ठळक बातम्या
Ghatkopar Drain Tragedy: मुंबईतील घाटकोपर येथे नाल्यातून 8 वर्षीय मुलीला वाचवताना 28 वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू
Prashant Joshiखेळादरम्यान, जॉय मॅक्स स्कूलच्या मागे असलेल्या एका मोठ्या आणि खोल नाल्यात एक चेंडू पडला. चेंडू बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असताना, मुलीचा तोल गेला आणि ती नाल्यात पडली. यानंतर मुलीने मदतीसाठी आरडओरडा सुरु केला.
Polytechnic Diploma Admission Process: पॉलिटेक्निक प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया 20 मे पासून सुरू; जाणून घ्या कुठे कराल अर्ज
टीम लेटेस्टलीमाहिती व तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक क्षमतांनी सज्ज करणाऱ्या या अभ्यासक्रमामध्ये अधिकाधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
India-Pakistan Conflict: पहलगाम हल्ल्याच्या चौकशीत दहशतवाद्यांचा पाकिस्तानमधील सूत्रधारांशी संपर्क असल्याचे उघडकीस; परराष्ट्र सचिवांची संसदीय समितीला माहिती
Prashant Joshiदोन्ही देशांकडून लष्करी कारवाई थांबवण्याचा निर्णय द्विपक्षीय पातळीवर घेण्यात आला होता, या सरकारच्या भूमिकेचा पुनरुच्चार मिस्री यांनी केला, कारण काही विरोधी सदस्यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाच्या संघर्ष रोखण्याच्या भूमिकेबद्दलच्या वारंवार केलेल्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
Pune Covid-19 Cases: पुण्यात आढळला यावर्षीचा पहिला कोविड-19 रुग्ण; 87 वर्षीय वृद्धाची चाचणी पॉझिटिव्ह, राष्ट्रीय पातळीवर परिस्थिती चिंताजनक नाही
Prashant Joshiपुणे शहरात या वर्षीचा पहिला कोविड रुग्ण आढळला आहे. पुण्यातील एका 87 वर्षीय वृद्धाला कोविड-19 ची लागण झाली असून, त्याच्यावर उपचार सुरु आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की, घाबरून जाण्याची गरज नाही, कारण कालांतराने विषाणूंची तीव्रता कमी होते.
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेमुंबईच्या मालवणीमध्ये तिच्या अडीच वर्षांच्या मुलीवर बलात्कार आणि हत्येप्रकरणी एका 30 वर्षीय महिलेला आणि तिच्या 19 वर्षीय प्रियकराला अटक करण्यात आली आहे. पोलिस POCSO कायदा आणि BNS अंतर्गत तपास करत आहेत. अधिक माहितीसाठी अधिक वाचा.
IRCTC's Swarail App: भारतीय रेल्वेने लाँच केले नवे ‘स्वरेल’ ॲप; तिकीट बुकिंगपासून ट्रेनमध्ये जेवण ऑर्डर करण्यापर्यंत सर्व सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध, जाणून घ्या सविस्तर
Prashant Joshiआयआरसीटीसीने स्वरेल ॲपच्या माध्यमातून रेल्वे प्रवाशांना एकाच ठिकाणी सर्व सेवा देण्याचा प्रयत्न केला आहे. यापूर्वी प्रवाशांना तिकीट बुकिंगसाठी आयआरसीटीसीची वेबसाइट किंवा ॲप, पीएनआर तपासणीसाठी वेगळे ॲप आणि जेवण ऑर्डरसाठी अन्य व्यासपीठ वापरावे लागत होते. आता या सर्व सुविधा स्वरेल ॲपवर एकाचा ठिकाणी उपलब्ध आहेत.
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेरोहित शर्माने त्याची आयकॉनिक लॅम्बोर्गिनी उरुस ड्रीम11 फॅन्टसी क्रिकेट विजेत्याला भेट दिली, ज्यामुळे त्याने व्हायरल झालेल्या आयपीएल 2025 च्या त्याच्या वचनाची पूर्तता केली. त्याच्या ऐतिहासिक 264 धावांच्या एकदिवसीय खेळीशी जोडलेली ही कार जवळजवळ 4 कोटी रुपये किमतीची आहे.
World's First AI Doctor Clinic: सौदी अरेबियामध्ये सुरु झाले जगातील पहिले एआय डॉक्टर क्लिनिक; जाणून घ्या कसे करते कार्य आणि प्रक्रिया
Prashant Joshiसिनयी एआयच्या मते, ‘डॉ. हुआ’ सध्या सामान्य आजार, जसे की ताप, सर्दी, उच्च रक्तदाब आणि मधुमेह, यांचे निदान करू शकतो. भविष्यात याची व्याप्ती वाढवून जटिल आजारांचे निदान आणि उपचार शक्य होईल.
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेएजीआर थकबाकी माफीसाठी व्होडाफोन, एअरटेल आणि टाटा टेलिसर्व्हिसेस यांनी केलेल्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावल्या आहेत. खंडपीठाने याचिकांना "चुकीचे" म्हटले आहे आणि सरकारी निर्णयांमध्ये हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे.
Unseasonal Rains: अवकाळी पावसाने उत्तर महाराष्ट्रात 12 जणांचे मृत्यू; नाशिकला सर्वाधिक फटका
Prashant Joshiनाशिक महसूल विभागात नाशिक, अहिल्यानगर, धुळे, जळगाव आणि नंदुरबार हे पाच जिल्हे समाविष्ट आहेत. गेल्या दीड आठवड्यात यापैकी बहुतेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. जोरदार वारे, मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
Properties Built Using Forged Maps: मुंबईच्या मालाड, मढ आणि कुरार भागात आढळल्या बनावट नकाशे वापरून बांधलेल्या 123 मालमत्ता; या महिन्यात पाडली अशी 24 अनधिकृत बांधकामे
Prashant Joshiअशी बहुतेक बांधकामे मढ, कुरार परिसरात आहेत आणि बीएमसी सर्व अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचे उद्दिष्ट ठेवते. इथले निसर्गरम्य सौंदर्य लक्षात घेता, मालक विस्तारित क्षेत्रांचा वापर करतात. इथले अनेक बंगले चित्रपट आणि मालिका चित्रीकरणासाठी वापरले जातात.
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Jyoti Kadamआयपीएल 2025 मध्ये अजून बरेच सामने शिल्लक आहेत आणि प्रत्येक सामन्यासोबत ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅपसाठी स्पर्धा अधिक रोमांचक होत जाईल. हंगामाच्या अखेरीपर्यंत कोणता फलंदाज आणि गोलंदाज अव्वल स्थानावर राहील हे पाहणे मनोरंजक असेल.
पावसाच्या पाण्यात वाहून जाणार्या पीकाला वाचवताना हताश झालेल्या वाशिमच्या शेतकर्याचा व्हिडिओ वायरल; केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिले मदतीचे आश्वासन
Dipali Nevarekarकेंद्रीय कृषीमंत्री शिवराज चौहान यांनी हताश शेतकर्याला फोन करून त्याला मदतीचे आश्वासन केले आहे.
Mumbai Lake Water Level: मुंबईवर पाणीटंचाईचे संकट? शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांची पातळी 18% पेक्षा कमी; 60 दिवसांचा साठा शिल्लक
Prashant Joshiमुंबईला पाणीपुरवठा करणारे सात तलाव- तानसा, भातसा, विहार, तुळशी, मोडक सागर, अप्पर वैतरणा आणि मध्य वैतरणा, यांचा एकूण पाणीसाठा 14.47 लाख दशलक्ष लिटर असून बीएमसी दररोज 3850 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करते.
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Jyoti Kadamआयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप लीग 2 2023-27 चा 69 वा सामना आज ओमान राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध कॅनडा राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात खेळला जाणार आहे.
Thane Water Cut On May 21: ठाणे शहरामध्ये 21 मे दिवशी 12 तास 'या' भागात पाणीपुरवठा राहणार बंद
Dipali Nevarekarघोडबंदर रोड, वर्तक नगर, ऋतू पार्क, जेल, गांधीनगर, रूस्तूमजी, सिद्धांचल, समता नगर, इंटरनिटी, जॉन्सन व कळव्याचा काही भाग येथील पाणीपुरवठा बंद राहणार असल्य्याची माहिती ठाणे महानगर पालिकेकडून देण्यात आली आहे.
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेमुंबईतील विधान भवन प्रवेशद्वारावर आग लागली, शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा संशय आहे. महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आग आटोक्यात आल्याची पुष्टी केली.
Sansad Ratna Awards 2025: संसद रत्न पुरस्कारांची घोषणा; 17 विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, वर्षा गायकवाडसह 7 खासदारांचा समावेश
Prashant Joshiसंसद रत्न पुरस्कार हा खासदारांच्या संसदेतील उपस्थिती, चर्चेतील सहभाग, खासगी विधेयके, प्रश्नोत्तरे आणि लोकहिताचे मुद्दे उपस्थित करण्याच्या कामगिरीवर आधारित आहे. यंदा 17 खासदारांची निवड झाली असून, यामध्ये लोकसभेतील 15 आणि राज्यसभेतील 2 खासदारांचा समावेश आहे.
Today's Googly: 1997 मध्ये पहिले एकदिवसीय द्विशतक कोणी केले? या मजेदार प्रश्नाचे मनोरंजक उत्तर जाणून घ्या
Jyoti Kadamक्रिकेटमध्ये जेव्हा जेव्हा द्विशतकांची चर्चा होते. तेव्हा,क्रिकेट चाहत्यांना सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग किंवा रोहित शर्मा अशी नावे आठवतात. पण तुम्हाला माहिती आहे का? एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक करणारा पहिला खेळाडू कोण होता?