MUM Beat BRD, SMAT 2024 Semi Final 1 Scorecard: मुंबईचा बडोद्यावर 6 विकेट्सने विजय; सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या अंतिम फेरीत प्रवेश, अंजिक्य रहाणेच्या शानदार 98 धावा
अजिंक्य रहाणेने 56 चेंडूत 10 चौकार आणि 4 षटकारांसह 98 धावांची नाबाद खेळी खेळली. रहाणेसह श्रेयस अय्यरने 30 चेंडूत 46 धावा करत संघाला मजबूत स्थितीत आणले.
Baroda Cricket Team vs Mumbai Cricket Team Match Scorecard: बडोदा क्रिकेट संघ विरुद्ध मुंबई क्रिकेट संघ सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी (Syed Mushtaq Ali Trophy) 2024 चा पहिला उपांत्य सामना 13 डिसेंबर (शुक्रवार) रोजी एम. चिन्नास्वामी स्टेडियम, (M.Chinnaswamy Stadium) बेंगळुरू (Bengaluru) येथे खेळला गेला. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2024 च्या उपांत्य फेरीत मुंबईने दमदार कामगिरी करत बडोद्याला 6 विकेट्सने पराभूत करून अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. जिथे अजिंक्य रहाणेच्या 98 धावांच्या खेळीने मुंबईच्या विजयाची कहाणी लिहिली. अजिंक्य रहाणेला त्याच्या शानदार खेळीसाठी सामनावीर म्हणून निवडण्यात आले. रहाणेच्या या खेळीने मुंबईला अंतिम फेरीत नेले.
प्रथम फलंदाजी करताना बडोद्याने निर्धारित 20 षटकांत 7 बाद 158 धावा केल्या. बडोद्यासाठी शिवालिक शर्माने 24 चेंडूत 36 धावांची नाबाद खेळी खेळली, तर शाश्वत रावतने 33 धावा आणि कर्णधार कृणाल पंड्याने 30 धावा जोडल्या. मुंबईच्या गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली, ज्यात सूर्यांश शेडगेने 2 षटकात केवळ 11 धावा देत 2 महत्त्वाचे बळी घेतले. त्याचवेळी तनुष कोटियन आणि मोहित अवस्थी यांनीही प्रत्येकी एक विकेट घेतली.
158 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवात संथ झाली होती, मात्र कर्णधार अजिंक्य रहाणे आणि श्रेयस अय्यर या जोडीने शानदार भागीदारी करत सामना बडोद्याच्या पकडीपासून दूर नेला. अजिंक्य रहाणेने 56 चेंडूत 10 चौकार आणि 4 षटकारांसह 98 धावांची नाबाद खेळी खेळली. रहाणेसह श्रेयस अय्यरने 30 चेंडूत 46 धावा करत संघाला मजबूत स्थितीत आणले. बडोद्याच्या गोलंदाजांमध्ये हार्दिक पंड्या, अभिमन्यू सिंग राजपूत आणि शाश्वत रावत यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली, पण ते मुंबईच्या फलंदाजीला रोखण्यात अपयशी ठरले. ह मुंबईने अंतिम फेरीत धडक मारली असून आता त्यांच्या नजरा विजेतेपदावर असणार आहेत.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)