ठळक बातम्या
Fashion Show in Gulmarg: रमजान दरम्यान गुलमर्गमधील फॅशन शोमुळे वाद; Omar Abdullah यांनी दिले कारवाईचे आश्वासन (Video)
Prashant Joshiहुर्रियत नेते मिरवाईज उमर फारूख यांनी या फॅशन शोवर तीव्र प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, रमजान दरम्यान गुलमर्गमध्ये अशी घटना निंदनीय आहे. काश्मीर हे त्याच्या सूफी-संत संस्कृती आणि धार्मिक परंपरांसाठी ओळखले जाते, त्यामुळे अशी अश्लीलता खपवून घेतली जाणार नाही.
Virat Kohli and Anushka Sharma’s Adorable Moment: चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये विराट कोहली आणि अनुष्का शर्माचे खास क्षण व्हायरल (Watch Video)
Jyoti Kadamभारत आणि न्यूझीलंड यांच्यातील आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा अंतिम सामना 9 मार्च रोजी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवण्यात आला. जिथे भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा यांचे विजयानंतरचे खास क्षण कॅमेऱ्यात कैद झाले.
Mumbai Heatwave Alert: मुंबईमध्ये 11 मार्चपर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशारा; तापमान सामान्यपेक्षा जास्त राहणार, नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन
Prashant Joshiसध्या सुरू असलेल्या उष्णतेच्या लाटेसाठी कमाल तापमान 38 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर 12 मार्चपासून पारा कमी होण्याची शक्यता आहे; मात्र हवामान उष्ण आणि दमट कायम राहील.
List Of ICC Title Won By Team India: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली; भारताने जिंकलेल्या आयसीसी जेतेपदांची यादी पहा
Jyoti Kadam1975 मध्ये झालेल्या पहिल्या आयसीसी एकदिवसीय विश्वचषकाने आपला प्रवास सुरू करणाऱ्या या संघाने कालांतराने अनेक मोठे स्पर्धा जिंकल्या. 2024 चा टी-20 विश्वचषक जिंकून भारताने 11 वर्षांचा आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवला आणि आता 2025 चा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून आपले वर्चस्व पुन्हा स्थापित केले.
Air India Flight Technical Issue: शिकागोहून दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या फ्लाईटमध्ये तांत्रिक बिघाड; उड्डाणानंतर 10 तासांनी विमान पुन्हा परतले, प्रवाशांसाठी केली पर्यायी व्यवस्था
Prashant Joshiउड्डाणानंतर काही वेळातच विमानाला तांत्रिक समस्या येऊ लागल्या, त्यामुळे पायलटने सुरक्षितता लक्षात घेऊन शिकागो विमानतळावर परत उतरण्याचा निर्णय घेतला. विमान सुरक्षितपणे उतरले आणि सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर्सना कोणत्याही अडचणीशिवाय विमानातून खाली उतरवण्यात आले.
Why Team India Wearing White Jackets: चॅम्पियन्स ट्रॉफी विजयाचा आणि पांढऱ्या जॅकेटचा नेमका संबंध काय? टीम इंडियाला विशेष पोशाख का घालायला लावला जातो?
Jyoti Kadamबीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी यांनी स्वतः भारतीय खेळाडूंना हे जॅकेट घालायला लावले. ही परंपरा फक्त चॅम्पियन्स ट्रॉफीपुरती मर्यादित आहे. इतर कोणत्याही आयसीसी स्पर्धेत ती दिसून येत नाही. पण या पांढऱ्या जॅकेटचे महत्त्व काय आहे? त्याची संपूर्ण कहाणी जाणून घेऊत.
Shaktipeeth Highway: शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाविरोधात मोठे आंदोलन; 12 मार्च रोजी हजारो शेतकरी विधानभवनावर काढणार मोर्चा
Prashant Joshiसकाळी 9 वाजता आझाद मैदान येथून मोर्चा सुरू होईल, ज्यामध्ये राज्यभरातून 10,000 हून अधिक शेतकरी सहभागी होतील. विशेष म्हणजे, एकट्या कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे 4,000 शेतकरी या मोर्चात सामील होतील.
Virat Kohli: विजयानंतर विराट कोहलीने मोहम्मद शमीच्या आईचा घेतला आशिर्वाद, पायांना केला स्पर्श; व्हायरल व्हिडिओने जिंकली चाहत्यांची मने (Watch Video)
Jyoti Kadamविराट आणि शमी मैदानावर एकत्र होते. त्यावेळी शमीची आई कोहलीसमोर आली. कोहलीने त्यांच्या पायांना स्पर्श करूव आशिर्वाद घेतला.
Rohit Sharma on Retirement: रोहित शर्मा एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त होणार नाही, पत्रकार परिषदेत केले स्पष्ट
Nitin Kurheभारताच्या चॅम्पियन्स ट्रॉफी विजयानंतर, पत्रकार परिषदेत रोहित शर्माला निवृत्तीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. निवृत्तीबाबतची परिस्थिती स्पष्ट करताना तो म्हणाला, "भविष्यासाठी कोणतीही योजना नाही. जे काही घडत आहे ते सुरूच राहील.
Fake MHADA Flat Deal: म्हाडाच्या बनावट फ्लॅट डीलमध्ये शिक्षिकेला 26.23 लाख रुपयांचा गंडा; FIR दाखल
Bhakti Aghavतक्रारदाराने गुगल पे आणि चेकद्वारे एकूण 20.47 लाख हस्तांतरित केले. अशा प्रकारे तक्रारदार शिक्षिकेने आरोपीला एकूण 26.23 लाख रुपये दिले. तथापि, त्यांना कोणतेही मालमत्तेचे कागदपत्रे देण्यात आली नाहीत.
Video: चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर रोहित आणि विराटचा स्टंप घेवुन दांडिया खेळून केलं सेलिब्रेशन, पाहा व्हिडिओ
Nitin Kurheक्रिकेटच्या मैदानावर भारतीय स्टार फलंदाज विराट कोहली आणि कर्णधार रोहित शर्मा यांची मैत्रीपूर्ण शैली दिसून आली. विजयानंतर, दोन्ही खेळाडूंनी हातात स्टंप घेऊन दांडिया खेळून आनंद साजरा केला.
Fire At Roopam Showroom In Mumbai: चॅम्पियन्स ट्रॉफीच्या विजयाचा आनंद साजरा करताना फटाक्यांची आतषबाजीदरम्यान मुंबईतील क्रॉफर्ड मार्केटजवळील रूपम शोरूमला आग
Bhakti Aghavभारताच्या चॅम्पियन्स ट्रॉफी विजयाच्या आनंदात फटाके फोडताना मुंबईतील सीपी ऑफिसजवळील रूपम शोरूमला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.
Team India Celebration: जडेजाचा गंगनम डान्स, कोहली-रोहितचा अनोखा सेलिब्रेशन, चॅम्पियन झाल्यानंतर टीम इंडिया सेलिब्रेशनमध्ये मग्न
Nitin Kurheचॅम्पियन झाल्यानंतर भारतीय संघाचा जल्लोष मैदानावरच सुरू झाला. चौकार मारून भारतीय संघाला विजय मिळवून देणारा रवींद्र जडेजा हर्षित राणा आणि अर्शदीप सिंगसोबत गंगनम डान्स करताना दिसला. त्याच वेळी, विराट कोहली आणि रोहित शर्मा स्टंपसह दांडिया खेळताना दिसले.
PM Modi Congratulate Team India: 'असाधारण खेळाचा असाधारण निकाल'; चॅम्पियन्स ट्रॉफीतील विजयाबद्दल पंतप्रधान मोदींकडून टीम इंडियाचे अभिनंदन
Bhakti Aghavपंतप्रधान मोदींनी त्यांच्या एक्स अकाउंटवरील पोस्टमध्ये टीम इंडियाला शुभेच्छा देताना लिहिले आहे की, 'एक असाधारण खेळ आणि एक असाधारण निकाल!' आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी घरी आणल्याबद्दल आमल्या क्रिकेट संघाचा अभिमान आहे.
India Victory Celebration In Street: भारताच्या शानदार विजयानंतर देशवासीयांनी रस्त्यावर उतरुन साजरा केला आनंद, पाहा व्हिडिओ
Nitin Kurheटीम इंडियाने न्यूझीलंडचा चार विकेट्सने पराभव केला आहे. यासह, टीम इंडियाने तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले आहे. या शानदार विजयानंतर देशवासीयांनी रस्त्यावर उतरुन आनंद साजरा केला आहे.
India Beat New Zealand In Champions Trophy 2025 Final: अंतिम सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडला हरवून जिंकली ट्रॉफी, भारतीय संघाच्या विजयाची 'ही' आहेत 3 मोठी कारणे
Nitin Kurheटीम इंडियाने तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले आहे. या स्पर्धेत टीम इंडियाचे नेतृत्व रोहित शर्माकडे होते. तर, न्यूझीलंडची कमान मिचेल सँटनरच्या खांद्यावर होती.
India Beat New Zealand, Champions Trophy 2025 Final Match Scorecard: भारताने जिंकले 2025 चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद, अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा केला पराभव; 12 वर्षांनी पुन्हा ट्रॉफी जिंकली
Nitin Kurheटीम इंडियाने न्यूझीलंडचा चार विकेट्सने पराभव केला आहे. यासह, टीम इंडियाने तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले आहे. या स्पर्धेत टीम इंडियाचे नेतृत्व रोहित शर्माकडे होते. तर, न्यूझीलंडची कमान मिचेल सँटनरच्या खांद्यावर होती.
Gwalior: Reel मध्ये धूर दाखवण्यासाठी खोलीत LPG Gas पसरवला; लाईट चालू होताच झाला स्फोट, 2 जण गंभीर जखमी
Bhakti Aghavरील बनवण्यासाठी खोलीत LPG Gas पसरवण्यात आला. परंतु, खोलीत लाईट लावताचं एलपीजी गॅसचा स्फोट झाला. या स्फोटात एक महिला आणि एक पुरूष गंभीर भाजले.
IND vs NZ Champions Trophy 2025 Final Live Score Update: अक्षर पटेल बाद, रोमांचक वळणावर अंतिम सामना; राहुल आणि हार्दिक क्रीजवर उपस्थित
Nitin Kurheन्यूझीलंडने टाॅस जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर 252 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाला पाचवा धक्का लागला आहे. अक्षर पटेल 29 धावा करुन बाद झाला आहे. भारताचा स्कोर 212/5
Telangana Tunnel Rescue Update: तेलंगणातील बोगदा अपघाताबद्दल मोठे अपडेट! तब्बल 16 दिवसांनी बचाव पथकाला सापडला मृतदेह, शोध मोहीम सुरूच
Bhakti Aghavबोगद्यात अडकलेल्या कामगारांना वाचवण्यासाठी एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि भारतीय सैन्यासह 300 हून अधिक बचाव कर्मचारी सतत काम करत आहेत. परंतु चिखल, ढिगारा आणि सतत पाण्याची गळती यामुळे मदतकार्य अत्यंत कठीण झाले आहे.