Marathi vs Bhojpuri Song Dispute in Mira Road: नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनदरम्यान मराठी विरुद्ध भोजपुरी गाण्यावरून वाद; लोखंडी सळ्या आणि काठ्यांनी वार करून एका व्यक्तीची हत्या (Video)
मीरा रोड येथे नवीन वर्षाच्या उत्सवाला हिंसक वळण लागले आणि एकाची हत्या झाली. मराठी आणि भोजपुरी गाणी वाजवण्यावरून झालेल्या भांडणात 23 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. तर, दुसरा गंभीर जखमी झाला.
Marathi vs Bhojpuri Song Dispute in Mira Road: मीरा रोड येथे नवीन वर्षाच्या उत्सवाला हिंसक वळण लागल्याची घटना घडली. मराठी-भोजपुरी गाणी वाजवण्यावरून झालेल्या भांडणात 23 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आणि दुसरा गंभीर जखमी झाला. 1 जानेवारी रोजी पहाटे 3 च्या सुमारास गृहसंकुलात ही घटना घडली, एका पार्टीदरम्यान एका गटाला मराठी गाणी हवी होती, तर दुसऱ्या गटाने भोजपुरी गाण्यांचा आग्रह होता. राजा परियार (23) यांनी गाण्याची विनंती नाकारल्याने हा वाद वाढला. ज्यामुळे आशिष जाधव, अमित जाधव, त्यांचे वडील प्रकाश जाधव आणि शेजारी प्रमोद यादव यांनी लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्याने क्रूर हल्ला केला. हल्ल्यात परियार याचा मृत्यू झाला. तर त्याचा मित्र विपुल राय (25) गंभीर जखमी आहे. खून आणि मारहाणीच्या आरोपाखाली काशिमीरा पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
लोखंडी सळ्या आणि काठ्यांनी वार करून एका व्यक्तीची हत्या
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)