Thane: फक्त मराठी बोलण्याचा आग्रह धरला म्हणून जमावाने तरुणाला माफी मागण्यास भाग पाडले; मुंब्रा येथील धक्कादायक घटना (Video)
आईने फळे घेण्यासाठी पाठवलेल्या विशालने विक्रेत्याला मराठीत बोलण्यास सांगितल्याने भांडण सुरू झाले. विक्रेत्याने मराठी बोलण्यास नकार दिल्याने आणि फक्त हिंदीतच बोलणार असल्याचे सांगितल्यानंतर विशाल संतप्त झाला.
मुंबईमध्ये मराठी भाषेची गळचेपी होत असल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. मुंबईजवळ मुंब्रा येथे मराठी तरुणाला मराठी बोलण्याचा आग्रह धरायला लावल्यामुळे माफी मागायली लावली आहे. गुरुवारी या तरुणाने एका भाजी विक्रेत्याला मराठीत बोलण्यास सांगितल्याने वाद सुरु झाला होता. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, त्याच्याविरुद्ध शांतता भंगाचा अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे. एका अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार त्याला नंतर जाण्याची परवानगी देण्यात आली. तरुणाच्या आईने पत्रकारांना आपल्या मुलाची मानसिक स्थिती अस्थिर असल्याची माहिती दिली आणि त्याच्यावर कोणतीही कारवाई करू नये अशी विनंती पोलिसांकडे केली. फळविक्रेत्याशी भांडण करणाऱ्या तरुणावर कारवाईची मागणी करत पोलीस ठाण्यात गोंधळ घातल्याप्रकरणी 20 जणांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अहवालानुसार, आईने फळे घेण्यासाठी पाठवलेल्या विशालने विक्रेत्याला मराठीत बोलण्यास सांगितल्याने भांडण सुरू झाले. विक्रेत्याने मराठी बोलण्यास नकार दिलां आणि फक्त हिंदीतच बोलणार असल्याचे सांगितल्यानंतर विशाल संतप्त झाला आणि त्यानंतर दोघांमध्ये वाद सुरु झाला. नंतर विशालने मुंब्रा येथील शांतता भंग केल्याचा आरोप करत इतर विक्रेते आणि स्थानिकांनी फळ विक्रेत्याभोवती गर्दी केली. यावेळी शाब्दिक संघर्ष वाढला. त्यानंतर जमावाने विशालला जाहीर माफी मागण्यास भाग पाडले. या घटनेचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे ठाणे प्रमुख अविनाश जाधव यांनी निषेध केला आहे. (हेही वाचा: मराठी बोलायला सांगितलं म्हणून माफीनामा लिहायला लावल्याबद्दल WR ने केलं TTE चं निलंबन; नालासोपारा स्टेशन वरील घटना)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)