Savitribai Phule Jayanti 2025: देशातील पहिल्या शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त PM Narendra Modi यांनी वाहिली आदरांजली, पहा पोस्ट

ज्या काळात मुलींना शिक्षण देणे निषिद्ध मानले जात होते, त्या काळात, विशेषत: उपेक्षित समाजातील महिलांना शिक्षित करण्यात सावित्रीबाई फुले यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

Savitribai Phule Jayanti (Photo Credits: File Image)

Savitribai Phule Jayanti 2025: समाजसेविका, भारतातील स्त्री शिक्षणाच्या समर्थक, देशातील पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांची आज जयंती. त्यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहिली. पीएम मोदींनी याबाबत सोशल मिडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये ते म्हणतात, ‘सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. त्या महिला सक्षमीकरण आणि शैक्षणिक आणि सामाजिक सुधारणांच्या क्षेत्रातील अग्रणी आहे. त्यांचे प्रयत्न आम्हाला सतत प्रेरणा देत राहतील.’ महात्मा फुले यांनी देशातील पहिली मुलींची शाळा सुरू केली आणि सावित्रीबाई या पहिल्या महिला शिक्षिका होत्या. ज्या काळात मुलींना शिक्षण देणे निषिद्ध मानले जात होते, त्या काळात, विशेषत: उपेक्षित समाजातील महिलांना शिक्षित करण्यात सावित्रीबाई फुले यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी नायगाव, सातारा येथे झाला. त्यांचा जन्मदिवस महाराष्ट्रात बालिका दिन व महिला मुक्तीदिन म्हणूनही साजरा केला जातो. (हेही वाचा: Savitribai Phule Jayanti 2025 HD Images: भारतातील स्त्री-शिक्षणाच्या जननी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त खास Wishes, Greetings, WhatsApp Status, Wallpapers द्वारे द्या शुभेच्छा)

सावित्रीबाई फुले जयंती-

 

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now