Girl Dies After Following YouTube-Based Diet Plan: वजन कमी करण्यासाठी युट्यूब-आधारित डाएट प्लॅन फॉलो केल्याने 18 वर्षीय मुलीचा मृत्यू; केरळमधील कन्नूर येथील घटना
युट्यूबवर वजन कमी करण्याच्या अतिरेकी आहार पद्धतीचे पालन केल्याने एका 18 वर्षीय तरुणीने आपला जीव गमवावा लागला. कन्नूरमधील कुथुपरंबा येथील रहिवासी एम श्रीनंदा गेल्या काही महिन्यांपासून जवळजवळ पूर्णपणे पाण्यावर जगत होती, ज्यामुळे तिला गंभीर आरोग्य समस्या निर्माण झाल्या.
Girl Dies After Following YouTube-Based Diet Plan: केरळ (Kerala) मधून अत्यंत धक्कादायक घटना समोर येत आहे. युट्यूबवर वजन कमी (Weight Loss) करण्याच्या अतिरेकी आहार पद्धतीचे पालन केल्याने एका 18 वर्षीय तरुणीने आपला जीव गमवावा लागला. कन्नूरमधील कुथुपरंबा येथील रहिवासी एम श्रीनंदा गेल्या काही महिन्यांपासून जवळजवळ पूर्णपणे पाण्यावर जगत होती, ज्यामुळे तिला गंभीर आरोग्य समस्या निर्माण झाल्या. मत्तानूर येथील पझहस्सी राजा एनएसएस कॉलेजच्या पहिल्या वर्षाच्या विद्यार्थिनी श्रीनंदाला एका आठवड्यापूर्वी अत्यधिक थकवा आणि उलट्या झाल्याचे लक्षण दिसून आल्यानंतर थलासेरी सहकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
श्रीनंदा गेल्या काही दिवसांपासून व्हेंटिलेटर सपोर्टवर होती. शनिवारी रात्री तिचा मृत्यू झाला. श्रीनंदावर उपचार करणारे डॉ. नागेश प्रभू यांनी पुष्टी केली की, ती एनोरेक्सिया नर्वोसा नावाच्या गंभीर खाण्याच्या विकाराने ग्रस्त आहे, ज्यामध्ये वजन वाढण्याची तीव्र भीती असते. ती जवळजवळ सहा महिने उपाशी होती. माझ्या एका सहकाऱ्याने यापूर्वी तिच्या कुटुंबाला मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेण्याचा सल्ला दिला होता, परंतु त्यांनी या स्थितीचे गांभीर्य फार मनावर घेतले नाही. (हेही वाचा- Diet Plan मुळे दैनंदिन जीवनातील 'या' गोष्टींवर परिणाम होऊ शकतो)
एनोरेक्सिया नर्वोसा हा एक गुंतागुंतीचा विकार आहे, जो केवळ खाण्याच्या सवयींवरच परिणाम करत नाही तर त्याची मानसिक मुळेही खोलवर जातात. या विकाराने ग्रासलेल्या रुग्णांना भूकेची जाणीव कमी होते. श्रीनंदाच्या बाबतीत, तिच्या सोडियम आणि साखरेची पातळी सुधारण्यापलीकडे घसरली, असेही डॉक्टरांनी सांगितले. (हेही वाचा - शिल्पा शेट्टी डाएट म्हणजे मेंटेन फिगर, कमनीय बांधा, नाजूक कटी; घ्या जाणून)
दरम्यान, पाश्चात्य देशांमध्ये अशा घटना अधिक सामान्य असल्या तरी, तज्ज्ञांनी इशारा दिला आहे की भारतात, विशेषतः केरळमध्ये, सोशल मीडियाद्वारे प्रसारित केलेल्या अवास्तव शारीरिक मानकांमुळे अशा घटनांमध्ये वाढ होत आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)