Kota Student Suicide: राजस्थानच्या कोटा येथे एकाच दिवशी दोन विद्यार्थ्यांनी केली आत्महत्या; गेल्या 22 दिवसात घडल्या 6 घटना

नीट (NEET) ची तयारी करणाऱ्या गुजरात येथील 24 वर्षीय विद्यार्थ्याच्या आत्महत्येची बातमी बुधवारी सकाळी 9 वाजता समोर आली, त्यानंतर काही तासांतच अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेची तयारी करत असलेला आसामचा 17 वर्षीय विद्यार्थी त्याच्या खोलीत मृतावस्थेत आढळून आला.

Suicide | (Photo Credits: unsplash.com)

अभियांत्रिकी आणि वैद्यकीय प्रवेश परीक्षांचे कोचिंग हब म्हणून प्रसिद्ध असलेल्या राजस्थानच्या कोटामध्ये कोचिंगच्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचे घटनासत्र अजूनही सुरु आहे. 2025 चा पहिला महिना, जानेवारी अजून उलटलेला नाही, याआधी कोटा शहरात कोचिंग करणाऱ्या एकूण 6 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. आज एकाच दिवशी दोन विद्यार्थ्यांच्या आत्महत्येमुळे कोटामध्ये खळबळ उडाली आहे. नीट (NEET) ची तयारी करणाऱ्या गुजरात येथील 24 वर्षीय विद्यार्थ्याच्या आत्महत्येची बातमी बुधवारी सकाळी 9 वाजता समोर आली, त्यानंतर काही तासांतच अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेची तयारी करत असलेला आसामचा 17 वर्षीय विद्यार्थी त्याच्या खोलीत मृतावस्थेत आढळून आला. हे विद्यार्थी कोटा येथे  22 जानेवारी ते 30 जानेवारी 2025 या कालावधीत होणाऱ्या JEE Mains परीक्षेला बसणार होते. अशाप्रकारे शहरात केवळ 22 दिवसांत तब्बल 6 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. देशातील सर्वात मोठे कोचिंग हब मानले जाणारे कोटा विद्यार्थ्यांवरील वाढता शैक्षणिक दबाव आणि मानसिक ताण यामुळे चर्चेत आहे. विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या वाढत्या संख्येने कोचिंग उद्योग आणि पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. (हेही वाचा: Rajathan: मुलीच्या लग्नासाठी नाकारली रजा; मानसिक तणावाखाली रेल्वे कर्मचाऱ्याने ऑफिसमध्ये केली आत्महत्या, तपास सुरु)

Kota Student Suicide:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now