ठळक बातम्या

Champions Trophy 2025 Teaser: चॅम्पियन्स ट्रॉफीचा मजेदार टीझर व्हायरल, रोहित-विराट नाही तर 'हा' भारतीय खेळाडू व्हिडिओमध्ये चमकला

Nitin Kurhe

स्पर्धेतील पहिला सामना यजमान पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला जाईल. आता आयसीसीने या स्पर्धेचा एक छोटासा टीझर प्रसिद्ध केला आहे. ज्यामध्ये 5 खेळाडू दिसत आहेत. यावेळी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये 8 संघ सहभागी होत आहेत. ज्याबाबत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) एक टीझर जारी केला आहे.

Kota Student Suicide: राजस्थानच्या कोटा येथे एकाच दिवशी दोन विद्यार्थ्यांनी केली आत्महत्या; गेल्या 22 दिवसात घडल्या 6 घटना

Prashant Joshi

नीट (NEET) ची तयारी करणाऱ्या गुजरात येथील 24 वर्षीय विद्यार्थ्याच्या आत्महत्येची बातमी बुधवारी सकाळी 9 वाजता समोर आली, त्यानंतर काही तासांतच अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेची तयारी करत असलेला आसामचा 17 वर्षीय विद्यार्थी त्याच्या खोलीत मृतावस्थेत आढळून आला.

Amitabh Bachchan In Panchayat: अमिताभ बच्चन यांचा पंचायतमध्ये प्रवेश? अशा प्रकारे ते गावकऱ्यांना देत आहेत इशारा

Amol More

आता अमिताभ बच्चन देखील 'पंचायत'च्या कलाकारांमध्ये सामील झाले आहेत. खरंतर, अमिताभ बच्चन यांनी 'पंचायत'च्या कलाकारांसोबत आणि सेटवर काम केले आहे.

Ranji Trophy मध्ये Ravindra Jadeja ची फिरकी जादू चालली, 5 विकेट्स घेऊन खळबळ उडवली

Nitin Kurhe

पहिल्या डावात 5 बळी घेत जडेजाने दिल्लीच्या फलंदाजीचा कणा मोडला. सौराष्ट्रच्या शानदार गोलंदाजीसमोर संपूर्ण दिल्ली संघ पहिल्या डावात फक्त 188 धावांवर गारद झाला.

Advertisement

Who is Umar Nazir Mir: कोण आहे उमर नझीर मीर? रणजीमध्ये रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणेला स्वस्तात केले बाद

Nitin Kurhe

नाझीर मीरचा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न करताना रोहित बाद झाला. त्याच वेळी, रहाणे 12 धावांवर उमरच्या गोलंदाजीवर बोल्ड झाला. याशिवाय उमरने शिवम दुबेला आपला बळी बनवले. उमरने मुंबईविरुद्ध कहर केला. अशा परिस्थितीत, उमर नझीर मीरबद्दल जाणून घेऊया.

Cheque Bounce Case: राम गोपाल वर्मा यांना 3 महिन्यांची शिक्षा, 7 वर्षांपासून सुरू होता खटला; काय आहे प्रकरण? जाणून घ्या

Bhakti Aghav

राम गोपाल वर्मा (Ram Gopal Varma) यांना सात वर्षे जुन्या प्रकरणात दोषी ठरवण्यात आले आहे. त्यांना 3 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मुंबईच्या अंधेरी मॅजिस्ट्रेट कोर्टाने राम गोपाल वर्मा यांना 3 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.

Maghi Ganpati Invitation Card Format in Marathi: माघी गणेश जयंती निमित्त Messages, Images द्वारे प्रियजनांना दर्शनासाठी द्या खास आमंत्रण

टीम लेटेस्टली

तुमच्या घरी देखील यंदा बाप्पा विराजमान होणार असतील तर आम्ही तुमच्यासाठी काही खास आमंत्रण पत्रिका घेऊन आलो आहोत. या आमंत्रण पत्रिका तुम्ही आपल्या नातेवाईकांना, प्रियजणांना, आप्तेष्टांना पाठवून त्यांना आपल्या घरी बाप्पाच्या दर्शनासाठी बोलवू शकता.

Ranji Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी भारताचा ताण वाढला, रणजी ट्रॉफीमध्ये टीम इंडियाचे स्टार खेळाडू अपयशी

Nitin Kurhe

इंग्लंड मालिकेत नसलेले भारतीय संघाचे स्टार खेळाडू रणजी ट्रॉफीमध्ये आपापल्या संघांसाठी सामने खेळत आहेत. तथापि, तिथून चांगले संकेत मिळत नाहीत. रोहित शर्मापासून ते यशस्वी जैस्वालपर्यंत आणि शुभमन गिलपासून ते श्रेयस अय्यरपर्यंत कोणीही आपापल्या सामन्यात काहीही करू शकले नाही आणि स्वस्तात बाद झाले.

Advertisement

Pune Guillain-Barré Syndrome Cases: पुण्यात गुइलेन-बॅरे सिंड्रोमची 59 प्रकरणे; साथीच्या रोगाचे सर्वेक्षण करण्यासाठी PMC ने तैनात केल्या 100 टीम

Prashant Joshi

रुग्णांना दिनानाथ मंगेशकर रुग्णालय, काशिबाई नवले रुग्णालय, पुणे रुग्णालय, भारती रुग्णालय, अंकुरा रुग्णालय आणि साह्याद्री रुग्णालयात दाखल केले आहे. पाणी आणि अन्नाच्या दूषिततेला या गुइलेन-बॅरे सिंड्रोमच्या प्रकोपाशी जोडले गेले आहे. महापालिका या रुग्णांच्या गावातील पाणी आणि अन्नाची तपासणी करत आहे, ज्यामुळे विषाणूंच्या प्रसाराचे स्रोत शोधले जात आहेत.

Kala Ghoda Arts Festival 2025: मुंबईतील काला घोडा कला महोत्सव 2025 'या' तारखेपासून होणार सुरू; यंदा रौप्यमहोत्सवी उत्सवात काय असणार खास? वाचा

Bhakti Aghav

लोक वर्षभरातून कधीही मुंबईतील समुद्रकिनाऱ्यावर जातात. पण लोक वर्षभर मुंबईत होणाऱ्या काही कार्यक्रमांची वाट पाहत असतात. यापैकी एक म्हणजे काळा घोडा कला महोत्सव (Kala Ghoda Arts Festival 2025). मुंबईच्या चैतन्यशील कला क्षेत्राचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ असलेला काला घोडा कला महोत्सव (KGAF) या वर्षी परत येत आहे.

Wife Body Chopped and Boiled: पत्नीची हत्या करून मृतदेहाचे तुकडे प्रेशर कुकरमध्ये शिजवले; Telangana मधील धक्कादायक घटना

Prashant Joshi

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने चौकशीदरम्यान सांगितले की, त्याने मृतदेहाचे तुकडे केले आणि कुकरमध्ये शिजवले. तीन दिवसात मांस आणि हाडे अनेक वेळा शिजवल्यानंतर, त्याने अवशेष पॅक केले आणि ते तलावात फेकले.

Gangster DK Rao Arrests: छोटा राजनचा साथीदार गँगस्टर डीके राव यास अटक; मुंबई पोलिसांची कारवाई

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

मुंबई गुन्हे शाखेने छोटा राजनचा जवळचा सहकारी गँगस्टर डीके राव याला खंडणी, फसवणूक आणि तोतयागिरी प्रकरणी अटक केली. सहा साथीदारांनाही सहार परिसरात ताब्यात घेतले.

Advertisement

Nitesh Rane On Saif Ali Khan: सैफ अली खानवर खरोखर चाकूने वार करण्यात आले होते की, तो फक्त नाटक करत होता? नितेश राणे यांनी उपस्थित केला प्रश्न

Bhakti Aghav

सैफ त्याच्या वांद्रे येथील निवासस्थानी पोहोचताच त्याने माध्यमांना हात हलवून नमस्कार केला. यावेळी सैफ निरोगी दिसत होता. यावेळी करीना कपूर आणि करिश्मा कपूरही सैफसोबत निवासस्थानी दिसले. सध्या अभिनेत्याच्या वांद्रे येथील निवासस्थानी सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.

Online Sexual Exploitation and Abuse: इंटरनेट मुलांसाठी धोकादायक; जगभरातील 12 पैकी 1 मूल ठरत आहे ऑनलाइन लैंगिक छळाचा बळी- Study

Prashant Joshi

एडिनबर्ग युनिव्हर्सिटी आणि चायना ॲग्रीकल्चरल युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी 2010 ते 2023 या कालावधीत केलेल्या 123 अभ्यासांचे विश्लेषण केले, ज्यामध्ये असे आढळून आले की जगभरातील आठ मुलांपैकी एकाला ऑनलाइन लैंगिक शोषणाचा फटका बसला आहे.

Nitish Reddy Catch Video: नितीश रेड्डी झाला सुपरमॅन, हवेत उडी मारत घेतला शानदार झेल; जोस बटलरही झाला आश्चर्यचकित!

Nitin Kurhe

IND vs ENG 1st T20I 2025: जोस बटलर स्फोटक फलंदाजी करत होता आणि त्याने अर्धशतक ठोकले. त्यानंतर त्याच्या एका शॉटवर, नितीश रेड्डीने सुपरमॅनचे रूप धारण केले, सीमारेषेवरून धावत जाऊन बटलरला बाद करण्यासाठी एक शानदार झेल घेतला.

Code of Conduct for Mahayuti Cabinet Minister: वाचाळविरांना लगाम? महायुती सरकार मंत्र्यांसाठी आचारसंहिता लागू करण्याच्या विचारात

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळातील सदस्यांसाठी अवास्तव टिप्पणी आणि सरकारच्या प्रतिमेचे रक्षण करण्यासाठी आचारसंहिता लागू करण्याची योजना आखली आहे.

Advertisement

IND vs ENG 1st Test 2025: कोलकातामध्ये टीम इंडियाने नावावर केला 'भीमपराक्रम', टी-20 मध्ये अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा संघ

Nitin Kurhe

मालिकेतील पहिला सामना टीम इंडियाने (Team India) जिंकला. या सामन्यात त्यांनी इंग्लंड संघाचा 7 विकेट्सने पराभव केला. हा सामना कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर आयोजित करण्यात आला होता. या सामन्यातील विजयासह टीम इंडियाने या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

Torres Company Scam: मुंबई पोलिसांनी जारी केली आठ युक्रेनियन आणि तुर्की नागरिकांविरुद्ध इंटरपोलची ब्लू कॉर्नर नोटीस; 'टॉरेस’ कंपनीद्वारे केली आहे कोट्यावधी नागरिकांची आर्थिक फसवणूक

Prashant Joshi

ब्लू कॉर्नर नोटीस हे इंटरपोलच्या सदस्य देशांमध्ये आणि कायदा अंमलबजावणी संस्थांमध्ये त्या व्यक्तीच्या ओळखी, स्थान किंवा क्रिमिनल तपासाच्या संदर्भात अधिक माहिती गोळा करण्यासाठी जारी केली जाते.

Ranji Trophy 2025: पुन्हा फ्लाॅप! रणजीमध्येही रोहित शर्माची बॅट चालली नाही, जैस्वालने वाढवली डोकेदुखी

Nitin Kurhe

आज मुंबई आणि जम्मू आणि काश्मीर (Mumbai vs Jammu and Kashmir) यांच्यातही एक सामना खेळला जात आहे. ज्यामध्ये टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) देखील मुंबईकडून खेळत आहे. या सामन्यात मुंबई संघ प्रथम फलंदाजी करत आहे. मुंबईकडून रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल (Yashasvi Jaiswal) यांच्या जोडीने डावाची सुरुवात केली. हे दोन्ही खेळाडू अपयशी ठरले.

Ladki Bahin Yojana: 'लाडकी बहीण योजना', सरकारविरोधात सामान्य जनतेमध्ये संताप

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

लाडकी बहीण योजना आणि त्यावरुन सुरु असलेल्या उलटसुलट चर्चा आता सामान्य नागरिकांमध्ये संतापाचे कारण ठरत आहे. हा संताप राज्य सरकारविरोधात पाहायला मिळत आहे.

Advertisement
Advertisement