भारतीय सिनेमाचे जनक म्हणून ओळखले जाणारे दादासाहेब फाळके यांचा आज जन्मदिवस. भारतात सिनेमाची मुहूर्तमेढ यांनी रोवली आणि आता सिनेसृष्टी भव्यदिव्य झाली आहे. दादासाहेब फाळके यांचा जन्म 30 एप्रिल 1870 साली नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबक येथे झाला. फाळके यांनी 1913 साली राजा हरिश्र्चंद्र नावाची फीचर फिल्म तयार केली. सिनेमाचे जन्मदाता दादासाहेब फाळके यांच्या जयंती निमित्त जाणून घेऊया त्यांच्याबद्दल काही खास गोष्टी: (अमेरिकन डिप्लोमॅट्स जेव्हा सई ताम्हणकर, रिंकू राजगुरू आणि सुबोध भावे च्या मराठी सिनेमातील लोकप्रिय डायलॉग्स बोलतात... दादासाहेब फाळके जयंती आणि महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर US Consulate Mumbai ने शेअर केला मजेदार Video)
# दादासाहेब फाळके प्रसिद्ध निर्माते, दिग्दर्शक आणि स्क्रीनरायटर होते.
# त्यांनी आपल्या 19 वर्षांच्या करिअरमध्ये 95 सिनेमे आणि 27 शॉर्ट फिल्म्स केल्या.
# दादासाहेब फाळके यांचे पूर्ण नाव धुंधिराज गोविंद फाळके असे होते.
# 'द लाइफ ऑफ क्रिस्ट' हा मूकपट त्यांच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरला. हा सिनेमा पाहिल्यानंतर त्यांना आपणही सिनेमा बनवावा असे वाटू लागेल आणि आपल्या पत्नीकडून पैसे उधार घेऊन त्यांनी पहिला मूकपट बनवला.
# राजा हरिश्र्चंद्र हा त्यांचा पहिला सिनेमा असून त्याचे बजेट 15 हजार रुपये इतके होते.
Dadasaheb Phalke Birth Anniversary: दादासाहेब फाळके यांच्याबद्दल 'या' खास गोष्टी जाणून घ्या - Watch Video
# महिलांना सिनेमात काम करण्याची संधी दादासाहेब फाळके यांनी दिली. भस्मासूर मोहिनी या सिनेमात त्यांनी दोन महिलांना काम करण्याची संधी दिली. दुर्गा आणि कमला अशी त्या दोन महिलांची नावे होती.
# सेतुबंधन हा दादासाहेब फाळके यांचा शेवटचा मूकपट होता. त्यांचे निधन 16 फेब्रुवारी 1944 साली नाशिक येथे झाले.
# भारतीय सिनेमात दादासाहेब यांच्या अभूतपूर्व योगदानामुळे 1969 साली भारत सरकारने त्यांच्या सन्मानार्थ दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळा सुरु केला.
# भारतीय सिनेमा जगतातील हा सर्वोच्च आणि प्रतिष्ठीत पुरस्कार मानला जातो.
स्वप्नपूर्तीसाठी प्रतिकूल परिस्थिती देखील सातत्याने प्रयोग करत राहण्याची त्यांची वृत्ती येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल.