Jayant Narlikar Dies: खगोल शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचं पुण्यामध्ये निधन

86 वर्षीय जयंत नारळीकर यांचं आज झोपेतच निधन झाले आहे.

Jayant Narlikar | X @Praful Patel

Jayant Narlikar Dies: ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचं पुण्यामध्ये आज (20 मे) निधन  झाले आहे. 86 वर्षीय जयंत नारळीकर यांचं आज झोपेतच निधन झाले आहे. जयंत नारळीकर यांचे शिक्षण बनारस हिंदू विद्यापीठात झाले. पुढे ते केंब्रिजला शिकायला गेले आणि भारतामध्ये परत आले होते. भारतात त्यांनी टाटा मुलभूत संशोधन संस्थेत त्यांनी काम केले.  आयुका संस्थेच्या उभारणीत त्यांचा सिंहाचा होता. मराठी भाषेत उत्कृष्ट विज्ञानकथा लिहून त्यांनी नव्या पिढीमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्याचेही काम केले आहे. प्रसिद्ध ब्रिटिश वैज्ञानिक सर फ्रेड हॉईल यांच्यासह त्यांनी मांडलेला हॉईल-नारळीकर सिद्धांत वैज्ञानिक जगतात अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. पद्मविभूषण या पुरस्काराने त्यांना भारत सरकारने गौरवलेले आहे.

ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचे निधन

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement