच्या सर्वकालीन कसोटी फलंदाजी क्रमवारीत हॅरी ब्रूक 898 गुणांसह 34 व्या क्रमांकावर आहे. पण त्याने अनेक दिग्गजांना पराभूत केले आहे. यात अँडी फ्लॉवर 895 गुण, स्टीव्ह वॉ 895 गुण, राहुल द्रविड 892 गुण, महेला जयवर्धने 883 गुण, ग्रेग चॅपेल 883 गुण यांसारख्या दिग्गज क्रिकेटपटूंचा समावेश आहे.

Advertisement
Advertisement