Gwalior: Reel मध्ये धूर दाखवण्यासाठी खोलीत LPG Gas पसरवला; लाईट चालू होताच झाला स्फोट, 2 जण गंभीर जखमी
रील बनवण्यासाठी खोलीत LPG Gas पसरवण्यात आला. परंतु, खोलीत लाईट लावताचं एलपीजी गॅसचा स्फोट झाला. या स्फोटात एक महिला आणि एक पुरूष गंभीर भाजले.
Gwalior News: रील बनवण्याची आवड लोकांना इतकी प्रभावित करते की ते यासाठी स्वतःचा जीवही धोक्यात घालण्यासाठी मागे-पुढे पाहात नाहीत. ग्वाल्हेर (Gwalior) मध्येही असाच एक प्रकार समोर आला आहे. येथे रील बनवण्यासाठी खोलीत LPG Gas पसरवण्यात आला. परंतु, खोलीत लाईट लावताचं एलपीजी गॅसचा स्फोट झाला. या स्फोटात एक महिला आणि एक पुरूष गंभीर भाजले. तसेच इमारतीचे देखील मोठे नुकसान झाले आहे. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ग्वाल्हेरमधील द लेगसी नावाच्या सात मजली इमारतीत ही घटना घडली.
ग्वाल्हेरमध्ये Reel बनवताना गॅसचा स्फोट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)