Online Sexual Exploitation and Abuse: इंटरनेट मुलांसाठी धोकादायक; जगभरातील 12 पैकी 1 मूल ठरत आहे ऑनलाइन लैंगिक छळाचा बळी- Study

एडिनबर्ग युनिव्हर्सिटी आणि चायना ॲग्रीकल्चरल युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी 2010 ते 2023 या कालावधीत केलेल्या 123 अभ्यासांचे विश्लेषण केले, ज्यामध्ये असे आढळून आले की जगभरातील आठ मुलांपैकी एकाला ऑनलाइन लैंगिक शोषणाचा फटका बसला आहे.

Abuse| (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Online Sexual Exploitation and Abuse: इंटरनेट (Internet) हे आता केवळ माहिती आणि मनोरंजनाचे साधन राहिले नसून ते गुन्ह्यांचे व्यासपीठही बनत आहे. इंटरनेटमुळे मुलांसाठी धोक्याची परिस्थिती वाढली आहे. वाढत्या आधुनिकता आणि इंटरनेटच्या या युगात ऑनलाइन लैंगिक छळ हे जगभर एक आव्हान म्हणून समोर येत आहे. द लॅन्सेट चाइल्ड अँड ॲडॉलेसेंट हेल्थमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, गेल्या वर्षी जगभरातील 12 पैकी एक बालक कधीतरी ऑनलाइन लैंगिक शोषणाचा बळी ठरला आहे. जागतिक स्तरावर इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे, अशा प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे, ज्यात पोर्नोग्राफी, सेक्सटिंग आणि ऑनलाइन ग्रूमिंग तसेच फोटोसोबत छेडछाड करणे यांचा समावेश आहे.

अभ्यासांचे विश्लेषण-

एडिनबर्ग युनिव्हर्सिटी आणि चायना ॲग्रीकल्चरल युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी 2010 ते 2023 या कालावधीत केलेल्या 123 अभ्यासांचे विश्लेषण केले, ज्यामध्ये असे आढळून आले की जगभरातील आठ मुलांपैकी एकाला ऑनलाइन लैंगिक शोषणाचा फटका बसला आहे. जागतिक स्तरावर 12 पैकी एका मुलाने मागील वर्षात किमान एक प्रकारचा ऑनलाइन लैंगिक शोषण किंवा गैरवर्तन अनुभवले आहे.

मुली मुलांपेक्षा अधिक असुरक्षित-

हे रोखण्यासाठी तातडीची उपयोजना करण्याची गरज आहे. द लॅन्सेटमध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार, त्याचा उद्देश या प्रकारच्या गुन्ह्याला प्रतिबंध करणे हा आहे, मात्र, संशोधकांना याबाबत लिंगामध्ये कोणताही फरक आढळला नाही, परंतु मागील अहवालांचा हवाला देत यामध्ये म्हटले आहे की, मुली मुलांपेक्षा अधिक असुरक्षित आहेत. या अभ्यासाने केवळ जनतेलाच सतर्क केले नाही तर प्रत्येक पालकांना सूचनाही दिल्या आहेत, जे त्यांच्या निष्पाप मुलांना प्रत्येक गोष्टीसाठी मोबाइल आणि इंटरनेट वापरण्याची परवानगी देतात. लॅन्सेटच्या या अभ्यासाने ऑनलाइन लैंगिक शोषणाचे महत्त्व दाखवून दिले आहे. (हेही वाचा: Etawah Shocker: सायबर गुन्हेगारांच्या छळाला कंटाळून आरोग्य कर्मचाऱ्याची आत्महत्या)

या अभायासामध्ये असे आढळून आले की, डिजिटल तंत्रज्ञानाचा विस्तार आणि स्मार्टफोनचा वापर वाढल्याने 18 वर्षाखालील मुलांच्या लैंगिक शोषणाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या अभ्यासाचे प्रमुख लेखक डॉ. जियांगमिंग फेंग म्हणाले की, ही समस्या अधिकच बिकट होत चालली आहे, विशेषत: विकसनशील देशांमध्ये हि समस्या गंभीर आहे, जिथे बहुतेक प्रकरणे समोर येत नाहीत. अहवालानुसार, दर सेकंदाला 10 मुले ऑनलाइन लैंगिक शोषण आणि छळाचे बळी ठरत आहेत.

मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम-

संशोधकांचे म्हणणे आहे की, मुलांच्या लैंगिक शोषणाच्या घटनांचा केवळ मुलांच्या मानसिक आणि शारीरिक विकासावरच परिणाम होत नाही, तर त्यांच्या भविष्यातील रोजगाराच्या शक्यता आणि आयुर्मानावरही परिणाम होतो. 2024 मध्ये, चाइल्डगेट अभ्यासाचा अंदाज आहे की दरवर्षी 300 दशलक्ष मुले लैंगिक शोषणाला बळी पडतील.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now