Share Trading Frauds: शेअर बाजार घोटाळा, मुंबईतील दोन सुशिक्षित महिलांची दोन कोटी रुपयांची फसवणूक
Cybercrime in Mumbai: बनावट अॅप्सद्वारे शेअर ट्रेडिंग घोटाळ्यात मुंबईच्या दोन महिलांचे 2 कोटी रुपयांहून अधिक नुकसान. मुंबई सायबर पोलिसांकडून अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल. जाणून घ्या काय घडले नेमके
शेअर बाजार घोटाळा (Share Trading Scam) टाळण्यासाठी सेबी आणि सायबर पोलीस नेहमीच जनजागृती करतात. कोणत्याही फसव्या आणि खोट्या आमिशांना बळी पडू नये यासाठी नागरिकांना अनेकदा अवाहन केले जाते. तरीसुद्धा अल्प काळात मोठा फायदा मिळविण्याच्या लालसेने अनेक लोक सायबर गुन्हेगार किंवा भामट्यांच्या कच्छपी लागतात.परिणामी त्यांना मोठे आर्थिक नुकसान (Financial Scams) सहन करावे लागते. मुबई येथील दोन सुशीक्षित महिलांना बनावट ट्रेडिंग अॅप्स (Fake Trading Apps) वापरणे आणि फेसबुकवरील एका जाहिरातीला प्रतिसाद चांगलेच महागात पडले आहे. ज्यामध्ये या सायबर घोटाळा (Mumbai Cyber Fraud) प्रकरणात दोघींना मिळून तब्बल दोन कोटी रुपयांच्या नुकसानीस सामोरे जावे लागले आहे. यातील एक महिला मुलुंड येथील असूनती 42 वर्षांची तर दुसरी महिला खार येथील असून, ती 53 वर्षांची आहे. दोघींसोबत शेअर ट्रेडींग घोटाळा घडला असला तरी, दोन्ही घटना वेगवेगळ्या आहेत.
शेअर ट्रेडिंग घोटाळा: दोन घटना
घटना क्रमांक एक: मुलुंड येथील एका 42 वर्षीय महिलेने फेसबुकवरील एका जाहिरातीला प्रतिसाद दिल्याने तिस 1.2 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. फेसबुकवर क्लिक केल्यानंतर लिंकवर क्लिक केल्यावर, तिचा फोन नंबर एका व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये जोडला गेला ज्याने स्टॉक ट्रेडिंगच्या टिपा सामायिक (शेअर) केल्या. मुंबईतील सायबर घोटाळा प्रकरणात महत्त्वाचा घटक असलेला रवी अग्रवाल म्हणून स्वतःची ओळख असलेल्या गटाच्या सदस्यांपैकी एकाने तिला 'एमस्टॉक मॅक्स' नावाचे ट्रेडिंग अॅप डाउनलोड करण्यासाठी विश्वासात घेतले. त्याच्यावर विश्वास ठेऊन तिने हे अॅप डाऊनलोड केले. धक्कादायक म्हणजे या अॅपच्या वैधतेबाबत पीडितेला जराही संशय आला नाही. या अॅपमध्ये ट्रेडींग, आयपीओ, आणि पैसे भरणे आणि काढणे असेकाही पर्याय होते. (हेही वाचा, Mumbai Cyber Fraud: भारतीय लष्कराचे बनावट ओळखपत्र दाखवत मुंबईतील महिलेची ऑनलाइन फसवणूक, घर खरेदी करण्याच्या नावाखाली घातला 3.68 लाखांचा गंडा)
पीडितेकडून सूचनांचे पालन
मुलुंड येथील घटनेतील पीडितेने अग्रवालच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन केले आणि ऑक्टोबरपर्यंत अॅपद्वारे 1.2 कोटी रुपयांची गुंतवणूक केली. अॅपवरील तिच्या प्रोफाईलमध्ये सातत्यपूर्ण नफा दिसून आला. तथापि, जेव्हा तिने रक्कम काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा अग्रवालने 20% दंडाची मागणी केली. आपल्यासोबत फसवणूक झाल्याचा तिला संशय आला. त्यामुळे तिने केलेल्या अधिक तपासणीत तिस घोटाळ्याची जाणीव झाल्याने तिने पुढील व्यवहार थांबवले. दरम्यान, तिने सायबर पोलिसांमध्ये जाऊन तक्रार नोंदवली. सायबर पोलिसांनी प्राप्त तक्रारीवरुन 29 नोव्हेंबर रोजी अज्ञात व्यक्तीविरोधात एफआयआर नोंदवला.
खार येथे घरकाम करणाऱ्याची 78 लाखांची फसवणूक
घटना क्रमांक दोन: दुसऱ्या एका घटनेत मुंबई शहरातीलच खार येथील 53 वर्षीय गृहिणीचे अशाच प्रकारच्या घोटाळ्यामुळे 78 लाख रुपयांचे नुकसान झाले. पहिल्या पीडितेप्रमाणेच तिला फेसबुकवर शेअर ट्रेडिंगची जाहिरात सापडली. लिंकवर क्लिक केल्यानंतर तिचा फोन नंबर गीतिका आनंद नावाच्या महिलेने चालवलेल्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये जोडला गेला. आनंदने तिला 'झेराधा' नावाचे ट्रेडिंग अॅप डाउनलोड करण्यासाठी राजी केले, जे वैध प्लॅटफॉर्मची नक्कल करत होते. (झिरोधा नावाचे एक शेअर ट्रेडिंग अॅप खरोखरच आहे. पण, या घटनेत आरोपीने वापरलेले अॅप केवळ मूळ अॅपची नक्कल होती. ऑक्टोबर ते नोव्हेंबर या कालावधीत या गृहिणीने एपच्या माध्यमातून 78 लाख रुपयांची गुंतवणूक केली. तिच्या प्रोफाईलने 200% नफा चुकीचा दर्शविला. जेव्हा तिने पैसे काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा आनंदने दावा केला की 20% दंड लागू होईल. गैरवर्तनाचा संशय आल्याने पीडितेने तिच्या सनदी लेखापालांचा सल्ला घेतला, ज्याने फसवणुकीची पुष्टी केली. त्यानंतर तिने सायबर पोलिसांमध्ये जाऊन तक्रार नोंदवली.
मुंबई सायबर पोलीस वरील दोन्ही प्रकरणांचा तपास करत आहेत. दरम्यान, पोलिसांनी ऑनलाइन व्यवहार करताना नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)