ICC Test Batting Rankings: हॅरी ब्रूक कसोटीत जागतिक क्रमवारीत नंबर-1 फलंदाज बनला, आयसीसीच्या ऑलटाईम क्रमवारीत अनेक दिग्गजांना टाकले मागे; सचिनची केली बरोबरी

आयसीसीच्या सर्वकालीन कसोटी फलंदाजी क्रमवारीत हॅरी ब्रूक 898 गुणांसह 34 व्या क्रमांकावर आहे. पण त्याने अनेक दिग्गजांना पराभूत केले आहे. यात अँडी फ्लॉवर 895 गुण, स्टीव्ह वॉ 895 गुण, राहुल द्रविड 892 गुण, महेला जयवर्धने 883 गुण, ग्रेग चॅपेल 883 गुण यांसारख्या दिग्गज क्रिकेटपटूंचा समावेश आहे.

Harry Brook (Photo Credit - X)

ICC Test Batting Rankings: इंग्लंडचा युवा फलंदाज हॅरी ब्रूकने (Harry Brook) आपल्या शानदार कामगिरीने क्रिकेट विश्वात खळबळ उडवून दिली आहे. ब्रूकने वेलिंग्टनमध्ये न्यूझीलंडविरुद्ध 323 धावांनी विजय मिळवत आपले आठवे कसोटी शतक झळकावले. यासह, त्याने त्याचा अनुभवी सहकारी जो रूटला मागे टाकले आणि आयसीसी कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत पहिले स्थान गाठले. 2024 वर्ष संपण्यापूर्वी हॅरी ब्रूकने 898 गुणांसह ICC कसोटी फलंदाजी क्रमवारीत प्रथम क्रमांक मिळवला आहे. (हेही वाचा  -  ENG Playing XI for 3rd Test 2024 vs NZ: न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीसाठी मॅथ्यू पॉट्सचे पुनरागमन, हॅमिल्टन कसोटीसाठी इंग्लंडने प्लेइंग इलेव्हनची केली घोषणा)

आयसीसीच्या सर्वकालीन क्रमवारीत अनेक दिग्गजांना मागे टाकले

मात्र, आयसीसीच्या सर्वकालीन कसोटी फलंदाजी क्रमवारीत हॅरी ब्रूक 898 गुणांसह 34 व्या क्रमांकावर आहे. पण त्याने अनेक दिग्गजांना पराभूत केले आहे. यात अँडी फ्लॉवर 895 गुण, स्टीव्ह वॉ 895 गुण, राहुल द्रविड 892 गुण, महेला जयवर्धने 883 गुण, ग्रेग चॅपेल 883 गुण यांसारख्या दिग्गज क्रिकेटपटूंचा समावेश आहे.

ब्रूकने सचिनची केली बरोबरी 

आयसीसीच्या सर्वकालीन कसोटी फलंदाजी क्रमवारीत सचिन तेंडुलकरसह हॅरी ब्रूक 34 व्या क्रमांकावर आहे. दोघांचे 898 गुण आहेत. हॅरी ब्रूकने 10 डिसेंबर 2024 रोजी न्यूझीलंडविरुद्ध हे गुण मिळवले. सचिन तेंडुलकरने 25 फेब्रुवारी 2002 रोजी झिम्बाब्वेविरुद्ध 898 गुण मिळवले होते.

ब्रुक विराट कोहलीपासून खूप दूर 

आयसीसीच्या सर्वकालीन कसोटी फलंदाजी क्रमवारीत विराट कोहली 11व्या क्रमांकावर आहे. कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत विराट कोहलीचे 937 गुण आहेत. कोहलीने 22 ऑगस्ट 2018 रोजी इंग्लंडविरुद्ध हे गुण मिळवले होते.

डॉन ब्रॅडमन आघाडीवर आहेत

ऑस्ट्रेलियन दिग्गज डॉन ब्रॅडमन आयसीसीच्या सर्वकालीन कसोटी फलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे. त्याचे फलंदाजीचे रेटिंग 961 गुण आहे. ब्रॅडमन यांनी 10 फेब्रुवारी 1948 रोजी भारताविरुद्ध हे गुण मिळवले होते.

हॅरी ब्रूकची कसोटी कारकीर्द

25 वर्षीय हॅरी ब्रूकची परदेशी भूमीवरची कामगिरी त्याला इतर फलंदाजांपेक्षा वेगळी ठरवते. परदेशात त्याची कसोटी सरासरी 89.35 आहे, जी त्याच्या घरच्या 38.05 च्या सरासरीपेक्षा खूप चांगली आहे. ब्रूकने 23 कसोटी सामन्यात 61.62 च्या सरासरीने 2280 धावा केल्या आहेत. यामध्ये 8 शतके आणि 10 अर्धशतकांचा समावेश आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now