ठळक बातम्या

Palghar Shocker: प्रसूतीदरम्यान हृदयविकाराच्या झटका आल्याने गर्भवती महिलेचा मृत्यू; अर्भकाला वाचवण्यात अपयश, पालघरमधील घटना

Jyoti Kadam

प्रसूतीदरम्यान हृदयविकाराचा झटका आल्याने महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर गर्भात असलेल्या बाळाला डॉक्टरांनी वाचवण्याचा प्रयत्न केला पण शक्य झाले नाही.

Digital Documents Now Valid in Mumbai: मुंबईकरांना दिलासा! आता DigiLocker आणि mParivahan ॲप्सवरील कागदपत्रे धरली जाणार ग्राह्य; वाहतूक पोलिसांना दिले निर्देश

Prashant Joshi

केंद्र शासनाच्या रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय (MoRTH) यांनी वाहन चालक अनुज्ञप्ती आणि वाहन नोंदणी प्रमाणपत्र तसेच इतर कागदपत्रांची डिजीटल कॉपी Digi Locker व mParivahan या मोबाईल अॅपद्वारे दाखविण्याची सुविधा नागरिकांना उपलब्ध करून दिली आहे.

Chandan Gupta Murder Case: कासगंज येथील प्रसिद्ध चंदन गुप्ता हत्याकांडातील सर्व 28 दोषींना जन्मठेपेची शिक्षा, NIA कोर्टाचा निकाल

Bhakti Aghav

चंदन गुप्ता हत्याकांडातीलदोषी 28 आरोपींना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा (Life Imprisonment) सुनावली असून 50,000 रुपयांचा दंडही ठोठावला आहे. 26 जानेवारी 2018 रोजी कासगंजमध्ये तिरंगा यात्रेदरम्यान उसळलेल्या दंगलीत चंदन गुप्ता (Chandan Gupta) यांचा मृत्यू झाला होता.

Paatal Lok Season 2 Teaser Out: 'पाताल लोक' सीझन 2 सिरीजची पहिली झलक समोर, जाणून घ्या कधी रिलीज होणार

Amol More

इन्स्पेक्टर हाथी राम चौधरीच्या भूमिकेतील जयदीप अहलावत एका नवीन प्रकरणाच्या तपासात व्यस्त असल्याचे टीझरमध्ये दाखवण्यात आले आहे.

Advertisement

Viral Video: पावसापासून आपल्या कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी पक्षी छत्रीप्रमाणे पसरवतो पंख, व्हायरल व्हिडिओ जिंकेल तुमचं मन

Shreya Varke

माणूस असो वा प्राणी किंवा पक्षी, त्याची मुले आणि त्याचे कुटुंब प्रत्येकासाठी सर्वात महत्त्वाचे असते. ज्याप्रमाणे मनुष्य आपल्या मुलांच्या आणि कुटुंबाच्या रक्षणासाठी कोणत्याही प्रकारचा धोका पत्करण्यास तयार असतो, त्याचप्रमाणे पशू-पक्षी आपल्या मुलांच्या आणि कुटुंबाच्या रक्षणासाठी स्वत:ला धोक्यात घालण्यास मागेपुढे पाहत नाहीत.

Shreyas Iyer Century: श्रेयस अय्यरने विजय हजारे ट्रॉफीमध्ये झळकावले दुसरे शतक, स्फोटक फलंदाजीने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी केला दावा

Nitin Kurhe

अय्यर देशांतर्गत क्रिकेटमध्ये खूप धावा करत आहे. हैदराबादविरुद्ध 44 धावांची इनिंगही खेळली. गुजरात कॉलेज मैदानावर शुक्रवारी झालेल्या विजय हजारे ट्रॉफीच्या सहाव्या फेरीत मुंबईने नाणेफेक जिंकून पुद्दुचेरीविरुद्ध फलंदाजीचा निर्णय घेतला. संघाने लवकर विकेट गमावल्या. मुंबईने 82 धावांत 5 विकेट गमावल्या.

Mahakumbh Mela 2025: महाकुंभ मेळासाठी हवामान विभागाकडून विशेष वेबपेज लाँच; दर 15 मिनिटांनी कळणार वातावरणातील बदल

Jyoti Kadam

महाकुंभ हा तात्पुरता जिल्हा म्हणून स्थापन करण्यात आला आहे. आता तेथील हवामानाची ताजी अपडेट नागरिकांना मिळावी यासाठी वामान विभागाकडून विशेष वेबपेज लाँच करण्यात आले आहे.

Sanjay Raut Praises Devendra Fadnavis: 'गडचिरोलीचा विकास महाराष्ट्रासाठी चांगला'; संजय राऊत यांच्याकडून देवेंद्र फडणवीसांची प्रशंसा

Bhakti Aghav

संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे कौतुक केले आहे. गडचिरोली जिल्ह्यात (Gadchiroli District) कार्यरत असलेल्या नक्षलवाद्यांना आत्मसमर्पण करून राज्य सरकारने प्रशंसनीय काम केल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

Advertisement

Navi Mumbai Horror: नवी मुंबई मध्ये रबाळे-घणसोली स्थानकादरम्यान पोलिस हेड कॉस्टेबल ची हत्या करून त्याला चालत्या ट्रेन समोर फेकलं; 2 आरोपींचा शोध सुरू

Dipali Nevarekar

रेल्वेच्या मोटरमनने पोलिसांना सांगितले की, पांढऱ्या शर्टातील दोन व्यक्तींनी पनवेल गव्हर्नमेंट रेल्वे पोलिस हेड कॉन्स्टेबलला रबाळे आणि घणसोली रेल्वे स्थानकादरम्यान रुळावर ढकलले.

MP: मध्य प्रदेशातील शिवपुरीत जेसीबीच्या धडकेत नागाचा मृत्यू, मृतदेहाजवळ बसुन रहिली नगिन

Shreya Varke

मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे नागाचा मृत्यू झाला तेव्हा नगिन तासनतास त्याच्या मृतदेहाजवळ बसून होता. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शिवपुरी जिल्ह्यातील नरवर भागातील छित्री गावात साफसफाई करताना जेसीबीच्या धडकेत एका सापाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मात्र, तिचा साथीदार नाग गंभीर जखमी झाला.

Mumbai-Navi Mumbai Travel via Atal Setu: आता अटल सेतूमार्गे मुंबई ते नवी मुंबई प्रवास झाला स्वस्त; NMMT ने भाड्यात केली 50 टक्के कपात, जाणून घ्या नवे दर

Prashant Joshi

अटल सेतू, भारतातील सर्वात मोठा सागरी सेतू असून, त्याद्वारे मुंबई ते नवी मुंबई हा प्रवास 20 मिनिटांत पूर्ण होतो. मात्र जास्त टोल आणि महागडे भाडे यामुळे ही सेवा फोल ठरली.

Irfan Pathan On Virat Kohli: विराट कोहली पुन्हा ऑफ स्टंपवर बाद, इरफान पठाणनने घेतला क्लास

Amol More

इरफान पठाण कोहलीच्या विकेटवर म्हणाला, "एवढा महान खेळाडू पुन्हा पुन्हा एकच चूक करत असतो. नेहमी असं म्हटलं जातं की दोन चुकांमधील अंतर वाढवायला हवं. मोठे खेळाडू तेच करतात."

Advertisement

Pune Metro Update: पुणेकरांनो लक्ष द्या! समोर आले शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रोबाबत अपडेट, जाणून घ्या कधी सुरु होणार

Prashant Joshi

पुण्यात मेट्रोची लोकप्रिया पाहता प्रशासनही अनेक मार्गांचे नियोजन करत आहे. यातील काही मार्ग पाइपलाइनमध्ये आहेत, तर अन्य मार्गांचे काम सुरू आहे. नियोजित विस्तारांमध्ये पीसीएमसी ते निगडी, स्वारगेट ते कात्रज, रामवाडी ते वाघोली, चांदणी चौक ते वनाझ आणि खडकवासला ते खराडी या मेट्रो मार्गांचा समावेश आहे.

Jasprit Bumrah New Record: जसप्रीत बुमराहने उस्मान ख्वाजाला बाद करून नावावर केला मोठा विक्रम, 8 वर्षांनंतर इतिहासाची पुनरावृत्ती

Nitin Kurhe

पहिल्या दिवसाचा खेळ संपण्यापूर्वीच उस्मान ख्वाजाला (Usman Khwaja) पॅव्हेलियनमध्ये पाठवणाऱ्या जसप्रीत बुमराहचे भले झाले असेल, भारतीय संघाने सुटकेचा नि:श्वास सोडला असेल. या विकेटसह जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) भारतीय संघासाठी जवळपास आठ वर्षे जुन्या इतिहासाची पुनरावृत्ती केली आहे.

Karnataka Shocker: आधी गळा दाबला नंतर मृतदेहाचे केले तुकडे; कर्नाटकमध्ये पत्नीने केली दारूच्या नशेत असलेल्या पतीची हत्या

Jyoti Kadam

आधी त्याचा गळा दाबला आणि तो बेशुद्ध झाल्यावर जवळच पडलेल्या दगडाने त्याचा चेहरा ठेचला. त्यानंतर दगड विहिरीत टाकला. त्यानंतर, महिलेने मृतदेहाचे दोन तुकडे केले आणि ते एका बॅरलमध्ये नेले. नंतर तिने बॅरलही विहिरीत फेकला.

New Security Rules To Enter Mantralaya: राज्य सरकार मंत्रालयात नवीन सुरक्षा प्रणाली लागू करणार; काय असेल सुरक्षा व्यवस्थेत खास? जाणून घ्या

Bhakti Aghav

राज्य सरकार मंत्रालय, राज्य सचिवालयाच्या सुरक्षेसाठी नवीन सुरक्षा व्यवस्था लागू करत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. आम्ही मंत्रालयाच्या सुरक्षेसाठी सुरक्षा व्यवस्था तयार करत आहोत. या अंतर्गत मंत्रालयात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला पास दिला जाईल.

Advertisement

Visakhapatnam: रामा कृष्णा बीचवर प्रात्यक्षिकेच्या तालीमदरम्यान पॅराशूट अडकल्याने दुर्घटना; नौदलाच्या अधिकाऱ्यांचा थोडक्यात बचावला जीव (Watch Video)

Jyoti Kadam

विशाखापट्टणम येथील रामा कृष्णा बीच येथे ईस्टर्न नेव्हल कमांडच्या ऑपरेशनल प्रात्यक्षिकाच्या तालीम दरम्यान त्यांचे पॅराशूट अडकल्याने गुरुवारी दोन भारतीय नौदलाचे अधिकारी किरकोळपणे बचावले.

Washington Sundar Out Controversy: टीम इंडियाशी पुन्हा बेईमानी! थर्ड अंपायरने वॉशिंग्टन सुंदरला दिले चुकीचे आऊट? या निर्णयावरून पुन्हा पेटला वाद

Nitin Kurhe

शुक्रवारपासून सुरू झालेल्या या मालिकेतील शेवटच्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी करत पहिल्याच दिवशी टीम इंडियाला बॅकफूटवर ढकलले. मात्र याचदरम्यान भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदरच्या विकेटवरून वाद निर्माण झाला आहे.

Employment Rate: गेल्या 10 वर्षांत देशातील रोजगार 36 टक्क्यांनी वाढून 64.33 कोटींवर पोहोचला; Mansukh Mandaviya यांची माहिती

Prashant Joshi

एका वर्षात (2023-24) मोदी सरकारने देशात सुमारे 4.6 कोटी नोकऱ्या निर्माण केल्या आहेत. कृषी क्षेत्राबाबत, मनसुख मांडविया म्हणाले की, यूपीए कार्यकाळात 2004 ते 2014 दरम्यान रोजगारामध्ये 16 टक्क्यांनी घट झाली, तर एनडीएच्या कार्यकाळात 2014 ते 2023 या काळात त्यात 19 टक्क्यांनी वाढ झाली.

Mumbai Shocker: मोठ्या बहिनीला जास्त प्रेम करते म्हणत लहान मुलीने केली आईची हत्या, पोलिसांनी केली अटक

Shreya Varke

मुंबईतील चुनाभट्टी पोलीस ठाण्यातील कुरेशी नगरमध्ये ही घटना घडली आहे. जिथे एका मुलीने आपल्या ६२ वर्षीय आईची हत्या केली. तिने पोलिस ठाणे गाठून पोलिसांना खुनाची कबुली दिली. प्राथमिक तपासात कौटुंबिक वैमनस्य समोर आले आहे. आरोपीचा असा विश्वास होता की, तिची आई तिच्यापेक्षा मोठ्या बहिणीला जास्त प्रेम करते. साबिरा बानो असगर शेख आणि मुलगी रेश्मा अशी मृतांची नावे आहेत. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलीला अटक करून तपासाला वेग दिला आहे.

Advertisement
Advertisement