Principal Secretary to CM Devendra Fadnavis: वरिष्ठ आयएएस अधिकारी Ashwini Bhide यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रधान सचिवपदी बढती
सध्या मुंबई रेल कॉर्पोरेशनच्या एमडी असलेल्या अश्विनी भिडे या ब्रिजेश सिंह यांच्या जागी येणार आहेत. या नवीन जबाबदारीसोबत, योग्य बदली मिळेपर्यंत त्या मुंबई मेट्रोमध्ये नोकरी सुरू ठेवतील.
वरिष्ठ आयएएस अधिकारी अश्विनी भिडे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रधान सचिवपदी बढती झाली आहे. सध्या मुंबई रेल कॉर्पोरेशनच्या एमडी असलेल्या अश्विनी भिडे या ब्रिजेश सिंह यांच्या जागी येणार आहेत. या नवीन जबाबदारीसोबत, योग्य बदली मिळेपर्यंत त्या मुंबई मेट्रोमध्ये नोकरी सुरू ठेवतील. याबाबत जारी करण्यात आलेल्या जीआरमध्ये नमूद आहे, ‘अश्विनी भिडे, शासनाने आपली बदली केली असून, आपली नियुक्ती मा. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई या पदावर श्री. ब्रिजेश सिंह, भापोसे यांच्या जागी केली आहे. तरी आपण नवीन पदाचा कार्यभार श्री. ब्रिजेश सिंह, भापोसे यांच्याकडून त्वरीत स्वीकारावा. तसेच पुढील आदेश होईपर्यंत आपल्या सध्याच्या पदाचा कार्यभारही आपण धारण करावा.’ (हेही वाचा: Nagpur Winter Session: देवेंद्र फडणवीस नागपूरातील 'रामगिरीत' तर एकनाथ शिंदे 'देवगिरी' बंगल्यात राहणार; अजित पवारांना देण्यात आलं 'विजयगड' निवासस्थान)
Principal Secretary to CM Devendra Fadnavis:
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)