ठळक बातम्या
PL 2025: इंडियन प्रीमियर लीगमध्ये तंबाखू, दारूशी संबंधित प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष जाहिरातींवर बंदी घाला; केंद्र सरकारने दिले कडक निर्देश
Prashant Joshiआयपीएलचा आगामी हंगाम 22 मार्चपासून खेळवला जाणार आहे. पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात ईडन गार्डन्सवर खेळला जाईल. 2 महिन्यांहून अधिक काळ चालणाऱ्या या स्पर्धेचा अंतिम सामना 25 मे रोजी खेळला जाईल.
MI-W vs GG-W WPL 2025 Live Streaming: महिला प्रीमियर लीगमध्ये आज मुंबई इंडियन्स गुजरात जायंट्सशी भिडणार; सामना कधी, कुठे आणि कसा पाहायचा? जाणून घ्या
Jyoti Kadamगुजरात जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स महिला प्रीमियर लीग 2025 चे अधिकृत प्रसारण भागीदार भारतातील व्हायकॉम १८ आहे. जे त्यांच्या अधिकृत OTT प्लॅटफॉर्म JioHotstar अॅपवर ऑनलाइन सामना प्रसारीत करतील.
Savitribai Phule Punyatithi 2025 Messages: सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त WhatsApp Status, Images द्वारा करा त्यांच्या स्मृतिस त्रिवार वंदन!
Bhakti Aghav10 मार्च 1897 रोजी सावित्रीबाई फुले यांचे निधन झाले. दरवर्षी या दिवशी देश त्यांचे स्मरण करतो आणि श्रद्धांजली अर्पण करतो. सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त तुम्ही देखील सोशल मीडीयात व्हॉट्सॅप, फेसबूक स्टेटस, मेसेजद्वारे त्यांना श्रद्धांजली अर्पण करू शकता.
Mumbai Metro Line 1 Update: प्रवाशांसाठी दिलासा! आता मुंबई मेट्रो 1 पीक अवर्समध्ये अंधेरी आणि घाटकोपर स्थानकांदरम्यान चालवणार अतिरिक्त गाड्या; जाणून घ्या वेळा
Prashant Joshiवरिष्ठ मेट्रो अधिकाऱ्यांच्या वृत्तानुसार, याची चाचणी रन 6 मार्च रोजी घेण्यात आली. प्रवाशांकडून अभिप्राय गोळा करण्यासाठी अधिक चाचण्यांचे नियोजन केले आहे. बहुतेक गर्दी घाटकोपर ते अंधेरी या मार्गावर पाहायला मिळाली आहे, त्यामुळे या दोन स्थानकादरम्यान अतिरिक्त सेवा चालवण्याचा हा निर्णय घेण्यात आला.
Sairat To Re-release: आर्ची आणि परश्या पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार; 21 मार्चला 'सैराट' चित्रपट पुन्हा प्रदर्शित होणार
Bhakti Aghavरिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर यांची प्रमुख भूमिका असणारा हा चित्रपट येत्या 21 मार्च रोजी पुन्हा प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे आता 'सैराट'च्या चाहत्यांना पुन्हा एकदा आर्ची आणि परश्याच्या प्रेमकहाणीची जादू मोठ्या पडद्यावर अनुभवायला मिळणार आहे.
Air India Flight Bomb Threat: एअर इंडियाच्या न्यू यॉर्कला जाणाऱ्या विमानाला बॉम्बची धमकी; परत मुंबईला परतली फ्लाईट
Prashant Joshiएअर इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले की, आज 10 मार्च 2025 रोजी एआय119 मुंबई-न्यू यॉर्क (जेएफके) विमानाच्या उड्डाणादरम्यान संभाव्य सुरक्षा धोका आढळून आला. आवश्यक प्रोटोकॉलचे पालन केल्यानंतर, विमानातील सर्व प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने विमान परत मुंबईत आणण्यात आले.
Girl Dies After Following YouTube-Based Diet Plan: वजन कमी करण्यासाठी युट्यूब-आधारित डाएट प्लॅन फॉलो केल्याने 18 वर्षीय मुलीचा मृत्यू; केरळमधील कन्नूर येथील घटना
Bhakti Aghavयुट्यूबवर वजन कमी करण्याच्या अतिरेकी आहार पद्धतीचे पालन केल्याने एका 18 वर्षीय तरुणीने आपला जीव गमवावा लागला. कन्नूरमधील कुथुपरंबा येथील रहिवासी एम श्रीनंदा गेल्या काही महिन्यांपासून जवळजवळ पूर्णपणे पाण्यावर जगत होती, ज्यामुळे तिला गंभीर आरोग्य समस्या निर्माण झाल्या.
Rohit Sharma Forgets ICC Champions Trophy: बापरे! रोहित शर्मा चॅम्पियन्स ट्रॉफीसुद्धा विसरला; पत्रकार परिषदेनंतर ट्रॉफी टेबलावरच विसरला (Video)
Jyoti Kadamचॅम्पियन्स ट्रॉफीचा विजय भारतासाठी खास होता. संघाने 12 वर्षांनंतर एकदिवसीय स्वरूपात आयसीसी ट्रॉफी जिंकली होती. रोहित शर्मा ती ट्रॉफीसुद्धा विसरल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
Chhaava Box Office Collection: विक्की कौशल और रश्मिका मंदाना की 'छावा' ने रचला इतिहास, ओलांडला 500 कोटीचा आकडा
Shreya Varkeविकी कौशल आणि रश्मिका मंदाना यांचा 'छावा' बॉक्स ऑफिसवर सातत्याने नवे मापदंड रचत आहे. या चित्रपटाने चौथ्या वीकेंडमध्ये एकूण 28.43 कोटींची कमाई केली असून, या कालावधीत सर्वाधिक कमाई करणारा हा दुसरा चित्रपट ठरला आहे. यापूर्वी 'पुष्पा २' (30 कोटी) आणि 'स्त्री २' (25.01 कोटी) या चित्रपटांचा या यादीत समावेश होता. चौथ्या आठवड्यात या चित्रपटाने शुक्रवारी 6.30 कोटी, शनिवारी 13.70 कोटी आणि रविवारी हिंदी व्हर्जनमध्ये 8.43 कोटींची कमाई केली
Maharashtra: नमोह शेतकरी योजनेत शेतकऱ्यांना अधिक 3 हजार रुपये वाढण्याची शक्यता, जाणून घ्या, संपूर्ण माहिती
Shreya Varkeमहाराष्ट्राचा अर्थसंकल्प आज सादर होणार आहे. महायुती सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. अर्थमंत्री अजित पवार अकराव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. सर्वसामान्यांना या अर्थसंकल्पाकडून अनेक अपेक्षा आहेत. केंद्र सरकार शेतकऱ्यांना सहा हजार रुपये तर नमोह शेतकरी योजनेंतर्गत राज्य सरकार सहा हजार रुपये देत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते. या अर्थसंकल्पात महिला आणि शेतकऱ्यांना काय मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Dedicated Terminal For VVIP Travelers: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर बांधले जाणार सेलिब्रिटी, अब्जाधीश उद्योगपती, उच्चपदस्थ राजकारण्यांसाठी खास टर्मिनल; 2030 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता
Prashant Joshiहे टर्मिनल केवळ राज्यपाल, मुख्यमंत्री आणि संरक्षण कर्मचाऱ्यांसारख्या केंद्र आणि राज्य सरकारी अधिकाऱ्यांनाच सेवा देणार नाही, तर सेलिब्रिटी आणि इतर उल्लेखनीय व्यक्तींसाठी एक सामान्य विमान वाहतूक टर्मिनल म्हणून देखील काम करेल. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, टर्मिनल वापरण्यासाठी पात्रता निकष नंतर निश्चित केले जातील.
Maharashtra Lottery Result: सागरलक्ष्मी, महा.गजलक्ष्मी सोम, गणेशलक्ष्मी भाग्यलक्ष्मी, महा. सह्याद्री धनलक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Jyoti Kadamमहा. सह्याद्री धनलक्ष्मी लॉटरीच्या एकूण बक्षीसांची संख्या 441 आहे. प्रत्येक आठवडयात एकूण 27 सोडती, तसेच 4 मासिक सोडती व वर्षाला 6 भव्यतम सोडत असतील.
Chh. SambhajiNagar Road Accident: उसाचा ट्रक उलटला , 4 मजुरांचा मृत्यू, छ. संभाजीनगर येथील घटना
Shreya Varkeसंभाजीनगरमध्ये भीषण अपघात झाला आहे. उसाने भरलेला ट्रक पलटी होऊन कोसळला. या दुर्घटनेत ट्रकखाली 17 मजूर अडकले होते. अपघाताची माहिती मिळताच कन्नड शहर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने १३ कामगारांचे प्राण वाचले. घटनास्थळी मदतकार्य सुरू आहे. जखमी कामगारांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. हा अपघात कसा झाला याचा तपास पोलीस करत आहेत.
Madhya Pradesh Accident: मध्य प्रदेशातील सिधी येथे SUV आणि ट्रकच्या धडकेत 8 जणांचा मृत्यू, तर 13 जण जखमी
Bhakti Aghavरविवारी रात्री उशिरा सिटी कोतवाली पोलिस स्टेशन हद्दीतील राष्ट्रीय महामार्गावरील ओपनी पेट्रोल पंपाजवळ हा अपघात झाला. एका भरधाव ट्रक आणि एसयूव्हीची समोरासमोर धडक झाली.
Maharashtra Budget 2025-26 Live Streaming: अर्थमंत्री Ajit Pawar आज सादर करणार महाराष्ट्राचा 2025-26 चा अर्थसंकल्प; 'या' ठिकाणी पाहू शकाल थेट प्रक्षेपण (Video)
Prashant Joshiनव्याने सत्तेवर आलेल्या महायुती सरकारचा हा पहिला अर्थसंकल्प असून, अर्थमंत्री म्हणून अजित पवार यांचा हा 11 वा अर्थसंकल्प असणार आहे. त्यानंतर ते शेषराव वानखेडे (13 वेळा) यांच्यानंतर दुसरे सर्वाधिक (11) वेळा अर्थसंकल्प सादर करणारे अर्थमंत्री ठरतील.
Virat Rohit Retirement: ‘भाई हम लोग अभी रिटायरमेंट…’, सर्व अफवांना पूर्णविराम, कोहली-रोहितचा मजेदार संवाद व्हायरल (Video)
Jyoti Kadamरोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या निवृत्तीबाबतच्या सर्व अफवांना कर्णधार रोहित शर्माने पूर्णविराम दिला आहे. ‘भाई हम लोग अभी रिटायरमेंट नही ले रहे’ असा म्हणतानाचा रोहितचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
UP Shocker: गंगा नदीवरील पुलावर आत्महत्या करण्यासाठी चढली तरुणी, सतर्क नागरिकांनी वाचवला जीव, पाहा व्हायरल व्हिडीओ
Shreya Varkeउत्तर प्रदेशातील हापुडमध्ये नदीत आत्महत्या करण्यासाठी आलेल्या तरुणीचा जीव वाचवण्यात आला आहे. एक तरुणी पुलावरून उडी मारत असल्याचे पाहिल्यानंतर अनेक जण तिला वाचवण्यासाठी घटना स्थळी जमले होते. यावेळी लोकांनी तिला पाहिलं आणि तिला असं करण्यापासून रोखलं. हापुडमधील गडमुक्तेश्वर या तीर्थनगरीतील ब्रिजघाट येथे ही घटना घडली आहे. ती उडी मारण्याआधीच लोकांनी तिचा जीव वाचवला. यावेळी एका तरुणाने त्याला धरून ठेवले.
Mumbai-Goa Highway: कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा; मुंबई-गोवा महामार्ग 2026 च्या अखेरीस पूर्ण होणार, मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची माहिती
Prashant Joshiभोसले म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काम पूर्ण झाले असले तरी, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील रस्ते रुंदीकरणाच्या प्रयत्नांना भूसंपादनाचे प्रश्न, पर्यावरणीय मंजुरी, कंत्राटदारांची अकार्यक्षमता, कायदेशीर वाद आणि बांधकाम आराखड्यात शेवटच्या क्षणी केलेले बदल यासारख्या अडचणी येत आहेत.
Sunil Gavaskar Dances: चेहऱ्यावर बालिश आनंद...75 वर्षीय सुनील गावस्कर टीम इंडियाच्या विजयानंतर थिरकले; व्हिडीओ व्हायरल (Watch Video)
Jyoti Kadamविजेतेपदाच्या सामन्यात न्यूझीलंडला हरवून टीम इंडियाने तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीवर आपले नाव कोरले. भारतीय संघाच्या विजयावर सुनील गावस्कर देखील भर मैदानात लहान मुलांसारखे नाचताना दिसले.
Indian Cricket Team Schedule After ICC CT 2025: चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर भारतीय संघाचे आगामी सामन्यांचे संपूर्ण वेळापत्रक काय? घ्या जाणून
Jyoti Kadamचाहते आता भारतीय संघाच्या आगामी वेळापत्रकावर लक्ष ठेवून आहेत. 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर आता आयपीएल आयोजित केली जाईल. जी मे मध्ये संपेल. यानंतर, भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळेल, जी 20 जूनपासून सुरू होईल.