Gangster DK Rao Arrests: छोटा राजनचा साथीदार गँगस्टर डीके राव यास अटक; मुंबई पोलिसांची कारवाई
मुंबई गुन्हे शाखेने छोटा राजनचा जवळचा सहकारी गँगस्टर डीके राव याला खंडणी, फसवणूक आणि तोतयागिरी प्रकरणी अटक केली. सहा साथीदारांनाही सहार परिसरात ताब्यात घेतले.
Mumbai Police Crime Branch: अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन (Chhota Rajan) याचा विश्वासू सहकारी कुख्यात गुंड डीके राव (Gangster DK Rao Arrests) याला मुंबई गुन्हे शाखेने अंधेरीच्या सहार भागात विकासकाला धमकावल्याच्या (Extortion Case) आरोपाखाली अटक केली आहे. संघटित गुन्हेगारीविरुद्ध शहराच्या सुरू असलेल्या लढ्यात ही अटक एक महत्त्वपूर्ण प्रगती मानली जात आहे. प्राप्त तक्रारीवरून कारवाई करत खंडणीविरोधी पथकाने (Anti-Extortion Cell) बुधवारी (22 जानेवारी) रात्री उशिरा सापळा रचून डी. के. राव आणि त्याच्या सहा साथीदारांना अटक करण्यात आली. त्यांच्यावर खंडणी, फसवणूक आणि बनावटगिरीच्या विविध कलमांखाली आरोप ठेवण्यात आले आहेत. आरोपीला गुरुवारी दुपारी महानगर दंडाधिकारी न्यायालयात हजर केले जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
डीके राव याच्यावरील आरोप
एका हॉटेल व्यावसायिकाने दाखल केलेल्या तक्रारीत आरोप केला आहे की, डीके राव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांची मालमत्ता ताब्यात घेण्याचा कट रचला, खंडणी म्हणून 2.5 कोटी रुपयांची मागणी केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. या आधी पोलिसांसोबत झालेल्या चकमकीतून पळाल्याचा आरोप असलेला राव हा अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन याचा विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जाते. तो मुंबईतील व्यावसायिक आणि विकासकांना लक्ष्य करून खंडणीचे रॅकेट चालवण्यासाठी कुख्यात आहे. गेल्या काही वर्षांमध्ये, तो लूटमार आणि हिंसक गुन्ह्यांसह अनेक गुन्हेगारी कारवायांमध्ये अडकला आहे, ज्यामुळे छोटा राजनच्या प्रमुख गुंडांपैकी एक म्हणून त्याची ओळख बनली आहे. (हेही वाचा, Chhota Rajan Convicted: जया शेट्टी खून प्रकरणात गँगस्टर छोटा राजनला जन्मठेपेची शिक्षा, मुंबई सत्र न्यायालयातील सीबीआय कोर्टाचा निकाल)
डीके राव याच्यावर आरोप काय?
हॉटेल मालकाकडून 2.5 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याबद्दल आणि त्याच्या जीवाला धोका निर्माण केल्याबद्दल छोटा राजनचा प्रमुख सहकारी डीके राव याला सहा फरार साथीदारांसह अटक करण्यात आली. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने कारवाई केली, ज्यामुळे अनेक दशकांच्या निष्क्रियतेनंतर मुंबईत अंडरवर्ल्ड कारवाया पुन्हा सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. सर्व आरोपींविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
मुंबईतील अंडरवर्ल्डवर कारवाई
कुप्रसिद्ध टोळी नेत्यांशी संबंधित खंडणीचे जाळे आणि गुन्हेगारी उपक्रम नष्ट करण्याचा पोलिसांचा निर्धार आहे. या कारवाईमुळे पोलिसांनी राबविलेल्या मोहीमेला अधिक बळकटी आली आहे.
मुख्य आरोपीसह सहा जणांना अटक
आतरराज्य टोळ्यांचा वावर वाढला
मुंबईमध्ये गुन्हेरारी कारवाया करणाऱ्या अनेक टोळ्या आहेत. त्यातील अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम, अरुण गवळी, छोटा राजन ही फार पुर्वीची नावे आहेत. अलिकडील काळात डीके शिवकुमार किंवा तत्सम नावे गुन्हेगारी विश्वात आढळतात. धक्कादायक म्हणजे आजच्या बदलत्या कालात गुन्हेगारांनी आपल्या कामाचीही पद्धत बदलली आहे. अनेक गुन्हेगार एका राज्यात गुन्हा करुन दुसऱ्या राज्यात पलायन करतात. त्यामुळे पोलिसांनाही कायदेशीर कारवाई करताना मोठ्या प्रमाणावर मर्यादा येतात. अर्थात, कायद्याचा अचूक वापर करत पोलिसही या गुन्हेगारांपर्यंत पोहोचतात. दुसऱ्या बाजूला केवळ शहर नव्हे तर ग्रामीण भागामध्येही गुन्हेगारीमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळते. त्यातूनच व्यक्तीगत पातळीवरील गुन्हेगारी आणि संघटीत गुन्हेगारी अशा दोन्ही प्रकारच्या गुन्हेगारी वाढू पाहात आहेत. (हेही वाचा:Gangster Chhota Rajan: गँगस्टर छोटा राजन याच्यासह तिंघांना दोन वर्षांची शिक्षा, पनवेल येथील बिल्डरला खंडणी मागितल्याचे प्रकरण )
दरम्यान, बदलत्या तंत्रज्ञानासोबत गुन्हेगारी टोळ्यांनीही आपल्या कामात बदल केला आहे. आजघडीला सायबर गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर बोकाळली आहे. या प्रकारातील गुन्हेगार पुर्वीसारखी भाईगिरी करत नसले तरी, ते नागरिकांच्याही नकळत त्यांच्या बँक खात्यांवर डल्ला मारतात. त्यांना डिजिटल अटक करतात आणि आर्थिक फसवणूक करतात.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)