Vikas Gupta (Photo Credits: Instagram)

Vikas Gupta Tested COVID-19 Positive: बिग बॉस 11 चा स्पर्धक आणि मास्टर माइंड म्हणून या खेळात लोकप्रिय झालेला विकास गुप्ता (Vikas Gupta) याला कोरोनाची लागण झाल्याची बातमी समोर येत आहे. विकासने स्वत: सोशल मिडियावर आपली कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे सांगितले आहे. बिग बॉस 11 मध्ये विजेतेपदावर नाव करु शकला नसला तरीही आपल्या उत्कृष्ठ खेळामुळे तो टॉप 3 मध्ये पोहोचला होता. विकास सोशल मिडियावर बराच सक्रिय असतो. आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर त्याने पोस्ट करुन आपल्याला कोरोना झाल्याचे सांगितले आहे.

'नेहमी पॉझिटिव्ह असणे चांगली गोष्ट नाही. मी कोविड पॉझिटिव्ह आली आहे. मी त्या सर्वांना विनंती करतो जे मागील काही दिवसांत माझ्या संपर्कात आले असेल त्यांनी आपली टेस्ट करुन घ्यावी. सध्या मी आयसोलेशनमध्ये आहे आणि घरी क्वारंटाईन आहे. आशा आहे लवकरच बरा होईल.' असे विकास गुप्ताने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.हेदेखील वाचा- तात्या विंचूने घेतली COVID19 ची लस, रामदास पाध्ये यांनी सोशल मीडियात पोस्ट करत दिला महत्वाचा संदेश

 

View this post on Instagram

 

A post shared by Vikas Gupta (@lostboyjourney)

विकासने सोशल मिडियावर आपल्याला कोरोना झाल्याची बातमी दिल्यानंतर त्यांच्या चाहत्यांसह त्याच्या मित्रपरिवाराने तो लवकरात लवकर बरा व्हावा अशी प्रार्थना केली आहे. गौहर खान, शेफाली बग्गा, जान कुमार सानू, मनिष नागदेव सारख्या अनेक कलाकारांनी तो लवकर बरा व्हावा अशी प्रार्थना केली आहे.

दरम्यान लवकरच Bigg Boss 15 येऊ घातला आहे. नेहमीप्रमाणे यंदाच्या सिझनमध्ये कोणते घरामध्ये येणार याबाबत चर्चा रंगू लागली आहे. काही दिवसांपूर्वी वृत्त आले होते की, दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दहिया यांच्यासह अंकिता लोखंडेशी निर्मात्यांनी संपर्क साधला आहे. अलीकडेच 'बालिका वधू' फेम गहना म्हणजेच नेहा मार्दानेही सांगितले की तिला 'बिग बॉस 15' ची ऑफर मिळाली आहे. दरम्यान, आता आणखी काही सेलिब्रिटींची नावे समोर आली आहेत, ज्यांना निर्मात्यांनी अप्रोच केले आहे.