EPFO Passbook Login Website बंद? युजर्सना UMANG App, Missed Call, वेबसाईट वरून पीएफ बॅलन्स तपासता येत नसल्याची माहिती

मागील 3-10 दिवसांपासून ग्राहकांना ऑनलाईन पीएफ बॅलंस तपासता येत नसल्याची तक्रार अनेकांनी ऑनलाईन केली आहे.

EPFO | (Representative Image)

EPFO च्या सदस्यांना त्यांचा पासबूक बॅलंस अधिकृत  EPFO website,  UMANG App,किंवा 011-22901406 या नंबर वरही डाएल करून समजत नसल्याची तक्रार अनेकांनी केली आहे. ही समस्या मागील 3-10 दिवसांपासून आहे. विविध पर्याय पाहूनही युजर्सना वेबसाईट स्लो चालत असल्याचा अनुभव आला आहे. अनेकांनी त्याच्या ऑनलाईन तक्रारी केल्या आहेत.  अलिकडच्याच अधिकृत प्रतिसादामध्ये, ईपीएफओने दिलेल्या माहितीनुसार, सदस्यांनी वेगळा ब्राउझिंग वापरून पहावं असं म्हटलं आहे. पूर्ण दुरुस्तीसाठी कोणताही संदर्भ किंवा कालावधी देण्यात आला नाही. अधिकृत वेबसाइटवर नेटवर्क समस्या असल्याचे सांगणारी एक नोंद देखील आहे. (हेही वाचा, EPFO Auto Claim Settlement: ईपीएफओ वाढवणार ऑटो सेटलमेंट क्लेम मर्यादा , UPI पैसे काढण्याची सुविधाही लवकरच सुरु; घ्या अधिक जाणून).

EPFO Passbook Login Website डाऊन आहे का?

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement