Fire At Roopam Showroom In Mumbai: चॅम्पियन्स ट्रॉफीच्या विजयाचा आनंद साजरा करताना फटाक्यांची आतषबाजीदरम्यान मुंबईतील क्रॉफर्ड मार्केटजवळील रूपम शोरूमला आग
भारताच्या चॅम्पियन्स ट्रॉफी विजयाच्या आनंदात फटाके फोडताना मुंबईतील सीपी ऑफिसजवळील रूपम शोरूमला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.
Fire At Roopam Showroom In Mumbai: भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 जिंकली असून अंतिम सामन्यात न्यूझीलंडला चार विकेट्सने हरवले. संपूर्ण देश या विजयाचा आनंद साजरा करत आहे. अनेकांनी फटाक्यांची आतीषबाजी करून आपला आनंद साजरा केला. मात्र, मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. भारताच्या चॅम्पियन्स ट्रॉफी विजयाच्या आनंदात फटाके फोडताना मुंबईतील सीपी ऑफिसजवळील रूपम शोरूमला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताचं अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाने तात्काळ आग विझवली. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही.
मुंबईतील रूपम शोरूमला आग -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)