ठळक बातम्या

Ladki Bahin Yojana: आज,उद्या म्हणत महिना संपला! लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांना कधी मिळणार पैसे?

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांना फेब्रुवारी महिन्यातील हप्ता अद्यापही मिळाला नाही. त्यामुळे लाभार्थी महिलांमध्ये मोठी नाराजी असल्याचे पाहायला मिळत आहे.

Viral Video: रिलसाठी यूट्यूबरने प्रवाशाला लगावली कानशिलात, पोलिसांनी आरोपीला केली अटक

Shreya Varke

रिलसाठी सध्या तरुण काहीही करतांना दिसून येत आहेत. दरम्यान, बिहारमधील अनुग्रह नारायण रोड स्थानकावर चालत्या ट्रेनमध्ये एका व्यक्तीने एका प्रवाशाला चापट मारल्याची घटना समोर आली आहे. हा सर्व प्रकार रिलसाठी केल्याचे समोर आले आहे. आरोपी रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर उभा होता आणि समोरून गाडी जात असताना त्याने प्रवाश्याला चापट मारली. या घटनेचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाल्याने लोकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

AUS vs AFG 10th Match: जर अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना पावसामुळे वाया गेला, तर कोणाला मिळेल सेमीफायनलचे तिकीट?

Nitin Kurhe

लाहोरमधील हवामान प्रतिकूल असणार आहे आणि या सामन्यावर पावसाची सावली पडणार आहे. आता जर गद्दाफी स्टेडियमवर इंद्र देव बरसले तर सेमीफायनलचे तिकीट कोणाला मिळेल? चला तुम्हाला ते सविस्तरपणे समजावून सांगूया.

Viral Video: समुद्राच्या खोलीतील एलियन्स सारख्या दिसणाऱ्या आणखी एका विचित्र जीवाचा व्हिडीओ व्हायरल

Shreya Varke

समुद्राच्या खोलीत असे अनेक जीव असतात जे कधी कधी दिसतात, ज्याबद्दल फारशी माहिती कोणालाच नसते.असे अनेक जीव सध्या मागच्या काही दिवसांपासून दिसून येत आहेत. दरम्यान, आता एका मच्छिमाराला समुद्राच्या खोलीतून एक विचित्र जीव सापडला आहे, खाडीमध्ये मासे पकडताना रोमन फेडोर्टसोव नावाच्या एका मच्छिमाराला एक विचित्र जीव सापडला, ज्याचा व्हिडिओ (Viral Video) इंस्टाग्रामवर पोस्ट करताना त्या व्यक्तीने सांगितले

Advertisement

Sonali Bendre-Raj Thackeray Get Spotted Together: मुंबईत मराठी भाषा दिनी आयोजित कार्यक्रमात सोनाली बेंद्रे आणि राज ठाकरे यांची हजेरी (Watch Video)

Bhakti Aghav

यावेळी बॉलीवूड अभिनेता विकी कौशलने प्रसिद्ध मराठी कवी कुसुमाग्रज यांच्या कविता वाचून सर्वांची मनं जिंकली.

India's First Case of H5N1 Flu in Cats: मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथे पाळीव मांजरींमध्ये आढळला एच5एन1 चा संसर्ग; भारतामधील पहिलीच घटना, प्रशासन सतर्क

Prashant Joshi

मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथे पाळीव मांजरींमध्ये बर्ड फ्लू आढळला आहे. साधारण 18 मांजरींच्या मृत्यूनंतर, नमुने पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेत चाचणीसाठी पाठवण्यात आले होते, त्यापैकी दोन मांजरींमध्ये बर्ड फ्लू आढळून आला. देशात मांजरींमध्ये बर्ड फ्लू आढळून येण्याची ही पहिलीच वेळ आहे.

Kiara Advani Pregnancy Post: सिद्धार्थ मल्होत्राच्या घरात होणार छोट्या पाहुण्याचे आगमन; कियारा अडवाणीने खास फोटो शेअर करत चाहत्यांना दिली गोड बातमी

Bhakti Aghav

हा फोटो शेअर करताना कियारा-सिद्धार्थने कॅप्शन दिले आहे की, 'आमच्या आयुष्यातील सर्वात मोठी भेट लवकरच येत आहे.' यासोबतच अभिनेत्रीने हृदय, वाईट नजर आणि हात जोडलेले इमोजी शेअर केली आहे.

Glacier Burst in Badrinath Dham: बद्रीनाथ धाम येथे हिमकडा कोसळला, 55 कामगार बर्फाखाली अडकले

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील बद्रीनाथ धामजवळ हिमनदी फुटल्याने 47 कामगार हिमस्खलनात अडकले आहेत. आपत्तीला तोंड देण्यासाठी अधिकाऱ्यांकडून मदतकार्य सुरू आहे. मात्र, त्यात अडथळा येत आहे.

Advertisement

EPFO Interest Rate: ईपीएफओ व्याजदर जाहीर; काय आहे व्याजदरातील बदल? जाणून घ्या

टीम लेटेस्टली

सरकारने गेल्या वर्षीचा व्याजदर कायम ठेवला असून त्यात कोणताही बदल केलेला नाही. हे सलग दुसरे वर्ष आहे जेव्हा व्याजदर 8.25% वर स्थिर ठेवण्यात आला आहे.

Pune Swargate ST Bus Rape Case: बस स्थानकांचे सुरक्षा ऑडिट, गाड्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, जीपीएस सिस्टम आणि पॅनिक बटणे; स्वारगेट एसटी बस बलात्कार प्रकरणानंतर सरकार ॲक्शन मोडवर

टीम लेटेस्टली

राज्य परिवहन महामंडळाकडे मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी पद असून या रिक्त पदावर भारतीय पोलीस सेवेतील (IPS) अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी. याबाबत प्रस्ताव गृह विभागाला विनाविलंब सादर करण्याच्या सूचना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिल्या.

Himachal Pradesh Weather Update: मुसळधार पावसामुळे कुल्लू जिल्ह्यात रस्ते जलमय, अनेक वाहने गेली वाहून, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Shreya Varke

हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. हवामान खात्याने पुढील 24 तास मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे, ज्यामुळे परिस्थिती आणखी बिघडू शकते. कुल्लू, मनाली आणि आजूबाजूच्या भागात दरड कोसळण्याची ही शक्यता आहे. मुसळधार पावसामुळे अनेक नदी नाले ओव्हरफ्लो होऊन वाहू लागले आहेत. पावसामुळे रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

Viral Video: बैलाने भगवान शंकराला अनोख्या पद्धतीने केले वंदन, व्हायरल व्हिडीओने अनेकांना केले चकित

Shreya Varke

महाशिवरात्री हा भववान शंकर आणि पार्वतीचा विवाह सोहळा देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दरम्यान, महाशिवरात्रीदरम्यानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, या व्हिडिओमध्ये एक बैल शिव मंदिराबाहेर नतमस्तक झाल्याचे दिसून येत आहे. @Ravitiwariii नावाच्या एक्स अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे, जो वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक म्हणत आहेत

Advertisement

Fishing Boat Catches Fire Off Alibaug Coast: अलिबाग किनाऱ्याजवळ मासेमारी बोटीला आग; सर्व 18 क्रू मेंबर्सना वाचवण्यात (Watch Video)

Bhakti Aghav

शुक्रवारी पहाटे 3 ते 4 च्या दरम्यान, अलिबाग किनाऱ्यापासून सुमारे 6 ते 7 नॉटिकल मैल अंतरावर राकेश गण यांच्या मासेमारी बोटीला ही आग लागली.

TCS Manager Dies by Suicide: 'कृपया पुरुषांबद्दल विचार करा'; आग्रा येथे टीसीएस मॅनेजरची गळफास लावून आत्महत्या, पत्नीवर गंभीर आरोप, मृत्युपूर्वी शूट केला भावनिक व्हिडीओ (Watch)

Prashant Joshi

आग्रा येथील डिफेन्स कॉलनी परिसरात ही दुर्दैवी घटना घडली. मानव शर्मा एका प्रतिष्ठित आयटी कंपनीत रिक्रूटमेंट मॅनेजर म्हणून काम करत होता. 24 फेब्रुवारी 2025 रोजी त्याने स्वतःच्या घरात आत्महत्या केली. मरण्यापूर्वी, मानवने एक भावनिक आणि वेदनादायक व्हिडिओ रेकॉर्ड केला.

Boyfriend Stabbed Girlfriend: तरुणीवर चाकूहल्ला करुन वडिलांना फोन, 'होय मी तिला मारले'; विरार पोलिसांकडून आरोपीस अटक

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Virar Crime: विरार येथे औषधाच्या दुकानात काम करणाऱ्या एका 23 वर्षीय तरुणीवर तिच्या प्रियकराने चाकूहल्ला केला आहे. पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे.

Rule Change From 1 March: 1 मार्चपासून UPI, LPG आणि म्युच्युअल फंडसह बदलणार 'हे' नियम; सर्वसामान्यांच्या खिशावर होणार परिणाम

Bhakti Aghav

1 मार्च 2025 पासून काही महत्त्वाचे नियम देखील लागू केले जात आहेत, ज्याचा परिणाम सर्वसामान्यांवर होऊ शकतो. यामध्ये UPI शी संबंधित नवीन सुविधा, LPG आणि ATF च्या किमतींमध्ये संभाव्य बदल आणि म्युच्युअल फंड नॉमिनी नियमांमध्ये बदल यांचा समावेश आहे.

Advertisement

US Grants Visa to Family of Neelam Shinde: कॅलिफोर्नियामध्ये अपघात झालेल्या नीलम शिंदेच्या कुटुंबाला मिळाला अमेरिकेचा व्हिसा

Prashant Joshi

नीलम गेल्या चार वर्षांपासून अमेरिकेत राहत होती. 14 फेब्रुवारी रोजी कॅलिफोर्नियामध्ये चारचाकी वाहनाच्या धडकेत ती जखमी झाली. यानंतर तिला यूसी डेव्हिस हेल्थ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, जिथे तिच्यावर मेंदूची शस्त्रक्रिया करण्यात आली. तेव्हापासून ती कोमात आहे.

Kolhapur: कोल्हापूर येथील राजाराम सहकारी साखर कारखान्यास भीषण आग, अग्निशमन दलाचे 5 बंब घटनास्थळी दाखल

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

कोल्हापूर येथील श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना परिसरात मोठ्या प्रमाणावर आग लागली आहे. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. अग्निशमन दलाचे पाच ते सहा बंब घनास्थळी दाखल झाले आहे.

Virar Shocker: आर्थिक संकटाने त्रस्त असलेल्या व्यक्तीने पत्नी आणि मुलीची केली हत्या; नंतर स्वतःलाही गळफास लावला, विरार येथील धक्कादायक घटना

Prashant Joshi

उदय बऱ्याच काळापासून आर्थिक समस्यांशी झुंजत होता. सोसायटीच्या देखभालीसाठी देण्यासाठीही त्याच्याकडे पैसे नव्हते. यामुळे त्याने हे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे. अहवालानुसार, मंगळवारी या जोडप्याचा मुलगा शाळेत असताना ही घटना घडली असावी.

Landlord Rights and Rental Disputes: मलमत्ता मालकाकडे सर्वाधिकार, भाडेकरूला बाहेर काढण्याचा घरमालकाचा अधिकार- सर्वोच्च न्यायालय

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

सर्वोच्च न्यायालयाने असा निर्णय दिला आहे की, घरमालकांना त्यांच्या वैयक्तिक वापरासाठी भाडेकरूंना बाहेर काढण्याचा अधिकार आहे. हा ऐतिहासिक निकाल भाडेपट्ट्यांच्या वादात मालमत्ता मालकांच्या अधिकारांना बळकटी देणारा ठरु शकतो.

Advertisement
Advertisement