ठळक बातम्या

PAK vs SA 2nd Test 2025 Live Toss Updates: दुस-या कसोटीत दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकली, प्रथम फलंदाजी करण्याचा घेतला निर्णय; पाहा दोन्ही संघाची प्लेइंग 11

Nitin Kurhe

दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही संघात बदल करण्यात आले आहेत. पाकिस्तानने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एक बदल केला असून, नसीम शाहच्या जागी मीर हमजाचा समावेश करण्यात आला आहे. टोनी डी झॉर्झी दुखापतीमुळे बाहेर असून त्याच्या जागी विआन मुल्डरचा समावेश करण्यात आला आहे.

Wrestler Dies of Heart Attack: वडिलांचं स्पप्न भंगलं! साताऱ्यातील 14 वर्षीय पैलवानाचा सरावादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Bhakti Aghav

पुण्यातील जाणता राजा कुस्ती संकुलात कुस्तीचा सराव सुरू असताना माण तालुक्यातील माळवाडी गावातील 14 वर्षीय मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. जय दीपक कुंभार असे या मुलाचे नाव आहे.

Jasprit Bumrah, Sam Konstas Argument Video: जसप्रीत बुमराहसोबत सॅम कॉन्स्टासमध्ये जोरदार वाद, उस्मान ख्वाजाला सहन करावा लागला फटका; पाहा व्हिडिओ

Nitin Kurhe

सिडनी कसोटीच्या पहिल्या दिवसाचा खेळ संपला आहे. टीम इंडिया पहिल्या दिवशी 185 रन्सवर ऑलआऊट झाली होती. त्यानंतर टीम इंडियाला दिवसाचा खेळ संपेपर्यंत 3 षटके टाकण्याची संधी मिळाली. या 3 षटकांमध्ये, चाहत्यांना कळले की दुसऱ्या दिवशी एक अप्रतिम खेळ पाहायला मिळणार आहे.

Marathi vs Bhojpuri Song Dispute in Mira Road: नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनदरम्यान मराठी विरुद्ध भोजपुरी गाण्यावरून वाद; लोखंडी सळ्या आणि काठ्यांनी वार करून एका व्यक्तीची हत्या (Video)

Jyoti Kadam

मीरा रोड येथे नवीन वर्षाच्या उत्सवाला हिंसक वळण लागले आणि एकाची हत्या झाली. मराठी आणि भोजपुरी गाणी वाजवण्यावरून झालेल्या भांडणात 23 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. तर, दुसरा गंभीर जखमी झाला.

Advertisement

Stone Pelted At Mumbai-Solapur Vande Bharat Express: मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसवर दगडफेक; खिडकीच्या काचा फुटल्या

Bhakti Aghav

हा दगड ट्रेनच्या C-11 कोचवर आदळला. त्यामुळे वंदे भारत एक्स्प्रेसरच्या एका काचेच्या खिडकीचा चक्काचूर झाला. सुदैवाने, या घटनेत कोणतीही दुखापत झाली नाही. तसेच ट्रेनने आपला प्रवास पुढील व्यत्ययाशिवाय सुरू ठेवला.

PAK vs SA 2nd Test 2024 Mini Battle: पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात मिनी लढतीत 'हे' खेळाडू करु शकतात कहर, बदलू शकतात सामन्याचा मार्ग

Nitin Kurhe

दोन सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिका 1-0 ने आघाडीवर आहे. पहिल्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानचा 2 गडी राखून पराभव केला. या सामन्यात पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेला 147 धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेने पाचव्या दिवशी 8 गडी गमावून लक्ष्य गाठले. आता दुसरा सामना जिंकून मालिका काबीज करण्यावर दक्षिण आफ्रिकेच्या नजरा असतील.

Santosh Deshmukh Murder Case: सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळावा या मागणीसाठी 5 जानेवारीला पुण्यात आंदोलन; कन्या वैभवीचे लोकांना मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन

Prashant Joshi

संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आणि त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा, या मागणीसाठी रहिवासी रस्त्यावर उतरले आहेत. बीड आणि परभणी येथील आंदोलनांनंतर आता पुण्यात 5 जानेवारीला जनआक्रोश मोर्चा निघणार आहे

Ladki Bahin Yojana: 'लाडकी बहिन योजने'च्या बनावट लाभार्थ्यांची होणार चौकशी, मंत्री आदिती तटकरे

Shreya Varke

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी अपात्र असूनही लाभार्थ्यांच्या यादीत स्थान मिळविण्यात यशस्वी आलेल्या महिलांची चौकशी होणार आहे. अपात्र महिलांची यादी वगळण्यासाठी लवकरच या यादीची छाननी सुरू करण्यात येईल, अशी घोषणा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी गुरुवारी केली. 'लाडकी बहिण योजने'च्या बोगस लाभार्थ्यांच्या तक्रारींवर कारवाई करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून त्यांच्या पडताळणीसाठी प्राप्तिकर विभाग आणि परिवहन विभागाकडून माहिती मागविली आहे.

Advertisement

Navi Mumbai Firing: सानपाडा येथे डी मार्ट बाहेर गोळीबारात एक जण जखमी; पोलिसांचा तपास सुरू

Jyoti Kadam

दोन दुचाकीस्वारांनी सानपाडा परिसरात सकाळी 9.30 वाजता एका व्यक्तीवर गोळीबार केला, त्यात एक जखमी झाला. त्याची प्रकृती स्थिर आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

IND vs AUS 5th Test 2025 Day 1 Stumps: पहिल्या दिवसाचा खेळ संपला, भारताच्या 185 धावांच्या प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने 9 धावांवर गमवाली पहिली विकेट; येथे पाहा स्कोरकार्ड

Nitin Kurhe

सिडनी कसोटीत रोहित शर्माच्या जागी जसप्रीत बुमराह भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे. दरम्यान, भारताने पहिल्या डावात 185 धावा केल्या, प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात एक विकेट गमावून नऊ धावा केल्या. दिवसाच्या खेळाच्या शेवटच्या चेंडूवर जसप्रीत बुमराहने ख्वाजाला केएल राहुलकडे झेलबाद केले.

Thane: फक्त मराठी बोलण्याचा आग्रह धरला म्हणून जमावाने तरुणाला माफी मागण्यास भाग पाडले; मुंब्रा येथील धक्कादायक घटना (Video)

टीम लेटेस्टली

आईने फळे घेण्यासाठी पाठवलेल्या विशालने विक्रेत्याला मराठीत बोलण्यास सांगितल्याने भांडण सुरू झाले. विक्रेत्याने मराठी बोलण्यास नकार दिल्याने आणि फक्त हिंदीतच बोलणार असल्याचे सांगितल्यानंतर विशाल संतप्त झाला.

Coimbatore: कोईम्बतूरमध्ये एलपीजी टँकर उलटल्यामुळे मोठी गॅस गळती; 5 शाळा बंद (Watch Video)

Jyoti Kadam

कोचीहून कोईम्बतूरला जाणारा 18 मेट्रिक टन एलपीजी टँकर उलटला. त्यामुळे मोठी गॅस गळती झाली. अग्निशमन विभाग आणि शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. ही घटना मध्यरात्रीनंतर पहाटे तीनच्या सुमारास घडली.

Advertisement

IND vs AUS 5th Test 2025 Day 1 Scorecard: सिडनी कसोटीत रोहितच्या अनुपस्थितीतही भारतीय संघ 185 धावांवर कोसळला, बोलंड-स्टार्कची घातक गोलंदाजी

Nitin Kurhe

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताचा पहिला डाव 185 धावांवर गारद झाला आहे. भारताकडून ऋषभ पंतने सर्वाधिक 40 धावांची खेळी केली. तर ऑस्ट्रेलियाकडून स्कॉट बोलंडने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या.

Crabs Viral Video: विमानतळावर एका प्रवाशाच्या बॅगमधून निघाले अनेक खेकडे, खेकड्यांची फौज पाहुन प्रवासी चकित

Shreya Varke

विमानतळावर अनेक प्रवासी सामान घेऊन प्रवास करतात, पण अनेक जण गुपचूप काही गोष्टी सोबत नेण्याचा प्रयत्न करतात, ज्यांना परवानगी नसते. अशा घटना जगात अनेकदा समोर येतात, जेव्हा काही लोक विमानतळावरून साप, विंचू अशा अनेक प्राण्यांची बेकायदा वाहतूक करण्याचा प्रयत्न करतात, पण पकडले जातात. दरम्यान, सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये विमानतळावर खेकड्यांची फौज दिसत आहे.

IND vs AUS 5th Test 2025 Day 1 Live Score Update: भारताला 148 धावांवर आठवा धक्का, 14 धावा करून सुंदर बाद

Nitin Kurhe

सिडनी कसोटीत रोहित शर्माच्या जागी जसप्रीत बुमराह भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताला पहिल्या डावात आठवा धक्का लागला आहे. 66व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर वॉशिंग्टन सुंदरच्या रूपाने भारताला 8वा धक्का बसला. भारताचा स्कोर 153/8

Savitribai Phule Jayanti 2025: देशातील पहिल्या शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त PM Narendra Modi यांनी वाहिली आदरांजली, पहा पोस्ट

Prashant Joshi

ज्या काळात मुलींना शिक्षण देणे निषिद्ध मानले जात होते, त्या काळात, विशेषत: उपेक्षित समाजातील महिलांना शिक्षित करण्यात सावित्रीबाई फुले यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

Advertisement

Navi Mumbai Firing: सानपाडा येथे डी मार्ट परिसरात गोळीबार; पाच ते सहा राउंड फायर, पोलीस घटनास्थळी दाखल

Jyoti Kadam

नवी मुंबईतील सानपाडा येथील डी मार्ट परिसरात गोळीबाराची घटना घडली. पाच ते सहा राउंड फायर करण्यात आले. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Santosh Deshmukh Murder Case: 'या प्रकरणाशी माझा संबंध नाही, मी राजीनामा का द्यावा?'; Minister Dhananjay Munde यांचा सवाल

Prashant Joshi

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याला अटक करण्यात आली असून त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. वाल्मिक कराडची धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्याशी जवळीक असल्याचंही समोर आले आहे. त्यानंतर आता धनंजय मुंडेंवरही प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

IND vs AUS 5th Test 2025 Day 1 Live Score Update: पहिल्या डावात भारताची अवस्था बिकट, 134 धावांवर गमावली सातवी विकेट

Nitin Kurhe

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताला पहिल्या डावात सातवा धक्का लागला आहे. मिचेल स्टार्कने रवींद्र जडेजाला LBW आऊट केले. त्याला 26 धावा करता आल्या. भारताचा स्कोर 138/7

Mitchell Starc- Alyssa Healy Marriage Insights: मिचेल स्टार्क आणि ॲलिसा हिली यांचा एक रोमांचक संभाषणाचा व्हिडिओ व्हायरल, जोडप्याने जीवनाबद्दल केले मनोरंजक खुलासे

Nitin Kurhe

क्रिकेट जगतातील दोन मोठी नावे, मिचेल स्टार्क आणि ॲलिसा हिली यांच्यात मजबूत आणि समजूतदार नाते आहे. दोघांनाही खेळाची आवड सारखीच आहे जी त्यांना मैदानावरील एकमेकांची आव्हाने समजून घेण्यास मदत करते. मात्र, घरी ते खेळाव्यतिरिक्त वैयक्तिक आयुष्यावर लक्ष केंद्रित करतात.

Advertisement
Advertisement