Digital Documents Now Valid in Mumbai: मुंबईकरांना दिलासा! आता DigiLocker आणि mParivahan ॲप्सवरील कागदपत्रे धरली जाणार ग्राह्य; वाहतूक पोलिसांना दिले निर्देश
केंद्र शासनाच्या रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय (MoRTH) यांनी वाहन चालक अनुज्ञप्ती आणि वाहन नोंदणी प्रमाणपत्र तसेच इतर कागदपत्रांची डिजीटल कॉपी Digi Locker व mParivahan या मोबाईल अॅपद्वारे दाखविण्याची सुविधा नागरिकांना उपलब्ध करून दिली आहे.
Digital Documents Now Valid in Mumbai: मुंबईकरांसाठी एक दिलासादायक बाब आहे. आता डिजिलॉकर आणि एम परिवहन यावरील डिजिटल कागदपत्रे ग्राह्य धरली जाणार आहे. याबाबतचे आदेश मुंबईतील सर्व वाहतूक पोलिसांना देण्यात आले आहेत. सध्याच्या डिजिटल युगात अनेक वाहन चालक त्यांना जारी करण्यात आलेले अनुज्ञप्ती, वाहन नोंदणी प्रमाणपत्र, वाहनाचा विमा, पी.यु.सी. यांची डिजीटल कॉपी डिजी लॉकर (Digi Locker) अॅप किंवा एम परिवहनवर ठेवतात. मात्र असे निदर्शनास येत आहे की, काही पोलीस अधिकारी कर्तव्यादरम्यान वाहन मालक किंवा चालक यांनी डिजी लॉकर किंवा एम परिवहनवरील ही कागदपत्रे दाखवून सुध्दा त्यांच्यावर ई-चलान कारवाई करित आहेत. याबाबत अनेक तक्रारी कार्यालयाला प्राप्त होत होत्या.
केंद्र शासनाच्या रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय (MoRTH) यांनी वाहन चालक अनुज्ञप्ती आणि वाहन नोंदणी प्रमाणपत्र तसेच इतर कागदपत्रांची डिजीटल कॉपी Digi Locker व mParivahan या मोबाईल अॅपद्वारे दाखविण्याची सुविधा नागरिकांना उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे आता मोबाईल अॅपद्वारे सदर कागदपत्रे दाखविल्यास ती ग्राह्य धरण्यात यावीत, असे लेखी आदेश वाहतूक सहपोलीस आयुक्तांनी दिले आहेत. त्यामुळे आता मुंबईकर मोटरगाडी आणि दुचाकीच्या प्रत्यक्ष कागदपत्रांऐवजी डिजिलॉकर अॅपच्या मदतीने वाहतूक पोलिसांना कागदपत्रे दाखवू शकतात. (हेही वाचा: Mumbai-Navi Mumbai Travel via Atal Setu: आता अटल सेतूमार्गे मुंबई ते नवी मुंबई प्रवास झाला स्वस्त; NMMT ने भाड्यात केली 50 टक्के कपात, जाणून घ्या नवे दर)
Digital Documents Now Valid in Mumbai:
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)