Air India Flight Technical Issue: शिकागोहून दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या फ्लाईटमध्ये तांत्रिक बिघाड; उड्डाणानंतर 10 तासांनी विमान पुन्हा परतले, प्रवाशांसाठी केली पर्यायी व्यवस्था
उड्डाणानंतर काही वेळातच विमानाला तांत्रिक समस्या येऊ लागल्या, त्यामुळे पायलटने सुरक्षितता लक्षात घेऊन शिकागो विमानतळावर परत उतरण्याचा निर्णय घेतला. विमान सुरक्षितपणे उतरले आणि सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर्सना कोणत्याही अडचणीशिवाय विमानातून खाली उतरवण्यात आले.
शिकागोहून दिल्लीला येणारे एअर इंडियाचे विमान AI126 उड्डाणानंतर पुन्हा शिकागोला परतले. एअर इंडियाच्या प्रवक्त्यांनुसार, 6 मार्च 2025 रोजी, उड्डाणानंतर काही वेळातच विमानाला तांत्रिक समस्या येऊ लागल्या, त्यामुळे पायलटने सुरक्षितता लक्षात घेऊन शिकागो विमानतळावर परत उतरण्याचा निर्णय घेतला. विमान सुरक्षितपणे उतरले आणि सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर्सना कोणत्याही अडचणीशिवाय विमानातून खाली उतरवण्यात आले. मात्र, सूत्रांच्या हवाल्याने, वृत्तसंस्था पीटीआयने वृत्त दिले आहे की अनेक शौचालये काम करत नसल्याने विमान परत उतरवावे लागले. पीटीआयने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, एअर इंडियाच्या बोईंग 777-300 ईआर विमानात एकूण 10 शौचालये होती, त्यापैकी फक्त एकच कार्यरत होते. या विमानाची क्षमता सुमारे 340 आसनांची होती, त्यापैकी 300 आसने इकॉनॉमी क्लासची होती. प्रवाशांच्या सोयी लक्षात घेऊन, एअर इंडियाने त्यांच्या राहण्याची व्यवस्था हॉटेलमध्ये केली आहे, जेणेकरून त्यांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये. तसेच, प्रवाशांना त्यांच्या गंतव्यस्थानावर नेण्यासाठी विमान कंपनीकडून पर्यायी विमानांची व्यवस्था केली जात आहे. (हेही वाचा: Australia: ऑस्ट्रेलियन विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, मेंटेनन्स वर्कर असल्याचे भासवून बंधूक घेऊन 17 वर्षीय मुलगा चढला होता विमानात, चौकशीनंतर तरुणाला केली अटक)
Air India Flight Technical Issue:
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)