Dr. Jayant Narlikar Passes Away: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला डॉ. जयंत नारळीकर यांच्या निधनावर शोक

सामान्य नागरिकांसाठी विज्ञान सुलभ करण्यात डॉ. जयंत नारळीकर यांच्या लेखनाचा मोठा वाटा आहे.

PM Modi | Twitter

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. जयंत नारळीकर यांच्या निधनावर शोक  व्यक्त केला आहे. डॉ. जयंत नारळीकर यांचे आज 20 मे दिवशी पुण्यामध्ये झोपेतच निधन झाले आहे. नारळीकरांच्या निधनावर समाजाच्या सार्‍याच स्तरांमधून श्रद्धांजली अर्पण केली जात आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील भौतिकशास्त्र क्षेत्रातील दिग्गज डॉ. जयंत नारळीकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. 'डॉ. जयंत नारळीकर यांचे निधन वैज्ञानिक समुदायाचे एक मोठे नुकसान आहे. ते विशेषतः खगोल भौतिकशास्त्राच्या क्षेत्रात एक दिग्गज होते. त्यांच्या अग्रगण्य कार्यांचे, विशेषतः प्रमुख सैद्धांतिक चौकटींचे संशोधकांच्या पिढ्यांकडून कौतुक केले जाईल. .' अशा भावना मोदींनी व्यक्त केल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. जयंत नारळीकर यांच्या निधनावर शोक  व्यक्त केला

 

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement